Home »Sports »Expert Comment» Cricketer Ravindra Jadejas Sisters Danced In Wedding Ceremony Last Year

जडेजाच्या लग्नात दोन्ही बहिणींनी केला होता जबरदस्त डान्स, पाहा PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Apr 18, 2017, 17:46 PM IST

  • लग्नात डान्स करताना जडेजाच्या बहिणी नयना आणि पद्मिनी (उडवीकडील).
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या लग्नाला मंगळवारी एक वर्षे झाले. गेल्या वर्षी त्याचे लग्न धूमधाडाक्यात पार पडले होते. राजकोट येथे या ग्रॅंड वेडिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या बहिणींनीही मनसोक्त आनंद लुटला होता. वरातीमध्ये त्यांनी जबरदस्त डान्स केला होता. जडेजाने त्यावेळी तलवारबाजी केली होती. मात्र, तरीही या बहिणींना एक दु:ख होते. याबाबत बोलताना जडेजाची मोठी बहिण पद्मिनी म्हणाली, भावाच्या लग्नात आम्ही आईला सर्वाधिक मीस करतोय.
आणखी काय सांगितले होते जडेजाच्या बहिणीने...
-जडेजाची बहिण पद्मिनी म्हणाली होती की, ‘मला आनंद वाटतो की, जडेजाने त्याच्या व्यस्ततेतून वेळ काढला. खरे तर त्याचे लग्न आम्हा सर्वांसाठीच भावनिक क्षण आहे. या प्रसंगी आम्हाला आमच्या आईची सर्वाधिक आठवण येत आहे.
- तरीही ‘रवींद्रच्या लग्नात कसल्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतली. हा लग्न सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली होती.
- जडेजाच्या आईचे निधन 2005 मध्ये झाले आहे. जडेजाला पद्मिनी आणि नयना या दोन बहिणी आहेत. नयनाकडे राजकोट येथील जडेजाच्या रेस्तरॉची जबाबदारी आहे.
पुढीस स्लाईड्सवर पाहास, भावाच्या लग्नात दोन्ही बहिणींनी असा केला जबसदस्त डान्स...

Next Article

Recommended