Home »Sports »From The Field» India Vs Australia, 3rd Test, Day 2 At Ranchi JSCA International Stadium

तिसरी कसाेटी/ दुसरा दिवस: जडेजाचा ‘पंच’; राहुलचे अर्धशतक, भारत 1 बाद 120 धावा

दिव्‍य मराठी वेब टीम | Mar 18, 2017, 01:33 AM IST

  • सामन्‍यात लोकेश राहुलने चमकदार अर्धशतक झळकावले. तो 67 धावांवर आऊट झाला.
रांची-अाॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन केले. टीमच्या लेगस्पिनर रवींद्र जडेजाने शानदार गाेलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४५१ धावा काढता अाल्या. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात १ बाद १२० धावांची खेळी केली. यात युवा सलामीवीर लाेकेश राहुलने (६७) शानदार अर्धशतकाचे याेगदान दिले.

अाता मुरली विजय (४२) अाणि चेतेश्वर पुजारा (१०) मैदानावर खेळत अाहेत. अद्याप ३३१ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे ९ विकेट शिल्लक अाहेत. मिशेल स्टार्कच्या जागी खेळणाऱ्या पॅट कमिन्सने अाॅस्ट्रेलियाकडून एक विकेट घेतली. त्याने पाच वर्षांनंतर पुनरागमन करताना निवड समितीचा विश्वास सार्थकी लावला. त्याने राहुलला बाद करून संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला.

मुरलीचे सामन्यांचे अर्धशतक
भारताकडून मुरली विजयने करिअरमध्ये सामन्यांचे अर्धशतक पूर्ण केले. ५० वा सामना खेळत असलेल्या मुरलीने नाबाद ४२ धावांची खेळी केली. त्याने ११२ चेंंडूंमध्ये सहा चाैकारांच्या अाधारे ही खेळी केली. याशिवाय त्याने राहुलसाेबत संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली.

राहुलचे चाैथे अर्धशतक
भारताकडून सलामीवीर लाेकेश राहुल चमकला. त्याने संयमी खेळी करताना यजमानांना पहिल्या डावात दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान, त्याने १०२ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकारांच्या अाधारे ६७ धावांची खेळी केली. त्याने या मालिकेत चाैथे अर्धशतक अापल्या नावे केले. याशिवाय त्याने मुरली विजयसाेबत पहिल्या गड्यासाठी ३१.२ षटकात ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंंडियाला चांगली सुरुवात करता अाली. दरम्यान लाेकेश राहुलला सामन्यात कमिन्सने बाद केले.

चार स्टार चमकले
दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथच्या नाबाद १७८ धावा, ग्लेन मॅक्सवेलचे (१०४) कसाेटी करिअरमधील पहिले शतक, रवींद्र जडेजाच्या पाच विकेट (अाठव्यांदा ५ बळी) अाणि मैदानाबाहेर असलेल्या विराट काेहलीच्या नावाची खास चर्चा झाली. स्पिनर जडेजाने ४९.३ षटकात मॅरेथाॅन गाेलंदाजी करताना १२४ धावा देताना ५ बळी घेतले.

स्मिथ -मॅक्सवेलने रचली भागीदारी
अाॅस्ट्रेलियाच्या कर्णधार स्मिथ अाणि शतकवीर ग्लेन मॅक्सवेलने सामन्यात डाव सावरला. त्यांनी संयमी खेळी करताना १९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मॅक्सवेलने १०४ धावांची खेळी केली. स्मिथने नाबाद १७८ धावांचे याेगदान दिले.

स्मिथचा विक्रम
भारतात १५० पेक्षा अधिक धावा काढणार स्टीव्हन स्मिथ हा अाॅस्ट्रेलियाचा पहिला कर्णधार ठरला. यातून त्याने विक्रम नाेंदवला. यापूर्वी माजी कर्णधार मायकेल क्लार्कच्या नावे विक्रम हाेता. त्याने २०१२-१३ मध्ये १३० धावांची खेळी केली हाेती. मात्र, अाता क्लार्कला मागे टाकून स्मिथने विक्रम केला.
टीम
भारत- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, करुण नायर, आर. अश्विन, रिद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, उमेश यादव और इशांत शर्मा.
ऑस्ट्रेलिया-डेव्हिड वॉर्नर, मॅट रेनशॉ, स्टीव स्मिथ, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, स्टीव ओकीफे, नाथन लियॉन, पॅट कमिंस आणि जोश हेजलवुडण.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मॅचचे फोटोज...
सामन्‍याच्‍या पहिल्या दिवशी असे काय घडले ज्‍यामुळे मैदानावर कोणीही आपले हसु आवरु शकले नाही... वाचा पुढील स्‍लाइडवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended