Home »National »Delhi» Hyderabad Blast Inside Story

INSIDE STORY: अफजलच्‍या फाशीनंतर पीओकेमध्‍ये शिजला हैदराबाद स्‍फोटाचा कट

अमित मिश्रा | Feb 23, 2013, 09:31 AM IST

नवी दिल्‍ली- अफजल गुरूला फाशी दिल्‍यानंतर 9 आणि 10 फेब्रुवारीला पीओके (पाकव्‍याप्‍त काश्‍मीर) येथील मुजप्फराबाद येथे झालेल्‍या युनायटेड जिहाद काऊंसिलच्‍या बैठकीत दिलसुखनगर बॉम्‍बस्‍फोटाचा कट रचला गेला होता. लष्‍करचा म्‍होरक्‍या हाफिज सईद आणि हिजबूल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनच्‍या नेतृत्‍वाखाली झालेल्‍या या बैठकीला 'अ‍ॅक्‍शन मिटिंग' असे नाव देण्‍यात आले होते. गुप्‍तचर यंत्रणांद्वारे मिळालेल्‍या माहितीनुसार हुजी आणि जैश-ए-मोहम्मदचे प्रमुखदेखील यावेळी उपस्थित होते. यामध्‍ये इंडियन मुजाहिदीनचा फरार दहशतवादी रियाज भटकल आणि यासीन भटकलला रेकी करून नकाशाबरोबर अहवाल देण्‍यास सांगण्‍यात आले होते.

ऑपरेशनसाठी आर्थिक तरतूद दुबई येथील बशीर कँपच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आली होती. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार स्‍फोटांसाठी 16,19 आणि 20 फेब्रुवारी या तारखा निश्चित करण्‍यात आल्‍या होत्‍या. मात्र, भारतीय गुप्‍तचर यंत्रणांना या योजनेची माहिती झाल्‍याने त्‍यांनी अलर्ट जारी केला होता. त्‍यामुळे या योजनेत बदल करीत दहशतवाद्यांनी 21 फेब्रुवारीला हा स्‍फोट घडवला.

Next Article

Recommended