Home »National »Delhi» More Than 50 Thousand Workers Are On Strike In Uttar Pradesh

PHOTOS : उत्तर भारतात संपाला प्रतिसाद, सरकारी कर्मचा-यांचाही सहभाग

दिव्य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 15:54 PM IST

लखनौ- ट्रेड यूनियनच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय कर्मचा-यांच्या वेतनात दर पाच वर्षांनी दुरुस्ती व न्यू पेन्शन स्कीम बंद करून जुनी स्कीम लागू करावी यासह विविध मागण्यासाठी यूपीमधील सरकारी अधिकारी- कर्मचारी यांनी आजच्या संपात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. याबाबत सांगितले जात आहे की, या संपात यूपीमधील सुमारे 18 लाख राज्य कर्मचारी आणि 12 लाख केंद्रीय कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. दुसरीकडे, यूपीतील एचपीसी, आयओसी, बीपीसीएल यासारख्या सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांतील कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. एलपीजी गॅस आणि पेट्रोल डिझेल पुरवठा आज ठप्प झाला आहे. लखनौमधील अमोसी येथील आयओसी प्‍लांटवर प्रदर्शन, कुर्सी रोडवरीलर बीपीसीएल प्‍लांटवर तर, उन्‍नाव येथील एचपीसी प्‍लांटवर कर्मचारी आंदोलन करीत आहेत.

या आहेत या कर्मचारी-कामगारांच्या मागण्या

- महागाईला जबाबदार धोरणे बदलावीत
- मिनिमम वेज वाढवण्यात यावे.
- सरकारी कंपन्यांत अनुकंपा धर्तीवर नोक- या द्याव्यात
- सरकारी कंपन्यांची भागीदारी खासगी कंपन्यांना विकू नये
- बँक विलिनीकरणाची कार्यवाही लागू करू नये.
- केंद्रीय कर्मचा-यांच्या वेतनात दर पाच वर्षांनी दुरुस्ती व्हावी
- न्यू पेन्शन स्कीम बंद करून जुनी स्कीम लागू करावी.

संपाचे देशभरातील विविध ठिकाणावरील स्थिती पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...

Next Article

Recommended