Home >> Sports >> From The Field

From The Field

 • ऑलिम्पिकवीराला नमवून श्रीकांतचा ऑस्ट्रेलियन ओपनवर कब्जा, एका आठवड्यात दुसरा किताब
  स्पोर्टस डेस्क - भारतीय बॅडमिंटन स्टार किदांबी श्रीकांतने ऑलिम्पिक चॅम्पियन चेन लाँगला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजच्या सिंगल्सचे विजेतेपद पटकावले. एक आठवड्यात त्याने हा दुसरा आंतरराष्ट्रीय किताब पटकावला आहे. याआधी श्रीकांतने गत आठवड्यात इंडोनेशिया ओपनच्या फायनलमध्ये जपानच्या काजुमासा सकाईला पराभूत करून किताबावर कब्जा केला होता. करिअरचा चौथा सुपर सिरीज किताब... - रविवारी खेळलेल्या या अंतिम सामन्यात त्याने लाँगला सरळ सेट्समध्ये 22-20, 21-16 ने हरवून लगातार दुसरा आणि आपल्या...
  03:24 PM
 • एकदिवसीय सामन्यात जडेजा देतोय दुप्पट धावा, तर सामन्यागणिक बळी घेण्यात अश्विन सपशेल अपयशी
  मुंबई - चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ ची भारत आणि पाकिस्तानदरम्यानची अंतिम लढत. पाकच्या सलामीच्या जोडीने भारतीय वेगवान गोलंदाजांची सुरुवातीपासूनच चिंधड्या उडवायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व अपेक्षा फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर टिकून होत्या. कर्णधार कोहलीने आधी अश्विनला आणि मग जडेजाला गोलंदाजीस बोलावले, पण कसोटी क्रमवारीत अव्वल दोन स्थानांवर असलेले दिग्गज फिरकीपटू सपशेल अपयशी ठरले. दोघांनी १८ षटके गोलंदाजी केली, पण त्या बदल्यात तब्बल १३७ धावा दिल्या. फक्त हाच सामना...
  03:16 AM
 • महिला वर्ल्डकप : मिताली राजचा विश्वविक्रम; 44 वर्षांत सलग 7 अर्धशतके ठाेकणारी पहिली
  डर्बी - कर्णधार मिताली राजने (७१) विश्वविक्रमी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाला महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत शानदार विजय मिळवून दिला. तिने ४४ वर्षांच्या इतिहासात हा विक्रम केला. भारताने सलामीच्या सामन्यात शनिवारी तीन वेळच्या चॅम्पियन इंग्लंडवर मात केली. भारताने ४७.३ षटकांत ३५ धावांनी सलामीचा सामना जिंकला. या विजयाने गत उपविजेत्या भारताने स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. अाता भारताचा दुसरा सामना गुरुवारी विंडीजशी हाेईल. महाराष्ट्राची युवा खेळाडू स्मृती मंधना...
  03:03 AM
 • IND Vs WI : पावसामुळे रद्द झाला पहिला वनडे, अजिंक्य राहाणे-शिखर धवनची झंझावती खेळी
  त्रिनिदाद - यजमान विंडीजविरुद्ध सलामीच्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाचे युवा फलंदाज अजिंक्य रहाणे (६२) अाणि शिखर धवन (८७) चमकले. त्यांनी यजमानांच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना शतकी भागीदारी केली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ३९.२ षटकांपर्यंत ३ गड्यांच्या माेबदल्यात १९९ धावांची खेळी केली. यजमान विंडीजकडून जाेसेफने एक विकेट घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना बराच वेळ थांबवण्यात अाला. नाणेफेक जिंकून यजमान विंडीज संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय...
  June 24, 09:17 AM
 • भारत-इंग्लंड सलामी सामना अाज रंगणार, इंग्लंडमध्ये अाजपासून महिला वर्ल्डकपला सुरुवात
  लंडन - महिलांच्या अायसीसी विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेला शनिवरपासून सुरुवात हाेणार अाहे. इंग्लंडमध्ये ही स्पर्धा अायाेजित करण्यात अाली अाहे. गत उपविजेता भारत अाणि तीन वेळचा विश्वविजेता इंग्लंड संघांमध्ये सलामीचा सामना रंगणार अाहे. भारतीय महिला संघ स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला वर्ल्डकपमध्ये खेळणार अाहेत. दुसरीकडे यजमान इंग्लंडला अापल्या घरच्या मैदानावर विजयी सलामीची अाशा अाहे. वर्ल्डकपच्या सराव...
  June 24, 06:44 AM
 • DvM SPECIAL: वर्ल्डकपसाठी संघ उभारण्याची प्रक्रिया सुरू, अव्वल युवा खेळाडूंमध्ये रंगणार चुरस
  मुंबई - २०१९च्या विश्वचषकासाठीचा संघ उभारणे ही आगामी कालखंडाची प्रमुख गरज असेल. त्या दृष्टीने यापुढील आयपीएलपासून स्थानिक स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येकाची कामगिरी मोजली जाईल. विश्वचषकासाठीच्या संघातील सर्वोत्तम १५ खेळाडूंसाठीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक खेळाडू तणावाखालील परिस्थितीतून कसा मार्ग काढतो, दडपण कसे हाताळतो आणि कामगिरी करतो, हाच यापुढील निवडीचा निकष असेल. सध्या खेळत असलेले १५ आणि त्यांच्या जागा घेऊ शकणारे, भारतीय संघाच्या प्रवेशासाठी...
  June 24, 03:07 AM
 • टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक कुंबळेंची हाेती साडेसात काेटी मानधनाची मागणी
  नवी दिल्ली - टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी अापल्या कराराच्या पुनर्गठनसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला १९ पानांचा प्रस्ताव मांडला हाेता. यामध्ये कुंबळेंनी चक्क वाढीव मानधनाची मागणी केली हाेती. मुख्य प्रशिक्षकाची कमाई ही कर्णधाराच्या मानधनापेक्षा ६० टक्के अधिक असावी,अशी त्यांची मागणी हाेती. त्यामुळे त्यांनी अापल्याला साडेसहा काेटींएेवजी वाढवून साडेसात काेटींचे मानधन देण्याची मागणी केली हाेती. गत मे महिन्यात त्यांनी हा प्रस्ताव बीसीसीअायसमाेर ठेवला...
  June 24, 03:01 AM
 • कुंबळेप्रकरणी विराटने सोडले मौन, कोहलीने संकुचित मनोवृत्तीचे घडविले दर्शन!
  नवी दिल्ली- मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतत मौन धारण करून बसलेल्या कर्णधार विराट कोहलीने अखेर भाष्य केले आहे.अनिलभाईंनी त्यांचे मत मांडले असून राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनिल कुंबळे यांच्याविषयी आपल्या मनात असलेला आदर कायम राहणार आहे. त्यांनी पद सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचाही मी सन्मान करतो, अशा शब्दांत कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी प्रतिक्रिया दिली. विराट कोहली म्हणाला, अनिल कुंबळेने दिलेल्या राजीनाम्याच्या...
  June 23, 01:42 PM
 • विंडीजविरुद्ध आज भारताचा पहिला वनडे, दोन्ही संघ असे...
  पोर्ट ऑफ स्पेन - मैदानाबाहेर झालेल्या विराट कोहली-अनिल कुंबळे वादानंतर आता शुक्रवारी टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱ्यावर यजमान संघाविरुद्ध मालिकेतील पहिला वनडे खेळेल. कुंबळे प्रकरणाचा वाद मागे सोडून टीम इंडिया विजयासाठी मैदानावर उतरेल. कुंबळेच्या अनुपस्थितीत फलंदाजी कोच संजय बांगरकडे टीम इंडियाची जबाबदारी असेल. मागच्या वर्षी कॅरेबियन दौऱ्यापासून अनिल कुंबळेच्या प्रशिक्षकपदाच्या करिअरला सुरुवात झाली होती. मात्र, दुर्दैवाने या वेळी अनिल कुंबळे संघासोबत नसेल. चॅम्पियन्स ट्रॉफीतील...
  June 23, 06:54 AM
 • ल्युक रोंचीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, वनडेत 170 सर्वोच्च धावसंख्या
  वेलिंग्टन - न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज ल्युक रोंचीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ल्युक रोंचीने न्यूझीलंडच्या आधी ऑस्ट्रेलियाकडूनसुद्धा आंतरराष्ट्रीय खेळले आहे. यानंतर तो न्यूझीलंड संघात सामील झाला. ३६ वर्षीय रोंचीने ऑस्ट्रेलियाकडून २००८ आणि २००९ या काळात ४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन टी-२० सामने खेळले होते. यानंतर तो २०१३ मध्ये आपले शेजारचे राष्ट्र न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. त्याने न्यूझीलंडकडून...
  June 23, 03:05 AM
 • कुंबळेंना पुन्हा हेड कोच म्हणून संधी दिल्यास कोहलीने दिला होता कर्णधारपद सोडण्याचा इशारा
  नवी दिल्ली- प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्या वादानंतर आता नवनव्या घटना समोर येत आहेत. टेलीग्राफ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांतील संबंध एवढे ताणले गेले होते की, कुंबळेंनी जर मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला नसता तर विराट कोहली कर्णधारपद सोडण्याचा विचार करत होता. विराट कोहलीला कुंबळेंसोबत कोणत्याही परिस्थितीत काम करायचे नव्हते. बीसीसीआय किंवा सचिन-सौरव-लक्ष्मण यांच्या निवड सल्लागार समितीने जर कुंबळेंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असता तर विराट काही...
  June 22, 04:56 PM
 • विराटच जर प्रशिक्षक ठरवणार असेल तर सचिन-सौरव-लक्ष्मणची गरजच काय?- गावसकर
  नवी दिल्ली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच जर त्याचा व संघाचा प्रशिक्षक कोण असावा हे ठरवणार असेल तर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या निवड सल्लागार समितीची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट अॅंड कंपनीवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. कर्णधाराची पसंती किंवा नापसंतीच जर एवढी महत्त्वाची आहे तर सल्लागार समितीचे कामच काय? असे विचारत सल्लागार समितीलाही धारेवर धरले आहे. कर्णधार विराट कोहली याच्या घमेंडीमुळेच मुख्य प्रशिक्षक...
  June 22, 04:47 PM
 • वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वात जास्त काढणारे भारतीय, रोहितपेक्षाही मागे आहे धोनी
  स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 23 जून (शुक्रवार)पासून सुरु होत आहे. भारतीय संघ तेथे कॅरेबियन टीमसोबत 5 वनडे आणि 1 टी-20 मॅचची मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी आहे. विंडिजविरूद्ध सर्वात जास्त बनविणा-या भारतीय खेळाडूंत एमएस धोनी 11 व्या स्थानावर आहे. त्याने कॅरेबियन टीमविरूद्ध 28 मॅच खेळत 53.21 च्या सरासरीने 745 धावा केल्या आहेत. या वृत्तात आम्ही तुम्हाला विंडिजविरूद्ध सर्वात जास्त करणा-या भारतीय फलंदाजांची माहिती देणार आहोत. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कॅरेबियन...
  June 22, 12:57 PM
 • एका मुलीच्या आईच्या प्रेमात पडले होते अनिल कुंबले, अशी आहे फिल्मी Love स्टोरी
  स्पोर्ट्स डेस्क- विराट कोहलीसोबत मतभेद झाल्या कारणाने राजीनामा दिलेले टीम इंडियाचे हेड कोच अनिल कुंबळे सध्या चर्चेत आहेत. कुंबळेंचे जबरदस्त क्रिकेट करियरसोबतच त्यांची पर्सनल लाईफ सुद्धा खूपच इंटरेस्टिंग राहिली आहे. टीम इंडियात जंबो नावाने प्रसिद्ध राहिलेला हा महान स्पिनर एक विवाहित महिलेच्या प्रेमात पडला होता. आणि सुरु झाली प्रेमाची सेकंड इनिंग... - आपल्या क्रिकेट करियर दरम्यान अनिल कुंबळे एक विवाहित महिला चेतनाच्या प्रेमात पडले होते. चेतनाचा पहिला पती एक बिजनेसमॅन होता. ती...
  June 22, 10:41 AM
 • कुंबळे-विराट यांच्यात 6 महिन्यांपासून अबोला; गावसकर म्हणाले- 'त्या' खेळाडूंना संघाबाहेर काढा
  नवी दिल्ली - टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर चांगलेच भडकले आहेत. ज्या खेळाडूंनी प्रशिक्षक अनिल कुंबळेची तक्रार केली, त्यांना संघाबाहेर केले पाहिजे, असे गावसकर यांनी म्हटले. अनिल कुंबळे यांनी मंगळवारी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कुंबळेशिवाय टीम इंडिया विंडीजला रवाना झाली. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात सहा महिन्यांपासून अबोला होता असा खळबळजनक खुलासा बीसीसीआयने केला आहे. कुंबळेने जेव्हापासून पद सांभाळले,...
  June 22, 10:12 AM
 • कुंबळेंच्या राजीनाम्याला विराट जबाबदार, व्हिलन ठरवत फॅन्स असा काढताहेत राग
  स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी मंगळवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर कर्णधार विराट कोहलीचे त्यांच्याशी मतभेद असल्याचे पुढे आले. कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर टि्वटरवर सर्वांचे आभार मानणारे एक पत्र लिहले आहे. ज्यात मागील वर्षभरातील भारतीय संघाच्या कामगिरीचे श्रेय त्यांनी कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या खेळाडूला दिले आहे. कुंबळेंच्या राजीनाम्याने भारतीय क्रिकेट फॅन्स दु:खी झाले आहेत. या घटनेमुळे नाराज झालेल्या फॅन्सनी या प्रकरणी...
  June 22, 10:07 AM
 • कोहलीला माझी 'स्टाईल' नापसंत, तरीही वर्षभरातील यशाचे श्रेयही त्यालाच- अनिल कुंबळे
  नवी दिल्ली- अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर धन्यवादाची एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मागील वर्षभरात टीम इंडियाच्या यशाचे श्रेय कर्णधार विराट कोहली आणि खेळाडूंना दिले आहे. आपल्या पोस्टमध्ये कुंबळे म्हणतात की, सोमवारी मला पहिल्यांदाच BCCI कडून सांगितले गेले की, कर्णधार (विराट) ला माझी कामाची पद्धत आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून काही अडचणी आहेत. कुंबळे आणि विराट यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या मागील काही दिवसापासून येत होत्या. कुंबळेंचा करार...
  June 21, 12:46 PM
 • धक्कादायक : अनिल कुंबळेे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार
  नवी दिल्ली - कर्णधार विराट काेहलीसाेबतच्या वादातून टीम इंडियाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने मंगळवारी अापल्या पदाचा राजीनामा दिला. मंगळवारीच त्याचा एक वर्षापर्यंतचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीअाय) कुंबळेला विंडीज दाैऱ्यापर्यंतची मुदतवाढ दिली हाेती. त्यापूर्वीच कुंबळेने पद साेडले. त्यामुळे प्रशिक्षकाविना भारतीय संघ विंडीज दाैऱ्यावर रवाना झाला. येत्या २४ जूनपासून भारत अाणि विंडीज यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात हाेणार अाहे....
  June 21, 09:43 AM
 • भारतीयांचे वनडेत 10 मोठे विक्रम, त्यांच्यासमोर कुठे आहेत पाकिस्तानी?
  स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाचा 180 धावांनी दारूण पराभव झाला. मात्र, टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाने शानदार खेळ दाखवला. विराट कोहलीने तेथे सर्वात वेगाने वनडेत 8000 धावा पूर्ण केल्या. त्याने हा पराक्रम 175 इनिंगमध्ये केला आणि दक्षिण अफ्रिकेच्या ए बी डिविलियर्सचा विक्रम मोडला. डिविलियर्सला 8 हजार धावांसाठी 182 इनिंग खेळाव्या लागल्या. पाकिस्तानी क्रिकेटरमध्ये अन्वर सर्वात पुढे... - पाकिस्तानी फलंदाजात हा विक्रम माजी पाक क्रिकेटर सईद अन्वरच्या...
  June 20, 10:34 AM
 • चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाला 180 धावांनी पाराभूत केले. सामना हारल्यानंतरही टीम इंडियाने आपली खेळाडू वृत्ती दाखवली. विराट कोहली, युवराज सिंगसह टीमचे खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. भारतीय खेळाडूं काही वेळ पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत विनोद करतांना दिसून आले.
  June 20, 10:05 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा