Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर : तिसऱ्या राऊंडनंतरही अभियांत्रिकीच्या सरासरी 56 टक्के जागा रिक्तच
  सोलापूर - सोलापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाची तिसऱ्या कॅप राऊंड अखेर स्थिती स्पष्ट झाली आहे. अॅलॉट प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सरासरी ५६ टक्के जागा रिक्त राहिल्याचे दिसून येते. यातील वालचंद अभियांत्रिकी १०० टक्के जागा भरल्या गेल्या तर अकलूजच्या मोहिते पाटील अभियांत्रिकीत ९३ टक्के जागा रिकाम्या राहिल्याचे चित्र तिसऱ्या फेरी अखेर दिसून आले. प्रवेश काल अप-डाऊन गेल्या तीन ते चार वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेशाचा कल अप डाऊन होत आहे....
  9 mins ago
 • युवती - महिलांमध्ये लगबग नागपंचमीची
  सोलापूर - नागपंचमी सणासाठी बुधवारी सायंकाळी बाजारपेठेत महिला युवतींची मोठी लगबग होती. विविध आभूषणे, विविध रंगांच्या आणि विविध प्रकारच्या कपड्यांची फॅशन आलेल्या नव्या कपड्यांनी साड्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. त्यात मेंदीच्या विविध प्रकारांनी भर घातली आहे.
  9 mins ago
 • साेलापुरात कापड दुकानदाराचा चाकूने भोसकून खून, घटनाक्रम सीटीव्हीत कैद
  प्रतिनिधी- शहरातील कापड व्यापारी प्रकाश अशोक चव्हाण यांचा दाेन तरुणांनी भरदिवसा दुकानात घुसून चाकूचे वार करून खून केला. मारेकऱ्यांचा पहिला हातावर वार बसल्यामुळे चव्हाण दुकानाबाहेर अाले. दुसऱ्या अाराेपीचा वार त्यांनी चुकविला. मात्खार ली पडल्यानंतर दुसरा वार पाठीत खोलवर झाल्यामुळे रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या चव्हाण यांचा मृत्यू झाला. हा घटनाक्रम सीटीव्हीत कैद झाला असला तरी मारेकऱ्यांची अोळख पटली नाही. कारणही समोर अाले नाही. बुधवारी दुपारी तीनच्या सुमाराला हा प्रकार घडला....
  03:00 AM
 • बुडणाऱ्या मुलीला वाचवताना मायलेकीचा मृत्यू, नात्यातील मुलगी सुदैवाने वाचली
  वैराग- तोल जाऊन तलावात पडल्याने बुडणारी नात्यातील चिमुकली राणीला वाचवण्याच्या प्रयत्नात मायलेकीचा मृत्यू झाला. तर बुडणारी चिमुकली सुदैवाने वाचली. मंगळवारी (दि. २५) दुपारी साडेबाराच्या सुमारास मानेगाव धा. (ता. बार्शी) येथे ही घटना घडली. उषाबाई दत्तात्रय इबीतवार (वय २५), त्यांची मुलगी सुजिता (वय १०, रा. मूळ मानेगाव, हल्ली मुंबई) अशी मृत्यू पावलेल्या मायलेकीची नावे आहेत. तर राणी गोपीनाथ काळे (वय १०, रा. मानेगाव) ही चिमुकली वाचली. आठ दिवसांपूर्वी इबीतवार कुटुंबीय देवाच्या कार्यक्रमासाठी मुंबई...
  July 26, 10:06 AM
 • देखण्या रिपन हाॅॅलमध्ये शनिवारी पासपोर्ट सेवा लघु केंद्राचा शुभारंभ
  सोलापूर- विदेशवारी करण्यापूर्वी सोलापूरकरांना पासपोर्टसाठी करावी लागणारी पुणेवारी आता बंद होणार आहे. रिपन हॉल सभागृहातील नूतन पासपोर्ट कार्यालयाचा शनिवारी (२९ जुलै) परराष्ट्र राज्यमंत्री विजयकुमार सिंह व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करणार आहेत. उद््घाटन सोहळ्यास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते, खासदार शरद बनसोडे, विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांची उपस्थिती राहणार...
  July 26, 09:58 AM
 • दुसऱ्या टप्प्यातील मराठा मोर्चाला माढ्यातून सुरुवात; महिला, मुली पुन्हा रस्त्यावर
  माढा- हाती भगवे ध्वज, डोक्यावर टोप्या, गळ्यात भगवे पंचे धारण केलेल्या शेकडो मराठा समाजबांधवांनी एकमुखी दिलेल्या एक मराठा कोटी मराठा, तुमचं आमचं नात काय ..जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणांनी मंगळवारी (दि. २५) सकाळी माढा शहर दणाणले. निमित्त होते तालुकास्तरीय सकल मराठा बहुजन महामोर्चाचे. हा राज्यातील पहिला तालुकास्तरीय महामोर्चा होता. दहा हजारांहून अधिक मराठा बहुजन समाजबांधवांचा यात सहभाग होता. याप्रसंगी बोलताना महिला मुलींनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार गंभीर नसल्याची टीका...
  July 26, 09:29 AM
 • उजनीमध्ये 30 टक्के जलसाठा, शेतीला पाणी सोडण्याची मागणी
  टेंभुर्णी- उजनीधरण ३० टक्के भरल्याने आनंदाचे वातावरण आहे. मात्र, दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडण्यात मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तर यासंदर्भात राज्य सरकारला कळवले असून अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. निर्णय झाल्यानंतर खरीपासाठी पाणी सोडण्याची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. १७ जूननंतर पाऊस झाला नाही. पाण्याअभावी खरीपातील मका, उडीद, सोयाबीन, तूर ही खरीप पिके संकटात आहेत....
  July 26, 09:27 AM
 • डबे, हंडे वाजवून नीलेश बनला ढोलकी वादक, निळू फुले यांनी दिली होती शब्बासकी
  टेंभुर्णी- माढा येथील तरुण ढोलकीवादक नीलेश देवकुळे याने आपल्या इच्छाशक्तीचा जोरावर आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना आणि कुठलेही शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसताना ढोलकीवादक म्हणून महाराष्ट्रात नाव कमवले आहे. नीलेशला वयाच्या व्या वर्षापासून ढोलकी वाजवण्याचा छंद लागला. ढोलकी खरेदी करण्याची ऐपत नसल्याने तो हाताला लागेल ती वस्तू वाजवून आपली हौस भागवून घ्यायचा. ढोलकीचा सराव करण्यासाठी जेवणाचे डब्बे, शाळेतील बँच, टेबल यांनाच ढोलकी समजून बडवत असे. काही वेळेला हाताच्या बोटांना...
  July 26, 09:03 AM
 • सोलापूरला 1800 कोटींचा गृहप्रकल्प देऊन नायडू उपराष्ट्रपतिपदासाठी गेले
  सोलापूर- केंद्रीय शहरी विकास आणि दारिद्र्य निर्मूलनमंत्री व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली. त्याच दिवशी त्यांनी सोलापूरला १८०० कोटी रुपयांचा गृहप्रकल्प मंजूर केला. ३० हजार असंघटित कामगारांसाठीचा हा प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचे भूमिपूजन ऑक्टोबरमध्ये असून, त्यासाठी उपराष्ट्रपती म्हणूनच ते येतील, अशी माहिती ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी दिली. श्री. आडम यांनी ३० हजार असंघटित कामगारांचा प्रस्ताव केंद्राकडे दिला होता....
  July 26, 09:00 AM
 • तब्बल 17 वर्षांनंतर वाढणार बांधकाम परवाना विकास शुल्क, जूनपासून अंमल
  सोलापूर- नवीपेठसह गावठाण भागातील विकास शुल्कात आठ ते अकरापट दराने वाढ करण्यात आल्याने १७ वर्षांनी प्रथमच शहरातील ४२ भागांपैकी ३२ भागात बांधकाम करणे महागले आहे. तर दहिटणेसह १० भागात बांधकाम करणे स्वस्त झाले असून याठिकाणी निम्म्याहूनही कमी विकास शुल्क आकारणी होईल. महापालिकेने एक जूनपासून यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरात सर्वाधिक दर नवीपेठेत ५१९ तर सर्वात कमी दहिटणे येथे १४ रुपये प्रति चौरस मीटर विकास शुल्क असणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ मधील नियम क्रमांक...
  July 26, 09:00 AM
 • पैसे घेऊन भाविकांना दर्शनास साेडले; पंढरीत 2 कर्मचारी निलंबित
  पंढरपूर- पैसे घेवून भाविकांना थेट दर्शनाला सोडण्याच्या वादातून येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दोन कर्मचाऱ्यांत हाणामारी झाली. रविवारी (दि. २३) हा प्रकार घडला. या प्रकाराची मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी गंभीर दखल घेतली असून मंगळवारी (दि. २५) हंगामी वाहनचालक नारायण एकनाथ वाघ आणि सुरक्षा रक्षक पांंडुरंग जनार्दन साळुंखे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात अाली. वाघ यांनी अापले पाहुणे असल्याचे सांगत काही भाविकांना थेट दर्शनासाठी सोडा, असे सुरक्षा रक्षक...
  July 26, 03:00 AM
 • संशयित तूर खरेदीची चौकशी करून फौजदारी, 30 दिवसांत अहवाल द्या, कलेक्टरवर जबाबदारी
  सोलापूर- हमीभावाने तूर खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांनीही तूर विकल्याचा संशय बळावला आहे. त्याची चौकशी करून संबंधितांवर फाैजदारी खटले भरण्याचे आदेश राज्य शासनाने दिले अाहेत. पणन संचालक शेतकऱ्यांची तपशीलवार माहिती देतील. त्यानुसार चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर साेपवण्यात अाली आहे. यंदा राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्याला हमीभाव देण्यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू केली. ५ हजार ५० रुपये क्विंटल असा त्याचा दर...
  July 26, 12:34 AM
 • कापड व्यापाऱ्यांच्या संपामुळे सूतगिरण्यांच्या संकटात भर, व्यापारी घेताहेत गैरफायदा
  सांगोला- कापडव्यापाऱ्यांच्या संपामुळे सांगोला शेतकरी सूतगिरणीची सुमारे पाच कोटी रुपयांचे सूत पडून आहे. त्यामुळे कापूस खरेदीसह चलन थांबल्याची माहिती, गिरणीचे अध्यक्ष प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी दिली. सोलापूर, इचलकरंजीसह राज्यातील इतर जिल्ह्यांतील सूतगिरण्यांतही हीच स्थिती आहे. त्यामुळे अनेक गिरण्यांनी कामाच्या पाळ्या कमी केल्या आहेत. त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायावर निर्माण झालेले अनिश्चिततेचे सावट दूर झाल्यास गिरण्या...
  July 25, 08:53 AM
 • नोकरीचे आमिष दाखवून महिलेला गंडा, नागनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर गुन्हा
  मोहोळ- नोकरीलावण्याचे आमिष दाखवून येथील नागनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने एका महिलेला १५ लाखांचा गंडा घातला. १४ जून २०१० ते १६ जून २०१७ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी मुख्याध्यापक बशीर बागावान यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनीषा मनोहर केवळे (वय ३३, रा. सौंदणे, हल्ली मोहोळ) यांनी फिर्याद दिली. संशयित मुख्याध्यापक बागवान यांनी येथील नागनाथ विद्यालयात शिक्षिका म्हणून कामाला लाण्याचे आणि कायम करण्याचे केवळे यांना आमिष...
  July 25, 08:47 AM
 • वेळापुरात घुमला पार्वती पते हर हर महादेवचा जयघोष
  वेळापूर- वेळापूर (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत श्री अर्धनारी नटेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त राज्यभरातून शेकडो भाविक दर्शनासाठी आले होते. पहाटे चार वाजता पानपूजेसह महापूजा करण्यात आली. भाविकांनी श्रींस जलाभिषेक केला. महाआरती करण्यात आली. शंभो शिव पार्वती पते हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर अभिषेक, लघुरुद्र, प्रसादाचे वाटप झाले. भाविकांना सुलभतेने दर्शन मिळावे, यासाठी दर्शनरांगेत स्वयंसेवक कार्यरत होते....
  July 25, 08:47 AM
 • अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तिच्या वडिलांनाही मराहाण; दोघा बापलेकांना अटक
  करमाळा- वडिलांनादाखव म्हणून मोटारसायकलवर बसवून नेवून तरुणाने अल्पवयीन (वय ११) मुलीवर दुष्कृत्य केले. तसेच तिच्या वडिलाने जाब विचारल्यावर त्यांना मारहाण केली. रविवारी (दि. २३) सायंकाळी चिखलठाण येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी बापलेकाला अटक झाली आहे. सागर दिगंबर जाधव (वय १९) दिगंबर सुदाम जाधव (वय ५०, रा. चिखलठाण क्र. एक) अशी संशयितांची नावे आहेत. यातील पीडित मुलीची आई आजारी आहे. त्यंाच्यावरील उचराच्या खर्चासाठी पीडितेच्या वडिलाने पाच वर्षांपूर्वी घेतलेली जागा विकण्याचा निर्णय घेतला. संशयित...
  July 25, 08:45 AM
 • हॉर्सरायडर आजोबा: 77 वर्षांपासून रोज घोड्यावरून प्रवास करतात 87 वर्षीय अर्जुन कदम
  कंदर (सोलापूर) - पूर्वी प्रवासासह वाहतुकीसाठी घाेड्यासह विविध प्राण्यांचा वापर केला जायचा. गेल्या काही वर्षांत चांगले रस्ते, अत्याधुनिक वाहतूक साधने यामुळे त्यांचा वापर फारसा होत नाही. मात्र, झरे येथील अर्जुन केशव कदम (वय ८७) हे आजही घोड्यावरून प्रवास करतात. रोज ते २० ते ३० किलोमीटर अंतर घोडेस्वारी करतात. शेतात, नातेवाईकांकडे ये- जा करणे आणि पालेभाज्यांच्या विक्रीसाठी ते घोड्याचाच वापर करतात. त्यांचा लसूण विक्रीचा व्यवसाय अाहे. आतापर्यंत वाहनांतून प्रवास केल्याचे ते सांगतात. कदम...
  July 24, 09:16 AM
 • गवंडीकाम करत मुंढेवाडीचा तरुण झाला सीए, वडील कुल्फी विकायचे, आई चालवते खानावळ
  पंढरपूर- घरचीआर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुंढेवाडीच्या तरुणाने गवंडीकाम, कुल्फी विक्री अशी काम करत सीए (सनदी लेखापाल) परीक्षेत यश मिळवले. गरिबीवर स्वकष्टाने मात करत हे यश मिळवलेल्या तरुणाचे अासिफ जैनोद्दीन मुजावर असे नाव आहे. अशा अवघड परीक्षेत मुलगा उत्तीर्ण झाल्याने पालकांनी आनंदोत्सव साजरा केला तर ग्रामस्थांनी त्याची गावातून मिरवणूक काढली. जैनुद्दीन मुजावर हे आसिफचे वडील. त्यांना दोन मुले आणि तीन मुली आहेत. शेती अत्यल्प असल्यामुळे जैनुद्दीन हे केळी विक्रीचा व्यवसाय...
  July 24, 09:07 AM
 • ठिबक सिंचन सक्तीचा निर्णय शेतकऱ्यांनी हाणून पाडावा, खासदार राजू शेट्टी यांचे आवाहन
  माढा- आधीच बेभरवशाचे असलेल्या शेतीला आता बदलत्या हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारने परिस्थितीनुसार धोरणातही बदल करण्याची गरज आहे. तसेच ठिबक सिंचनाचे क्षेत्र वाढावे, यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवायला हवी. सरकारने निर्णय लादू नयेत. सरकारने घेतलेला उसासाठी ठिबक सिंचन सक्तीचा निर्णय एकतर्फी आहे. हा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडायला हवा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले. महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ उंदरगाव याच्या संयुक्त विद्यमाने...
  July 24, 09:03 AM
 • हमरस्त्यावर म्हशी पळवणे थांबले, आता खुले मैदान
  सोलापूर- प्रामुख्याने पशुपालनाच्या व्यवसायात असलेल्या गवळी समाजाचा उत्सव म्हणजे म्हशी पळवणे. हमरस्त्यावर त्या पळवल्याने लोकांना त्याचा भयंकर त्रास व्हायचा. महिला, मुले जीव मुठीत धरून पळायचे. मोटारसायकलचालक रिक्षाही या म्हशींच्या मध्ये सापडायचे. कोलांटउड्या पडायच्या. लोक जखमी व्हायचे. हा सर्व प्रकार आता बंद झाला आहे. समाजातील तरुण आणि बुजुर्ग मंडळींनी तो खुल्या मैदानावर आणला. उत्सवाचा खरा आनंद घेतला. दिव्य मराठीने याबाबत प्रबोधनात्मक पाठपुरावा केला होता. त्याला समाजाने सकारात्मक...
  July 24, 08:47 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा