Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur
 • ‘एसएमएस’द्वारे मनपात तक्रार, चोवीस तासांत होईल निराकरण
  सोलापूर - पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य, साथीचे आजार, अनधिकृत डिजिटल फलक, सफाईबाबत नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्यासाठी महापालिका एसएमएस सेवा सुरू केली आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रार रजिस्टर होतील पण तक्रारीचे निराकरण २४ तासांत होईल असे उलट उत्तरही येईल. ही सेवा महापालिकेने सुरू केली आहे. नागरिकांना तक्रारी आॅनलाइन करता यावी ही संकल्पना चांगली अाहे. २४ तासांत तक्रारीचे निराकरण केले जाईल, असे उलट उत्तर आणि तक्रार क्रमांक नागरिकांना मिळेल, पण तक्रारीचे निराकरण कितपत होईल यांची...
  May 22, 10:52 AM
 • आयुक्त कार्यालयासमोर पाण्याचा टाहो
  सोलापूर - विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करा आणि दिवसाआड पाणी पुरवठा करा, अशा मागण्या करत महानगरपालिकेतील भाजप, शिवसेना, माकपा बसपाच्या नगरसेवकांनी गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पाण्याच्या प्रश्नावर आयुक्तांनी शुक्रवारी आपल्या कक्षात नगरसेवकांनी बैठक बोलावली आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पाणी असताना दोन ते तीन दिवसांआड पाणी पुरवठा हाेत होता. या वर्षी का होत...
  May 22, 10:48 AM
 • सोलापूर - दुधनीतील फ्रुटी (शांभवी) आॅर्केस्ट्रा बार तपासणीवेळी पथकातील तहसीलदारांवर हल्ला केला. या प्रकरणातील आरोपी अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात महसूल पथकाने मागील पंधरवड्यात शहर परिसरात बारची अचानक पाहणी केली. यावेळी दुधनी येथे झालेल्या घटनेची फिर्याद दाखल झालेली आहे. तहसीलदार गुरुलिंगप्पा बिराजदार यांना शंकर म्हेत्रे यांनी...
  May 22, 10:44 AM
 • आनंदला फरहानकडून ‘ही फाॅर शी’चा लोगो
  सोलापूर - गिर्यारोहक आनंद बनसोडे येत्या २५ मे रोजी अमेरिका खंडातील मेकिंग्लो शिखर सर करण्यासाठी सोलापुरातून निघणार आहे. जगातील खंडांतील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याच्या मोहिमेत आनंदने आजवर शिखरे सर केली आहेत. पाचव्या शिखर मोहिमेसाठी अभिनेता फरहान अख्तरने ही फाॅर शी मोहिमेचा लोगो देऊन आनंदला शुभेच्छा दिल्या. युनायटेड नेशन्सकडून स्त्री-पुरुष समानतेसाठी ही फाॅर शी मोहीम चालवली जाते. फरहान याची मर्द ही संस्था या मोहिमेशी संबंधित काम करते. आनंदने अख्तरची भेट घेतली तेव्हा सोबत...
  May 22, 10:39 AM
 • संभाजी तलाव बोटिंग कार्यालयाला आग
  सोलापूर - विजापूर रस्त्यालगत धर्मवीर संभाजी तलावजवळच्या बोटिंग कार्यालयाला गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमाराला आग लागली. यामध्ये चार बोटींसह सुमारे ३.५ लाखांचे नुकसान झाले.पालिकेच्या जागेवरचे बाेटिंग कार्यालय उत्कर्ष गरड या खासगी व्यक्तीच्या ताब्यात आहे. बोटिंग बंद आहे, त्यामुळे कार्यालय बंद अवस्थेत आहे. अनेक फेरीवाले आपले साहित्य तेथे ठेवतात. गुरुवारी सकाळी कार्यालय बंद असताना त्याला आग लागली. आग विझविणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांकडे हेल्मेट, गम बूट, ग्लोजसह कोणतेही सुरक्षा साहित्य...
  May 22, 10:35 AM
 • झाडं कमी करतील सोलापूरचे तापमान, वाढत्या तापमानाला वृक्षांची कमतरता हेच एक मुख्य कारण
  सोलापूर - गेल्या काही वर्षात सोलापूर तापमानाच्या नोंदीत राज्यात अग्रेसर आहे. शहरातील वाढते कॉँक्रिटीकरण, होणारी वृक्षतोड यामुळे शहरातील तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ऋतू चक्राप्रमाणे असणारा चार महिन्यांचा उन्हाळा सोलापूरकरांना किमान पाच ते साडेपाच महिन्यांचा जाणवतो. शहराच्या वाढत्या तापमानाला वृक्षांची कमतरता हेच एक मुख्य कारण दिसते आहे. तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पुढे गेल्याने होणारी होरपळ आम्ही सोलापूरकर सहन करतोय. पण, आपल्या घरापासून जवळ असलेल्या मोकळ्या जागेत शीतल छाया...
  May 22, 10:28 AM
 • ... आणि युवकाची झाली चोरांच्या हातून सुटका
  सोलापूर - कोईहै तो बचावो अशी आरोळी मध्यरात्री दीडच्या सुमाराला रेल्वे स्थानकाजवळ शनि मंदिराजवळील बोळात दिव्य मराठीच्या छायाचित्रकाराने ऐकली. काही तरी गडबड आहे यासाठी थांबल्यानंतर दोघे तरुण एका तरुणाला मारहाण करून पैसे काढून घेत होते. घटनास्थळी गेल्यानंतर उलट चोरानेच छायाचित्रकाराला त्या तरुणाला दमदाटी करत ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर बचावात्मक पवित्रा घेत दोघांनी दुचाकीवरून स्टेशन चौकी गाठली. पोलिसांच्या मदतीने दोघा लुटारूंना भय्या चौकात पकडले. हा थरार बुधवारी...
  May 21, 10:19 AM
 • पाण्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सभेचे कामकाज पाडले बंद
  सोलापूर - पाण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या सभेचे कामकाज बंद पाडले. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध करत महापालिकेत मटके फोडले. पाणी असून नागरिकांचे हाल होत आहेत. याला सत्ताधारी आणि प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार जबाबदार अाहे, अशी टीका विरोधकांनी केली. शहरात काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तो...
  May 21, 10:14 AM
 • सोलापूर - दुधनी(ता. अक्कलकोट) येथील फ्रुटी ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बार चालकाला बजावण्यात आली आहे. आॅर्केस्ट्रा बारवर तहसीलदार गुरू बिराजदार यांनी छापा टाकला होता. बार चालकाचा खुलासा आल्यानंतर ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. ऑर्केस्ट्रा बारची तपासणी करताना शंकर म्हेत्रे यांच्याकडून तहसीलदार बिराजदार यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी म्हेत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. अद्याप...
  May 21, 10:09 AM
 • फिरत्या खंडपीठासाठी निदर्शने: वकिलांची मोटारसायकल रॅली, जूनपर्यंत संप चालू
  सोलापूर - सोलापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ झाले पाहिजे, अशा मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल रॅलीद्वारे निदर्शने करण्यात आली. न्यायालय, रंगभवन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मार्गांवर रॅली काढण्यात आली. जूनपर्यंत वकिलांचा संप चालू असेल. कोल्हापूरला फिरते खंडपीठ देण्याचा निर्णय झाला. तसाच निर्णय सोलापूर करता घ्यावा. यापूर्वी ५१ दिवस आंदोलन झाले. त्यावेळी आंदोलन मागे घ्या, सोलापूरचा विचार करू, असे आश्वासन दिले होते. त्याची...
  May 21, 10:04 AM
 • ‘उजनी’ला ४० वर्षे; पुनर्वसित ४४ गावांचा रखडला विकास
  सोलापूर - उजनी धरण बांधून ४० वर्षे पूर्ण झाली असली तरी धरणाकरता जमीन दिलेल्या नागरिकांची फरफट सुरू आहे. पुनर्वसित गावांना पूर्ण क्षमतेने सोयी-सुविधा देण्यात येत नाहीत. विशेष म्हणजे, अशा गावांचे महसुली दफ्तर (रेकाॅर्ड) आजपर्यंत तयार करण्यात आले नाही. ही गावे दफ्तरवर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संयुक्त पाहणी करून अशा गावाचा अंतिम नकाशा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. संयुक्त पथकाकडून सर्व्हे सर्व४४ गावांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी...
  May 21, 09:51 AM
 • अक्कलकोट कल्लपावाडी(ता.अक्कलकोट) - येथे २८ वर्षीय विवाहित महिलेसह तिच्या दोन मुलांचा बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अवण्णा परगोळै यांच्या शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला.कन्नवा लक्ष्मण ढोणे (वय २८), अंबिका लक्ष्मण ढोणे (वय २) आणि शिवम्मा लक्ष्मण ढोणे (वय १) वर्षे अशी मृतांची नावे आहेत. घटनेची अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. घटनेची खबर गिरमल म्हाळप्पा रोडगे (रा.कल्लपावाडी) यांनी दिली. कन्नवा ढोणे यांचे सहा वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिच्या मानसिक...
  May 21, 09:46 AM
 • सोलापूर - शहराला चार ते पाच दिवसांआड होणारा पाणीपुरवठा, नागरिकांची होणारी ओरड आणि आगामी काळातील नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी महापौर सुशीला आबुटे यांनी मनपा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी सकाळी बोलावली आहे. दिव्य मराठीच्या पाणीटंचाईचे ऑडिट वृत्त मािलकेनंतर पदाधिकारी कृतिशील झाले आहेत. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी मंगळवारी औज बंधारा येथे जाऊन पाण्याची पाहणी केली. याशिवाय नांदणी बीपीटी, औज बंधारा परिसरातील नदीचे पात्र, टाकळी पंप हाऊस, सोरेगाव जलशुद्धीकरण...
  May 20, 10:27 AM
 • गुन्हेगारांनो, आता सोलापुरातून पळा...सेनगावकरांचा इशारा
  सोलापूर - नागरिकांच्या कामांना प्राधान्य असेलच. त्यासोबतच गुन्हेगारीचा बिमोड आम्ही करणार आहोत. मी असे म्हणेन की, आता सेनगावकर आलेत, गुन्हेगारांनो, सोलापुरातून पळून जा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी नूतन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. मंगळवारी दुपारी पावणे एकच्या सुमाराला त्यांनी पदभार घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसवाईट नाहीत. काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यांना माझ्या कामाची पध्दत लवकरच दिसेल. मला प्रामाणिकपणे काम पाहिजे. खोट बोलू नका. चूक मान्य करा....
  May 20, 10:20 AM
 • चुकीचे नियोजन, वर्षांत १०७५ कोटींचे नुकसान
  सोलापूर - महापालिका प्रशासनाने मागील पाच वर्षांत मिळकत कराचे रिव्हिजन केले नाही. त्यामुळे ७०० कोटी रुपये नुकसान झाले. तसेच एलबीटी वसुली केली नसल्याने २०० कोटींचा फटका बसला. याशिवाय बोगस मिळकतीकडून कर वसुली नसल्याने १०० कोटी, बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने ५० काेटी, अनधिकृत नळ १० तर शाॅपिंग सेंटरची भाडेवाढ केली नसल्याने १५ कोटी असे सुमारे १०७५ कोटींचे नुकसान मनपाला सोसावे लागले. मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हे झाले, असा आरोप करून संबंधितांवर कारवाई...
  May 20, 10:16 AM
 • सोलापूर- जुळे सोलापूर शिवगंगा नगर भाग एक येथे जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता महालिंगप्पा बलगर राहतात. त्यांच्या घराच्या खिडकीचे गज वाकवून चोरटे आत आले. कपाटातील आठ तोळे दागिने, सव्वालाख रुपये असा ऐवज चोरून नेला. विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे तीन ते चार दरम्यान ही घटना घडली आहे. खिडकीचे गज वाकवून एक चोरटा आता आला. बेडरूमची कडी काढून अन्य चोरटे आत आले. देवघरातील कपाटात दागिने होते. गंठण, नेकलेस, पेंडल, अंगठी, नथ असा ऐवज पैसे नेले आहेत. मोबाइलवाजला अन् :...
  May 20, 10:14 AM
 • उन्हाच्या झळांनी तापले सोलापूर; पारा ४३.७ अंशावर
  सोलापूर - मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेले सोलापूर गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या झळांनी तापले आहे. मंगळवारी शहरातील उन्हाचा पारा ४३.७ अंशावर पोहाेचला होता. यंदाच्या उन्हाळ्यातील हा उच्चांक आहे. गेल्यावर्षी १९ मे २०१४ रोजी ४१.१ इतके तापमान होते.
  May 20, 10:08 AM
 • सनी लिओनविरोधात सोलापुरात तक्रार अर्ज
  सोलापूर - संकेतस्थळावर अश्लील, नग्न व विकृत छायाचित्रे आणि चलचित्रे टाकून तरुणाईला बिघडवण्याचे काम केल्याचा आरोप करीत अभिनेत्री सनी लिओनविरोधात विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर (रा. ओंकार सोसायटी, मजरेवाडी) यांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा फिर्यादी अर्ज दिला आहे. अॅड. रामतीर्थकर यांनी म्हटले आहे की, अभिनेत्री सनी लिओन हिच्या संकेतस्थळावर स्वत:ची विविध प्रकारची अश्लील, नग्न व विकृत छायाचित्रे आहेत. चलचित्रेही आहेत. यामुळे तरुणाई आणि...
  May 20, 05:23 AM
 • सोलापूर - यंत्रमाग कामगारांचे सोडा, शहर आणि परिसरातील बड्या कंपन्यांमध्येही किमान वेतनाची बोंबच आहे. याबाबत सरकारी कामगार अधिकारी, कामगार न्यायालयात अनेक तक्रारी केल्या. यंत्रणा तर दखलच घेत नाहीच, न्यायालयात जुजबी दंड भरून मालकमंडळी बाहेर पडतात. पुन्हा जैसे थे स्थिती असते. किमान वेतन देणा-यांना शिक्षा केली पाहिजे, तरच हा प्रकार कुठे तरी थांबेल, असे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष प्रकाश आळंदकर यांनी दिव्य मराठीला सांगितले. होटगी रस्त्यावर आणि चिंचोळी आैद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्या...
  May 19, 11:30 AM
 • सोलापूर - एनटीपीसीच्यामदतीने शहरा पाणीपुरवठ्यासाठी उजनी ते सोलापूर दरम्यान ९०० एमएमची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे २५० कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यात ३९ कोटीची वाढ करण्यात आली आहे. वाढी निधीसह मनपा एनटीपीसी यांच्यातील करार मे महिन्याच्याअखेरपर्यंत होईल, अशी माहिती सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आली. महापालिका एनटीपीसीच्या अधिका-यांची संयुक्त बैठक मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या कक्षात...
  May 19, 11:27 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा