withdrawal of captainship is beneficial for dhoni

Home »Sports »Expert Comment» Withdrawal Of Captainship Is Beneficial For Dhoni

कर्णधारपद सोडणे धोनीसाठीच फायद्याचे!

अयाज मेमन | Jan 05, 2013, 23:55 PM IST

  • कर्णधारपद सोडणे धोनीसाठीच फायद्याचे!

टीम इंडियाकडून अपेक्षा करणे हे एखादे वाईट स्वप्न पाहण्यापेक्षा कमी नाही. पारंपरिक पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर तरी असे म्हणू शकतो. ज्या खेळाशी देशवासीयांच्या भावना जुळलेल्या आहेत त्यात आपली फजिती झाली आहे.


चेन्नईत झालेल्या पहिल्या वनडे क्रिकेट सामन्यात 5 बाद 29 अशा वाईट स्थितीतून सावरण्यासाठी धोनीच्या शतकी खेळीने मदत केली. अन्यथा आपण वाईट पद्धतीने हरलो असतो. त्या सामन्यात आपल्या टीमने ज्याप्रमाणे पुनरागमन केले ते बघून आपल्याकडे क्षमता आहेच, असे म्हणू शकतो. मात्र, दुसरीकडे आपण कोलकाता येथे झालेल्या दुसºया वनडेत 251 धावांचे सोपे लक्ष्य गाठू शकलो नाही. आपला 85 धावांच्या मोठ्या अंतराने पराभव झाला आणि मालिकेत पुनरागमन करू शकलो नाही. कर्णधार धोनीच्या या मताशी मी सहमत आहे की, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सुरेश रैना आणि युवराजसारखे दिग्गज सुपरफ्लॉप ठरल्याने टीमवर दबाव वाढला आणि आपला पराभव झाला. बघितले तर धोनीला गोलंदाजांचीसुद्धा पुरेशी मदत मिळालेली नाही. आपले बरेच गोलंदाज जखमी असल्यामुळे आपसातील ताळमेळ बिघडले आहे. टीमकडून भरपूर मदत मिळाली तरच एखादा कर्णधार यशस्वी ठरत असतो. यात धोनी दुर्दैवी म्हणावा लागेल. सर्व काही आपल्याशी प्रतिकूल होत असताना आपल्याला कर्णधारपदावरून दूर केले जाण्याआधीच त्याने तत्काळ पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे मला वाटते. त्याच्या राजीनाम्यानंतर टीम इंडियाचे प्रदर्शन सुधारेल, असेही घडू शकते. तसेसुद्धा गेल्या 18 महिन्यांत धोनीच्या नेतृत्वात टीमने खास दिवे लावलेले नाहीत. बघितले तर धोनी बर्फाच्या अशा थरावर स्केट करतोय, ज्याला खूप दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीत त्याने कर्णधारपद वाचवले तरच मोठे नवल. कोणत्या न कोणत्या स्वरूपातून त्याला नेतृत्व सोडावे लागू शकते.


गेल्या एक वर्षात टीम इंडियाचे बरेच स्थिरावलेले खेळाडू बाहेर झाले. बरेच खेळाडू आले आणि गेलेही. टीम सध्या परिवर्तनाच्या काळातून जात आहे. अशात नवोदितांना अधिक संधी मिळत आहेत. आपल्या सीनियर्सने ज्याप्रमाणे खूप मेहनत घेऊन टीमला मोठे यश मिळवून दिले, त्याचप्रमाणे नवोदितांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतील.

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: withdrawal of captainship is beneficial for dhoni
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext