» Deccan Look To Build On Maiden Win

IPL : मुंबईचा डेक्कनवर पाच गडी राखून विजय, रोहित-मलिंगा चमकले

दिव्य मराठी वेब टीम | Apr 29, 2012, 20:04 PM IST

  • IPL : मुंबईचा डेक्कनवर पाच गडी राखून विजय, रोहित-मलिंगा चमकले

मुंबई- मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 40 सामना झाला. मुंबईने १८.१ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात १०१ धावा करीत डेक्कनचा सहज पराभव केला. या सामन्यात डेक्कनने दिलेल्या १०१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने सावध सुरुवात केली. डेल स्टेनने प्रभावी गोलंदाजी करताना आपल्या ४ षटकात केवळ १० धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. मात्र त्याला इतर गोलंदाजांची म्हणावी तशी साथ न मिळाल्याने तो डेक्कनला विजयी करु शकला नाही.
रोहित शर्माच्या महत्त्वपूर्ण ४२ धावा- सलामीवीर रिचर्ड लेवी व सचिन तेंडुलकर लवकर बाद झाल्याने मुंबईची अवस्थाही कठीण होती. त्यावेळी रोहित शर्माने एकाकी लढा देत ४८ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत ४ चौकार व एक षटकार ठोकला. मात्र त्याला फिरकीपटू ड्यूमिनीने इशांक जग्गीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यापूर्वी रोहितने मुंबईला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवले होते. जेम्स फ्रॅकलिनने रोहित साथ देताना २० चेंडूत १३ धावा काढल्या. त्याला आशिष रेड्डीने बाद केले. अंबाती रायडूने विजय मिळवून देताना नाबाद १९ धावा काढल्या.
लेवी पहिल्याच चेंडूवर बाद- सलामीवीर रिचर्ड लेवी डेल स्टेनच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर सचिन तेंडुलकर १४ धावेवर वीर प्रताप सिंगच्या गोलंदाजीवर दुस-या स्लिपमध्ये झेलबाद झाला. दिनेश कार्तिक २ धावेवर बाद झाला. त्याला स्टेनने यष्टीरक्षक पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले.
प्रथम गोलंदाजीचा निर्णय यशस्वी- मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने घेतलेल्या चार बळीच्या जोरावर डेक्कनला केवळ 18.4 षटकात 100 धावाच करता आल्या. जेम्स फ्रॅकलिन व कर्णधार हरभजन सिंग यांनीही प्रत्येकी दोन -दोन बळी टिपले. जेपी ड्युमिनी 25 धावांवर नाबाद राहिला.
डेक्कनची चांगल्या सुरुवातीनंतर घसरगुंडी-सलामीवीरपार्थिव पटेल व शिखर धवन यांनी डेक्कनला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी पाच षटकात 35 धावा काढल्या. मात्र त्यानंतर पार्थिव पटेल बाद झाला. पार्थिवने 18 चेंडूत एक चौकार व एक षटकार मारत 19 धावा केल्या. तो आर. पी. सिंगच्या गोलंदाजीवर मुनाफ पटेलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर त्याच्या जागी खेळायला इशांक जग्गी केवळ 2 धावेवर बाद झाला. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर मुनाफ पटेलने आणखी एक सुंदर झेल घेतला. कर्णधार कॅमेरुन व्हाईट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर थर्डमॅनला आर. पी. सिंगने व्हाईटचा झेल टिपला. त्यानंतर शिखर धवनही 29 धावांवर हरभजनच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. त्याच्या जागी खेळायला आलेल्या डॅ्नियल ख्रिश्चेन हा ही 5 धावावर बाद झाला. त्यानंतर भरत चिपली एका धावेवर बाद झाला. आशिष रेड्डीला मुनाफ पटेलने 10 धावांवर माघारी धाडले. मग त्यानंतर लगेच मलिंगाने अमित मिश्राला 1 धावेवर माघारी पाठवले. 19 व्या षटकात मलिंगाने डेल स्टेन व वीर प्रताप सिंग यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करीत डेक्कनचा डाव गुंडाळला. 35 धावांच्या सलामीनंतर डेक्कनने केवळ 65 धावांत आपले सर्व 10 गडी गमावले.
मुंबईची शानदार गोलंदाजी- मुंबईच्या गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. कर्णधार हरभजन सिंगने आपल्या चार षटकात केवळ 13 धावा देताना 2 गडी टिपले. लसिथ मलिंगानेही 16 धावांत 4 गडी टिपले. जेम्स फ्रॅकलिनने 2 गडी बाद केले. मुनाफ पटेल, आर. पी. सिंग प्रत्येकी 1 गडी बाद केला.
IPL : द्रविड- रहाणेने विजयाचा पाया रचूनही राजस्थानचा 1 धावेने पराभवNext Article

Recommended