Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • सचिनचे टीम इंडियासाठी फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग, अनुष्कासह पोहचला विराट
  मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बनलेल्या बायोपिक फिल्म सचिनः अ बिलियन ड्रीम्स 26 मे रोजी रिलीज होत आहे. फिल्म रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी सचिनने मुंबईत टीम इंडियातील खेळाडूंसाठी या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले. ज्याला कर्णधार विराट कोहली सह टीम इंडियातील सर्व खेळाडू पोहचले. यावेळी विराट गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह दिसला. तर, शिखर धवन मुलगा जोरावरसह फिल्म पाहायला पोहचला होता. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फिल्मच्या प्रीमियरवेळी क्रिकेटर्सचा कसा होता अंदाज...
  10:29 AM
 • या व्हायरल फोटोत नीता अंबानींसमवेत कोण आहे ही व्यक्ती, माहित आहे तुम्हाला?
  स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनल्यानंतर टीम ओनर नीता अंबानींनी खेळाडू आणि टीम स्टाफसोबत विजयाचा जल्लोष केला. या दरम्यान त्यांचा एक फोटो ही समोर आला होता. फोटोत ज्या व्यक्तीसोबत नीता जल्लोष करत आहेत ती व्यक्ती आहे, मुकेश अंबानीचे कजिन आणि रिलांयन्स इंडस्ट्रीजचे एक्जीक्यूटिव डायरेक्टर निखिल मेसवानी. रिलांयन्समध्ये पार पाडली मोठी जबाबदारी..... - रिलांयन्सच्या वेबसाईटनुसार, मेसवानी यांनी 1986 मध्ये रिलांयन्स ग्रुप ज्वाईन केला. सुरुवातीला ते पेट्रोकेमिकल्स...
  09:54 AM
 • पाकिस्तानवर चर्चा चुकीची, नेहमी तेच प्रश्न विचारले जातात आणि तेच उत्तर मिळते: कोहली
  मुंबई- आम्ही आमचा किताब वाचवण्यासाठी तयार आहोत, असे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले. पहिल्यांदा आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत नेतृत्व करणाऱ्या कोहलीने म्हटले की, आयपीएलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार आहेत. आयपीएल सर्वांसाठीच सरावासारखे होते. आमच्यावर गतचॅम्पियन असल्याचा दबाव असेल. मात्र, हा दबाव मागे टाकावा लागेल. पाकिस्तानविरुद्ध ४ जून रोजी होणाऱ्या सामन्याबाबत कोहली म्हणाला, यावर...
  05:48 AM
 • भारत-पाक क्रिकेट सामना केवळ एक मॅच; धोनी, युवराज सर्वात मजबूत आधारस्तंभ - विराट कोहली
  मुंबई - इंग्लंडमध्ये 1 जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आपला पहिला मॅच 4 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या निमित्त बुधवारी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना आपल्यासाठी केवळ एक मॅच असल्याचे विराट कोहलीने स्पष्ट केले. धोनी, युवराज सर्वात मजबूत आधार स्तंभ - भारत आणि पाकिस्तानचा सामना क्रिकेटच्या चाहत्यांसाठी सर्वात रोमांचित सामना आहे यात शंका नाही. मात्र, आपल्यावर...
  May 24, 08:19 PM
 • झहीरने मुंबईत दिली यंगेजमेंट पार्टी, विराट- अनुष्कासह पोहचले हे सेलेब्स
  स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस सागरिका घाटगेच्या यंगेजमेंटचे फंक्शन मंगळवारी रात्री मुंबईत झाले. ज्यात क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील अनेक स्टार्स सहभागी झाले. आपल्याला आठवत असेलच की, मागील महिन्यात या कपलने आपण यंगेज झाल्याचे सोशल मीडियाद्वारे कळविले होते. मात्र, त्यावेळी झहीर IPL मध्ये बिजी असल्याने कोणतेही फंक्शन ठेवू शकला नव्हता. त्यामुळे आता आयपीएल संपल्यानंतर ही सेरेमनी पार पडली. या फंक्शनमध्ये अनेक सेलेब्सनी पोहचत नव्या कपलला शुभेच्छा...
  May 24, 12:19 PM
 • कोणाच्या हातात आहे मुंबईची आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी, कोण आहे ही Mystery गर्ल?
  स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर एक मिस्ट्री गर्लचा फोटो समोर आला आहे जिच्या हातात आयपीएल ट्रॉफी सुद्धा आहे. काय तुम्ही ओळखता की या फोटोत दिसणारी ही तरूणी कोण आहे? ही तरूणी दुसरी तिसरी कोणी नसून मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटर क्रुणाल पंड्याचा गर्लफ्रेंड आहे. क्रुणालने आतापर्यंत नाही केला खुलासा... - पंड्या फॅमिलीच्या जवळच्या सूत्रानुसार, क्रुणालच्या गर्लफ्रेंडचे नाव पंखुडी शर्मा आहे. दोघांची यंगेजमेंट झाली असून येत्या डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार...
  May 24, 10:50 AM
 • वय 105 वर्षे, सायकलिंग 1 तासात 23 किमी; रॉबर्ट मर्चंड यांच्या वयासह फिटनेसही वाढत आहे!
  पॅरिस- फ्रान्सचे रॉबर्ट मर्चंड हे नाव जिद्द आणि मेहनतीचे जिवंत उदाहरण आहे. कारण त्यांना जगातील सर्वांत वयस्क सायकलपटू म्हणून घोषित करण्यात आले आहे. वय आहे 105 वर्षे. त्यांनी पॅरिस ग्रां.प्री. मध्ये 100 वर्षांपेक्षा अधिक वयोगटात सहभाग घेतला. एका तासात 22.54 किमी सायकल चालवली. अमेरिकन फिजिओलॉजिकल सोसायटी रॉबर्टवर संशोधन करत असून, वयासह त्यांची फिटनेसही वाढत असल्याचा त्यांचा दावा आहे. मी येथे विक्रम मोडण्यासाठी किंवा करण्यासाठी आलो नाही. 105 व्या वर्षीसुद्धा सायकलिंग करता येते हे सिद्ध...
  May 24, 08:46 AM
 • सुदिरमन कप बॅडमिंटन: भारताची इंडोनेशियावर 4-1 ने मात; बादफेरीच्या आशा कायम
  गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) - भारताने सुदिरमन कप मिश्र टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये माजी चॅम्पियन इंडोनेशियाला ४-१ ने हरवले. या विजयाने भारताच्या बादफेरीत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. सोमवारी भारताचा डेन्मार्ककडून १-४ ने पराभव झाला होता. बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला पाचवे मानांकित इंडोनेशियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते. भारताने पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीत विजय मिळवला. फक्त पुरुष दुहेरीत हरलो. अश्विनी...
  May 24, 07:30 AM
 • जाँटी -होड्सच्या मुलाचाही जन्म मुंबईतच, मुलगी जन्मली तेव्हाही मुंबईला विजेतेपद
  मुंबई- मुंबई इंडियन्सने रविवारी आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्याच दिवशी मुंबईचे फिल्डिंग कोच जाँटी ऱ्होड्स दुसऱ्यांदा पिता बनले. त्यांची पत्नी मेलानी हिने मुंबईच्या सांताक्रूझ रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. यानंतर या दक्षिण आफ्रिकन जोडप्याने बाळाचे नाव नाथन ठेवले. ऱ्होड्स यांना दोन वर्षांची मुलगीसुद्धा आहे. तिचे नाव त्यांनी इंडिया ठेवले आहे. तिचा जन्म 24 एप्रिल 2015 रोजी मुंबईत झाला. त्या सत्रात सुद्धा मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मेलानीची डिलिव्हरी वॉटर बर्थ...
  May 23, 06:43 PM
 • IPL-10: पुण्यावर मुंबईच वरचढ; मुंबई तिसऱ्यांदा विजेता, रोमांचक लढतीत पुण्याचा एका धावेने पराभव
  हैदराबाद -अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभूत करून आयपीएल-१० चे विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सचे हे तिसरे (२०१३, २०१५, २०१७) विजेतेपद ठरले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १२९ धावा काढल्या. पुणे हे लक्ष्य सहज गाठेल, असे वाटत होते. मात्र, मुंबईने शानदार गोलंदाजी करून पुण्याला अवघ्या १२८ धावांत रोखून थरारक विजय मिळवला. विजयासाठी अावश्यक १३० धावांचा पाठलाग करताना पुण्याकडून कर्णधार स्मिथने सर्वाधिक ५१ धावा...
  May 22, 11:43 AM
 • IPL मध्ये कोणत्या वर्षी कोण बनले चॅम्पियन आणि कोण राहिले रनरअप, वाचा ही यादी
  स्पोर्ट्स डेस्क- 47 दिवस चाललेली इंडियन प्रीमियर लीगचा 10 वा हंगाम रविवारी संपला. या हंगामात मुंबई इंडियन्सने चॅम्पियनशिप जिंकत रायजिंग पुणे सुपरजाइंटला केवळ 1 धावेने हरविले. खास बाब म्हणजे मुंबई इंडियन्सने ही चॅम्पियनशिप तिस-यांदा जिंकली आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईटरायडर्स दोन-दोन वेळा IPL चॅम्पियन राहिले आहेत. तर, पुणे पहिल्यांदाच IPL फायनलमध्ये पोहचली होती. पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, आयपीएलच्या मागील 9 हंगामातील विनर आणि रनरअप राहिलेल्या टीमची यादी...
  May 22, 10:29 AM
 • निवृत्तीनंतर सचिन, द्रविडही झाले मालामाल; फक्त खेळाडूच नव्हे तर सपोर्ट स्टाफचीही भरपूर कमाई
  मुंबई -आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या आर्थिक यशाची किरणे फक्त क्रिकेटपटूंच्याच तिजोरीवर पडली नाहीत तर मेंटॉर, कोच, कोचिंग डायरेक्टर, सीईओ, ट्रेनर, फिजिओ, मॅल्युअर, कन्सल्टंट, बॅटिंग कोच, फील्डिंग कोच, बॉलिंग कोच अशा विविध रूपांमध्ये आयपीएल फ्रँचायझींमध्ये वावरणाऱ्यांंनाही या लीगने करोडपती केले. वर्षात ४५ ते ५० दिवस आपली सेवा देण्याच्या मोबदल्यात रणजी दर्जापासून कसोटी क्रिकेट खेळलेल्या निवृत्त कसोटीपटूंनाही आयपीएलने मालामाल केले. प्रारंभीच्या वर्षात या सपोर्ट स्टाफची संख्या, आकार...
  May 22, 08:47 AM
 • भारतीय तिरंदाजी संघ ठरला विश्वविजेता
  शांघाय: भारतीय तिरंदाजी संघाने सरस कामगिरीच्या बळावर शनिवारी विश्वविजेत्याचा बहुमान पटकावला. भारताने तिरंदाजीचा वर्ल्डकपवर नाव काेरले. भारताच्या संघाने पुरुषांच्या कंपाउंड प्रकाराच्या फायनलमध्ये काेलंबियाचा पराभव केला. भारतीय संघाने २२६-२२१ अशा फरकाने अंतिम सामन्यात राेमहर्षक विजय संपादन केला. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर अाणि अमनजित सिंगने सरस खेळीच्या बळावर भारताला विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला. या शानदार विजयासह भारतीय संघ किताबाचा मानकरी ठरला. भारताचा महिला संघ...
  May 21, 02:16 AM
 • सागरिकाने शेयर केला झहीरचा नवा लुक, सोबतच केली मजेशीर कमेंट
  स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर झहीर खानची भावी पत्नी व बॉलिवूड अॅक्ट्रेस सागरिका घाटगेने नुकताच एक फोटो शेयर केला आहे, ज्यात झहीर एकदम नव्या लुकमध्ये दिसत आहे. या फोटोत झहीर क्लीन शेवमध्ये दिसत आहे तसेच त्याने त्याची हेयर स्टाईलमध्ये बदल केला आहे. नेमका तोच फोटो शेयर करत सागरिकाने कॅप्शनमध्ये एक फनी कमेंट करत झहीरला अजनबी म्हटले. सागरिकाने लिहले की, Came back home to this stranger @zakkhan34 doing #breakthebeard rather well. (या अनोळख्या व्यक्तीसोबत घरी पोहचली आहे). सागरिकाने असे यासाठी लिहले कारण, झहीरने खूप दिवसानंतर दाढी काढली...
  May 20, 10:51 AM
 • कुलभूषण जाधवबाबत कैफ बोलताच या पाकिस्तानीने दिली ही धमकी, वाचा टि्वट्स
  स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफला पाकिस्तानी ट्विटर फॉलोअर्सनी नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानींनी म्हटले की, कैफ मुसलमान नाही. त्याने आपल्या नावावरून मोहम्मद शब्द हटवावा. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे) द्वारे कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळाल्यानंतर मोहम्मद कैफने भारत सरकारचे अभिनंदन करताना न्यायाचा विजय झाल्याचे म्हटले होते. यानंतर कैफचे म्हणणे पाकिस्तानी फॅन्सला पटले नाही व त्यांनी कैफला ट्रोल करणे सुरु केले. कैफने काय म्हटले..... -...
  May 19, 05:30 PM
 • PHOTOS : IPL मॅचमध्ये पाऊस पडत असतानाही चीयरलीडर्सने असा केला एन्जॉय
  स्पोर्ट्स डेस्क- कोलकाता नाईटरायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील IPL-10 च्या एलिमिनेटरमध्ये जोरदार पावसामुळे मॅचची दुसरी इनिंग साडे तीन तास उशिरा सुरु झाली. पाऊस इतका जोराचा होता की, फील्डवर असलेल्या काही चीयरगर्ल्सला आडोशाची जागा मिळत नव्हती. अशा वेळी काही चीयरलीडर्सनी पावसाचा आनंद घ्यायला सुरुवात केली. असा होता मॅचचा रोमांच... - मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना सनरायजर्स हैदराबाद टीमने 20 षटकात 7 विकेट गमावत 128 धावा केल्या. - मात्र, हैदराबादचा डाव संपल्यानंतर लागलीच...
  May 18, 06:58 PM
 • या आहेत एकेकाळच्या मोस्ट ग्लॅमरस टेनिस स्टार, आता दिसतात अशा, पाहा Photos
  स्पोर्ट्स डेस्क- टेनिस खेळात वुमन प्लेयर्स सर्वाधिक चर्चेत असतात. वुमन टेनिस प्लेयर केवळ टेनिसमध्येच नाही, तर ऑफ द फील्डदेखील ग्लॅमर आणि स्टाईलमुळे लाईमलाईटमध्ये राहतात. अशीच एक टेनिस स्टार आहे, अॅना कुर्निकोव्हा. या रशियन वुमन प्लेयरची गणना सर्वाधिक ग्लॅमरस खेळाडूंमध्ये होते. खेळापेक्षा ग्लॅमरचीच होती होती अधिक चर्चा... - अॅना कुर्निकोव्हा ही 1990 आणि 2000 च्या दशकातील सर्वाधिक चर्चित प्लेयर होती. - तिने कधीच एखादे मोठे सिंगल टायटल जिंकले नाही, मात्र चर्चेत नेहमीच राहिली. - अॅनाने...
  May 17, 04:33 PM
 • थिएटरमध्ये पत्नी पाहत होती मूव्ही, तर सेहवाग बिजी होता या कामात
  स्पोर्ट्स डेस्क- ट्विटर किंग वीरेंद्र सेहवागने पत्नी आरतीबाबत पुन्हा एकदा मजेदार पोस्ट केली आहे. सेहवागने थिएटरमध्ये एक मूव्ही पाहताना ही पोस्ट केली, ज्यात तो मोबाईलवर मुंबई आणि पुणे संघातील कालची मॅच पाहत होता. वीरूने पोस्टमध्ये लिहले की,आनंदी बायको तर आनंदी जीवन. एका थिएटरमध्ये मी मॅच पाहत आहे तर, बायको मूव्ही पाहत आहे. मी पण खूष, बायको तर खूपच खूष. सेहवागच्या या पोस्टनंतर सोशल मीडियात फॅन्सनी Funny कमेंट करणे सुरु केले आहे. पत्नीबाबत कायम करत असतो कमेंट... - सेहवाग आपल्या कमेंट्रीसोबतच...
  May 17, 01:34 PM
 • फिफा वर्ल्डकप सामन्याचे तिकीट 48 रुपयांत !
  मुंबई: देशात सध्या आयपीएल क्रिकेटचा ज्वर वाढला असून प्रत्येक सामन्याची तिकिटे चढ्या भावात विकल्या जात आहेत. क्रिकेटपेक्षाही अधिक सुलभ, सुटसुटीत आणि जगात लोकप्रिय असलेल्या फुटबॉल या खेळाच्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या भारतात होणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्या संचालक जवियर सेप्पी यांनी कोलकाता येथे घोषणा केली. त्या घोषणेनंतर देशातील फुटबॉल शौकीन सुखावले आहेत. ६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या विश्वकपातील अंतिम सामन्यासह तब्बल १० सामने कोलकाता येथे होणार आहेत. अंतिम...
  May 17, 02:01 AM
 • PHOTOS: या क्रिकेटपटूंच्‍या WIFE पहिल्‍यांदा कधी बनल्‍या मॉम, वाचा...
  स्पोर्ट्स डेस्क- मे महिन्यातील दुसरा रविवार अर्थात १४ मे रोजी जगभर मदर्स डे साजरा करण्यात आला. मदर्स डेच्या निमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेसुद्धा आपल्या आईला खास शुभेच्छा दिल्या. सचिनने ट्विटरवर आईसोबत एक फोटो शेअर केला. या फोटोत आई खुर्चीवर बसलेली असून सचिन तिच्या पाठीमागे उभा आहे. या फोटोसोबत सचिनने लिहिले की, जगासाठी तू माझी आई आहेस, मात्र माझ्यासाठी तू माझे जगच आहेस. हॅपी मदर्स डे आई.. असे त्याने म्हटले. तिकडे टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेसुद्धा आपल्या...
  May 16, 09:22 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा