Home >> Sports >> From The Field

From The Field

 • आता रवी शास्त्री कोचच्या शर्यतीत, क्रिकेट फॅन्स काढत आहेत असा राग
  स्पोर्ट्स डेस्क- अनिल कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचे पद खाली झाले आहे. पण आता माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी सुद्धा या पदासाठी अर्ज केला आहे. यानंतर बोलले जाऊ लागले आहे की, शास्त्रींनाच ही जबाबदारी सोपवली जाणार आहे. याचे मुख्य कारण आहे, विराट कोहलीसोबत त्यांचे असलेले ट्यूनिंग. या दोघांत खूपच चांगले जमत असल्याचे सर्वांनाच माहित आहे. मात्र, या वृत्ताने क्रिकेट फॅन्स एकदम नाराज झाले आहेत. अनेक फॅन्सनी तर म्हटले आहे की, कुंबळेंच्या राजीनाम्यामागे विराट...
  June 28, 05:06 PM
 • चिनी कंपनी VIVO पुन्हा बनली IPL स्पॉन्सर, इंडियन फॅन्सनी असा व्यक्त केला संताप
  स्पोर्ट्स डेस्क- चायनीज मोबाईल कंपनी वीवो पुन्हा एकदा आयपीएल टायटल स्पॉन्सर बनला आहे. वीवोने 2199 कोटी रुपयांची बोली लावत पुढील पाच वर्षासाठी ही स्पॉन्सरशिप खरेदी केली आहे. एका चायनीज कंपनीसोबत ही डील केल्याने अनेक क्रिकेट फॅन्स नाराज झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर जाहीर आपली नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर क्रिकेट फॅन्स चायना बॉर्डरपासून ते पाकिस्तान प्रकरणी भारतविरोधी भूमिका घेतल्याने चीनशी नाराज आहेत. फॅन्सच्या म्हणण्यानुसार, एकीकडे चीन भारताविरोधात दररोज काहींना काही हरकत...
  June 28, 12:08 PM
 • इंडियाला भारी पडला होता 140 kg चा बॉलर, विराटवर गाजवले होते वर्चस्व
  स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेट वर्ल्डमध्ये अनेक जाड क्रिकेटर्स झाले आहेत. यात सर्वात पहिले नाव येते ते बर्मूडाच्या ड्वेन लेवरॉकचे. मात्र वेस्ट इंडीजमध्ये सुद्धा असाच एक क्रिकेटर काही दिवसापासून चर्चेत आहे. तो आहे 140 किलोचा रहकीम कॉर्नवाल. रहकीमने काही दिवसापूर्वी इंग्लंडविरूद्ध एका प्रॅक्टिस मॅचमध्ये 59 धावांची खेळी केल्याने चर्चेत आला होता. मात्र, ही चर्चा त्याच्या खेळाची नव्हे, तर जाडजूड शरीरावरून केली होती. रहकीमचा जन्म अॅंटिगुआ येथे झाला आहे. जेथे टीम इंडियाला वेस्ट इंडीजविरूद्ध वनडे...
  June 28, 10:26 AM
 • पाकिस्तानचा इमाद वसीम नंबर वन टी-20 गोलंदाज! तर भारताचा बुमराह दुसरा
  द्य दुबई- आयसीसीकडून नुकत्याच जाहीर करण्यात अालेल्या टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा फिरकीपटू इमाद वसीम जगातला नंबर वन टी-२० गोलंदाज बनला आहे. द. आफ्रिका-इंग्लंड टी-२० मालिकेनंतर आयसीसीने ही क्रमवारी जाहीर केली. टी-२० फलंदाजांच्या यादीत भारताचा विराट कोहली नंबर वन फलंदाज आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत इमाद वसीमने आफ्रिकेच्या ताहीरला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. ताहीर जानेवारीपासून अव्वलस्थानी होता. इंग्लंडविरुद्ध मालिकेत सुमार प्रदर्शन इम्रान ताहीरच्या अंगलट आले. सुमार...
  June 28, 03:00 AM
 • कोहली- रवी शास्त्रींची जुगलबंदी पुन्हा रंगणार? कोचची निवड होणार रोमांचक
  नवी दिल्ली- कोचच्या रूपात बीसीसीआय आणि विराट कोहलीची पहिली पसंती रवी शास्त्री असल्याचे मानले जात आहे. शास्त्री यांनी कोच पदासाठी अर्ज केल्याने त्यांची या पदावर नियुक्ती होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात अाहे. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने अर्ज प्रक्रियेची मुदत वाढवल्यानंतर रवी शास्त्रीसुद्धा कोच पदासाठी अर्ज करणार आहेत. शास्त्री म्हणाले, हो, मी कोच पदासाठी अर्ज करण्याचे ठरवले आहे. रवी शास्त्री याआधी भारतीय क्रिकेट संघाचे संचालक होते. मागच्या वर्षी अनिल कुंबळे यांची कोच म्हणून...
  June 28, 03:00 AM
 • न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी समिती गठित, बीसीसीआयचा निर्णय
  नवी दिल्ली- वरिष्ठ क्रिकेट प्रशासक राजीव शुक्ला आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयने सातसदस्यीय समितीमध्ये निवड केली आहे. ही समिती न्या. लोढा समितीच्या काही वादग्रस्त सुधारणावादी सूचनांचा अभ्यास करेल. लोढा समितीच्या शिफारशीनुसार न्यायालयाच्या काही सूचनांना राज्य संघटनांचा विरोेध आहे. बीसीसीआयच्या आमसभेच्या विचारविनिमयासाठी न्यायालयाच्या आदेशासंदर्भात गंभीर विषयांची ओळख करून त्याबाबत सविस्तर माहिती घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. ही...
  June 28, 03:00 AM
 • विराट कोहलीचे कोणत्या देशात किती फॅन्स, यादीत पाकिस्तानचा समावेश
  स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियातील भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू ठरला आहे. त्याच्या लोकप्रियतेचा ग्राफ सातत्याने वाढत चालला आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे 3.5 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. खास बाब म्हणजे त्याची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानसारख्या देशात सुद्धा आहे. यात 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स तर मागील सहा महिन्यांत जोडले गेले आहेत. या दिग्गजांना टाकले मागे... - विराटने पॉपुलॅरिटीत अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान आणि प्रियंका...
  June 27, 09:54 AM
 • भारताच्या विजयात कुलदीप, भुवनेश्वर, रहाणे चमकले..! आता तिसरा वनडे 30 जून रोजी
  पोर्ट ऑफ स्पेन- चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (३/५०) आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (२/९) घातक गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने मालिकेतील दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडीजला १०५ धावांच्या मोठ्या अंतराने हरवले. कुलदीप, भुवनेश्वरच्या गोलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडीजला ६ बाद २०५ धावा काढता आल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना पावसाचा व्यत्यय असलेल्या सामन्यात ४३ षटकांत ५ बाद ३१० धावा काढल्या होत्या. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना २३ जून रोजी...
  June 27, 02:28 AM
 • भारताचा वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय, रहाणे-कुलदीप चमकले
  पोर्ट ऑफ स्पेन- भारताने पाच सामन्याच्या वन डे मालिकेतील दुस-या सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. धावांनुसार कॅरेबियन भूमीवर भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. या आधी भारताचा सर्वात मोठा विजय 102 धावांचा होता जो जुलै 2013 मध्ये मिळवला होता. रविवारी झालेल्या या सामन्यात इंडियन क्रिकेटर्सनी सर्वच आघाड्यावर विंडिजच्या अनुभव नसलेल्या टीमवर वर्चस्व राखले. भारताने हा सामना सहज खिशात टाकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 43-43 षटकाचा झाला सामना... - पहिल्या सामन्याप्रमाणेच दुस-या वन...
  June 26, 12:32 PM
 • पुढचा कोच कोहलीला विचारून ठरणार नाही : रॉय, नव्या कोचच्या निवडीत असेल पारदर्शकता
  मुंबई- टीम इंडियाचा पुढचा कोच विराट कोहलीला विचारून निवडला जाणार नाही, असे बीसीसीआयचे कामकाज बघत असलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद रॉय यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी रॉय यांनी कुंबळेच्या कामाची स्तुती केली. त्याची कारकीर्द शानदार होती. कुंबळे कुठेच दोषी नाही, असेही त्यांनी म्हटले. विनाेद रॉय म्हणाले, टीम इंडियाचा पुढचा कोच क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सचिन, सौरव गांगुली व लक्ष्मण पारदर्शकता ठेवून निवडतील. हे तिघे श्रेष्ठ कोच निवडण्यास सक्षम आहेत. कोचच्या निवडीत कोहलीची...
  June 26, 03:00 AM
 • वनडे मालिका: अजिंक्य रहाणेचे शानदार शतक; काेहली, शिखर धवनही चमकले
  त्रिनिदाद-टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेने रविवारी यजमान विंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये शानदार शतक ठाेकले. त्याने झंझावाती १०३ धावांची खेळी केली. याशिवाय शिखर धवन (६३), कर्णधार विराट काेहली (८७) यांनी तुफानी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांपर्यंत पाच गड्यांच्या माेबदल्यात ३१० धावा काढल्या. सलामीचा सामना पाण्यात गेला. टीम इंडियाचा स्फाेटक फलंदाज युवराज सिंग (१४) फारसी छाप पाडू शकला नाही. यजमान विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम...
  June 26, 03:00 AM
 • एकदिवसीय सामन्यात जडेजा देतोय दुप्पट धावा, तर सामन्यागणिक बळी घेण्यात अश्विन सपशेल अपयशी
  मुंबई - चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ ची भारत आणि पाकिस्तानदरम्यानची अंतिम लढत. पाकच्या सलामीच्या जोडीने भारतीय वेगवान गोलंदाजांची सुरुवातीपासूनच चिंधड्या उडवायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व अपेक्षा फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर टिकून होत्या. कर्णधार कोहलीने आधी अश्विनला आणि मग जडेजाला गोलंदाजीस बोलावले, पण कसोटी क्रमवारीत अव्वल दोन स्थानांवर असलेले दिग्गज फिरकीपटू सपशेल अपयशी ठरले. दोघांनी १८ षटके गोलंदाजी केली, पण त्या बदल्यात तब्बल १३७ धावा दिल्या. फक्त हाच सामना...
  June 25, 03:16 AM
 • महिला वर्ल्डकप : मिताली राजचा विश्वविक्रम; 44 वर्षांत सलग 7 अर्धशतके ठाेकणारी पहिली
  डर्बी - कर्णधार मिताली राजने (७१) विश्वविक्रमी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाला महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत शानदार विजय मिळवून दिला. तिने ४४ वर्षांच्या इतिहासात हा विक्रम केला. भारताने सलामीच्या सामन्यात शनिवारी तीन वेळच्या चॅम्पियन इंग्लंडवर मात केली. भारताने ४७.३ षटकांत ३५ धावांनी सलामीचा सामना जिंकला. या विजयाने गत उपविजेत्या भारताने स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. अाता भारताचा दुसरा सामना गुरुवारी विंडीजशी हाेईल. महाराष्ट्राची युवा खेळाडू स्मृती मंधना...
  June 25, 03:03 AM
 • IND Vs WI : पावसामुळे रद्द झाला पहिला वनडे, अजिंक्य राहाणे-शिखर धवनची झंझावती खेळी
  त्रिनिदाद - यजमान विंडीजविरुद्ध सलामीच्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाचे युवा फलंदाज अजिंक्य रहाणे (६२) अाणि शिखर धवन (८७) चमकले. त्यांनी यजमानांच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना शतकी भागीदारी केली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ३९.२ षटकांपर्यंत ३ गड्यांच्या माेबदल्यात १९९ धावांची खेळी केली. यजमान विंडीजकडून जाेसेफने एक विकेट घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना बराच वेळ थांबवण्यात अाला. नाणेफेक जिंकून यजमान विंडीज संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय...
  June 24, 09:17 AM
 • भारत-इंग्लंड सलामी सामना अाज रंगणार, इंग्लंडमध्ये अाजपासून महिला वर्ल्डकपला सुरुवात
  लंडन - महिलांच्या अायसीसी विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेला शनिवरपासून सुरुवात हाेणार अाहे. इंग्लंडमध्ये ही स्पर्धा अायाेजित करण्यात अाली अाहे. गत उपविजेता भारत अाणि तीन वेळचा विश्वविजेता इंग्लंड संघांमध्ये सलामीचा सामना रंगणार अाहे. भारतीय महिला संघ स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला वर्ल्डकपमध्ये खेळणार अाहेत. दुसरीकडे यजमान इंग्लंडला अापल्या घरच्या मैदानावर विजयी सलामीची अाशा अाहे. वर्ल्डकपच्या सराव...
  June 24, 06:44 AM
 • DvM SPECIAL: वर्ल्डकपसाठी संघ उभारण्याची प्रक्रिया सुरू, अव्वल युवा खेळाडूंमध्ये रंगणार चुरस
  मुंबई - २०१९च्या विश्वचषकासाठीचा संघ उभारणे ही आगामी कालखंडाची प्रमुख गरज असेल. त्या दृष्टीने यापुढील आयपीएलपासून स्थानिक स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येकाची कामगिरी मोजली जाईल. विश्वचषकासाठीच्या संघातील सर्वोत्तम १५ खेळाडूंसाठीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक खेळाडू तणावाखालील परिस्थितीतून कसा मार्ग काढतो, दडपण कसे हाताळतो आणि कामगिरी करतो, हाच यापुढील निवडीचा निकष असेल. सध्या खेळत असलेले १५ आणि त्यांच्या जागा घेऊ शकणारे, भारतीय संघाच्या प्रवेशासाठी...
  June 24, 03:07 AM
 • टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक कुंबळेंची हाेती साडेसात काेटी मानधनाची मागणी
  नवी दिल्ली - टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी अापल्या कराराच्या पुनर्गठनसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला १९ पानांचा प्रस्ताव मांडला हाेता. यामध्ये कुंबळेंनी चक्क वाढीव मानधनाची मागणी केली हाेती. मुख्य प्रशिक्षकाची कमाई ही कर्णधाराच्या मानधनापेक्षा ६० टक्के अधिक असावी,अशी त्यांची मागणी हाेती. त्यामुळे त्यांनी अापल्याला साडेसहा काेटींएेवजी वाढवून साडेसात काेटींचे मानधन देण्याची मागणी केली हाेती. गत मे महिन्यात त्यांनी हा प्रस्ताव बीसीसीअायसमाेर ठेवला...
  June 24, 03:01 AM
 • कुंबळेप्रकरणी विराटने सोडले मौन, कोहलीने संकुचित मनोवृत्तीचे घडविले दर्शन!
  नवी दिल्ली- मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतत मौन धारण करून बसलेल्या कर्णधार विराट कोहलीने अखेर भाष्य केले आहे.अनिलभाईंनी त्यांचे मत मांडले असून राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनिल कुंबळे यांच्याविषयी आपल्या मनात असलेला आदर कायम राहणार आहे. त्यांनी पद सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचाही मी सन्मान करतो, अशा शब्दांत कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी प्रतिक्रिया दिली. विराट कोहली म्हणाला, अनिल कुंबळेने दिलेल्या राजीनाम्याच्या...
  June 23, 01:42 PM
 • विंडीजविरुद्ध आज भारताचा पहिला वनडे, दोन्ही संघ असे...
  पोर्ट ऑफ स्पेन - मैदानाबाहेर झालेल्या विराट कोहली-अनिल कुंबळे वादानंतर आता शुक्रवारी टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱ्यावर यजमान संघाविरुद्ध मालिकेतील पहिला वनडे खेळेल. कुंबळे प्रकरणाचा वाद मागे सोडून टीम इंडिया विजयासाठी मैदानावर उतरेल. कुंबळेच्या अनुपस्थितीत फलंदाजी कोच संजय बांगरकडे टीम इंडियाची जबाबदारी असेल. मागच्या वर्षी कॅरेबियन दौऱ्यापासून अनिल कुंबळेच्या प्रशिक्षकपदाच्या करिअरला सुरुवात झाली होती. मात्र, दुर्दैवाने या वेळी अनिल कुंबळे संघासोबत नसेल. चॅम्पियन्स ट्रॉफीतील...
  June 23, 06:54 AM
 • ल्युक रोंचीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, वनडेत 170 सर्वोच्च धावसंख्या
  वेलिंग्टन - न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज ल्युक रोंचीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ल्युक रोंचीने न्यूझीलंडच्या आधी ऑस्ट्रेलियाकडूनसुद्धा आंतरराष्ट्रीय खेळले आहे. यानंतर तो न्यूझीलंड संघात सामील झाला. ३६ वर्षीय रोंचीने ऑस्ट्रेलियाकडून २००८ आणि २००९ या काळात ४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन टी-२० सामने खेळले होते. यानंतर तो २०१३ मध्ये आपले शेजारचे राष्ट्र न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. त्याने न्यूझीलंडकडून...
  June 23, 03:05 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा