Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur
 • छावण्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत, शेतकऱ्यांसमोर पशुधन जगवण्याचा गंभीर प्रश्न
  कळंब- चारासंपल्यामुळे तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. चारा छावणी सुरू करण्यासाठी तालुक्यातून २६ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. यावर जिल्हास्तरावरून कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. यावर तत्काळ निर्णय घ्यावा आणि चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरत आहे. तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. तीन वर्षांत पाऊस कमी झालेला असल्यामुळे...
  August 27, 09:20 AM
 • दुधाळवाडी येथील शिक्षकांचा उपक्रम
  येरमाळा- डोंगरदऱ्यांच्याकुशीत वसलेल्या दुधाळवाडी (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी बोअरच्या सांडपाण्यावर शाळेच्या आवारात बाग फुलवली आहे. दुष्काळी स्थितीत शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे शाळेचे सौंदर्य फुलले आहे. डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांना निसर्गत:च सौंदर्य प्राप्त होते. परंतु, यावर्षी पाऊस नसल्यामुळे तालुक्यातील डोंगर ओसाड दिसत आहेत. त्यामुळे ही गावे हिरवळीअभावी भकास दिसत आहेत. कळंब तालुक्यातील दुधळवाडी गाव हिरव्यागार डोंगर कपारीमुळे...
  August 27, 09:16 AM
 • पावसाअभावी तेरचे २,७५९ हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत
  तेर- उस्मानाबादतालुक्यातील तेर येथील २,७५९ हेक्टर जमीन पावसाअभावी पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगाम तर वाया गेलाच असून पावसाअभावी आता रब्बीचीही आशा मावळत चालली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असून जनावरांनाही चारा पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असतानाही चारा छावण्या लाल फितीत अडकल्या आहेत. सर्वत्र काळी अोसाड जमीन दिसत असून त्यामुळे शेतकऱ्यांना मागील दुष्काळापेक्षाही हा दुष्काळ असह्य झाला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा २४ ऑगस्ट २०१५ पर्यंत तेरमध्ये १२८ मिमी पावसाची...
  August 27, 09:11 AM
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक अपात्र
  उस्मानाबाद-नगराध्यक्षमकरंद राजेनिंबाळकर यांच्यावर राज्यमंत्र्यांकडून झालेली अपात्रतेची कारवाई ताजीच असताना त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांवर जिल्हाधिकारी डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. निवडणुकीतील खर्चाचा हिशेब सादर केल्यामुळे ही करवाई करण्यात आली आहे. नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्याविरोधात भाजपनेते उदय निंबाळकर यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यामुळे नगरविकास राज्यमंत्र्यांकडून त्यांना अपात्र...
  August 27, 09:06 AM
 • भूसंपादनच्या कर्मचाऱ्यांचा मृताच्या मावेजावर डल्ला
  उस्मानाबाद- चाळीसवर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी डमी व्यक्तीला उभा करून, बनावट कागदपत्रे बनवून एकाने कर्मचाऱ्यांच्या संगनमताने महामार्गामध्ये संपादित जमिनीचे तब्बल पंधरा लाख पन्नास हजार रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मृत व्यक्तीच्या वारसांनी याबाबत भूसंपादन विभाग तलाठ्याला माहिती देऊनही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कावलदरा शिवारात पांडुरंग व्यंकटेश शास्त्री यांच्या मालकीची एकूण ८९ आर जमीन होती....
  August 27, 09:02 AM
 • सहा दिवसांत सापडले एकूण ४१४ बोगस नळ
  सोलापूर- सलगसहाव्या दिवशी शहरात अनधिकृत नळ शोधमोहीम सुरूच होती. बुधवारी महापालिकेच्या पथकांनी सहा हजार ६७० मिळकतींची तपासणी केली. त्यात ६९ नळ अनधिकृत असल्याचे आढळून आले. सेटलमेंट परिसरात सर्वाधिक ४४ बोगस नळ मिळाले. सहा दिवसांत मनपाने ४१४ अनधिकृत नळ शोधून काढले. झोन क्रमांक पाचच्या हद्दीत दोंदे नगरात मनपाने नळ शोधमोहीम घेतली, परंतु तेथे एकही अनधिकृत नळ मिळाले नाही. याठिकाणी झाली शोधमोहीम पांढरेवस्ती, कळके वस्ती, उमा नगरी, दक्षिण कसबा, रेल्वे लाइनचा काही भाग, समाधान नगर, किसान नगर,...
  August 27, 08:56 AM
 • ‘डीपीसी’कडे प्रस्ताव ६० कोटींचा, मंजूर ११ कोटी, कामे कोटींची!
  सोलापूर- जिल्हानियोजन समितीकडून शहरासाठी मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा फुटकळ निधी मिळाला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात निधी या तत्त्वाचाही अंमल होत असल्याचेही दिसून येत नाही. शहरातील विकासकामांसाठी २०१४-१५ मध्ये सुमारे २२ कोटी रुपये मिळाले, तर यंदा केवळ पावणेतीन कोटी रुपये मिळाले आहेत. प्रस्ताव ६० कोटींच्या कामाचे, मंजुरी ११ कोटींच्या कामाची, तर प्रत्यक्ष काम तीन कोटी ५६ लाखांचे अशी स्थिती आहे. एकूणच गेल्या चार वर्षांपासून शहरासाठी िदला जाणारा निधी झपाट्याने कमी हाेत नाही....
  August 27, 08:41 AM
 • ताजा महाराष्‍ट्र : अंघोळीच्‍या गरम पाण्‍यात चिमुकली पडली; औरंगाबादमधील घटना
  औरंगाबाद - शहरातील हीनानगर अंघोळीसाठी तापवलेल्या पाण्यात पडून एक तीन वर्षांची चिमुकली गंभीररीत्या भाजल्याची दुर्दैवी घडला आज (बुधवार) सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. कैकशा शेख असे तिचे नाव आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसभरातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....
  August 26, 05:29 PM
 • सोलापूर - कर्णिकनगरसोसायटीप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी याबाबत महसूलमंत्री खडसे यांना निवेदन दिले होते. मंगळवारी सोसायटी अध्यक्ष अशोक काजळे यांनीही श्री. खडसे यांना निवेदन दिले. त्यानुसार महसूलमंत्री यांनी बुधवारी मुंबई येथे सोसायटी सभासद आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. बैठकीतील निर्णयानंतर सोसायटीतील १२१ सभासदांची जागा ताब्यात घ्यायची किंवा नाही? यावर निर्णय...
  August 26, 11:29 AM
 • सोलापूर-दक्षिणसोलापूर तालुक्यातील भंडारकवठे आैज-मंद्रूप येथील वनहद्दीतून अवैध मुरुम उपसा केल्याप्रकरणी मंद्रूप पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला. पण त्याप्रकरणाची चौकशी कासवगतीने सुरू आहे. भंडारकवठेत वनविभागाच्या ताब्यातील गट क्रमांक ६८६ मधून सुमारे एक कोटी ३२ लाख रुपयांच्या ७० हजार ब्रास मुरुमाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याप्रकरणी सप्टेंबर २०१४ मध्ये मंद्रूप पोलिसांमध्ये फिर्याद दाखल झाली होती. जेसीबीचे मालक, दमदाटी करणाऱ्यांचा शोध लावण्यास तब्बल ११ महिन्यांचा...
  August 26, 11:20 AM
 • सोलापूर- उजनीधरणातून सोडण्यात आलेले पाणी चिंचपूर बंधाऱ्यातील गळतीमुळे अधिक दिवस राहत नव्हते. मात्र सध्याची उजनी धरणातील उपलब्ध पाणीपातळी पाहता जिल्हा प्रशासनासमोर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नव्हता. शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून बंधारा दुरुस्तीसाठी कोटी लाख ६५ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. बंधारा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना पूर्वीपेक्षा एक महिना अधिक पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार अाहे....
  August 26, 11:14 AM
 • दुष्काळप्रश्नी उपाययोजनांवर तब्बल साडेतीन तास झाली चर्चा
  सोलापूर- पावसाळ्याचेतीन महिने संपत आले तरी टंचाईबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उपाययोजनांबाबत कोणतीच ठोस भूमिका घेत नव्हते. मात्र, मंगळवारी जिल्हाधिकारी मुंढे यांनी तब्बल साडेतीन तास टंचाईबाबत बैठक घेतली. बैठकीत टँकरद्वारे पिण्याचे पाणी, जनावरांना चारा यास प्राधान्य द्यावे, असे सांगत हलगर्जीपणा वा कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी पृथ्वीराज, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, अधीक्षक...
  August 26, 11:09 AM
 • शहरात आणखी १०० बोगस नळ आढळले, २३ जणांवर गुन्हा दाखल
  सोलापूर - शहरातमागील चार दिवसांपासून अनधिकृत नळजोड शोधमोहीम सुरु आहे. मंगळवारी अनधिकृत नळजोड घेणाऱ्या २३ जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. शहरातीलपोलिस ठाणेनिहाय कारवाई फौजदार चावडी - चित्तोडरजपूत पंच, कमलाबाई भीमाशंकर टेले, कुसूम वसंत मोतीवाले, व्यंकटेश हरी देव, अमोल चंद्रकांत कामानी, श्रीनिवास मानय्या काळी, एक अज्ञात इसम. जेलरोडपोलिस ठाणे- पुंडलिककोंडा, कृष्णय्या राजय्या नुकल. एमआयडीसी- शहाजीरावहरीचंद्र चाबुकस्वार, नसीर भानु गुलाम रभानी, रजीयाबी...
  August 26, 10:58 AM
 • सिटीबस धावल्याच नाहीत, सुमारे ८५ हजार प्रवाशांचे हाल
  सोलापूर- परिवहनकर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात तसेच इतर अन्य मागण्यांसाठी महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांच्या वतीने मंगळवारी सार्वत्रिक लाक्षणिक संप पुकारला होता. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मनपा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उभारली नसल्याने दिवसभर एकही सिटी बस मार्गस्थ झाली नाही. त्यामुळे दररोज सिटीबस सेवेचा लाभ घेणाऱ्या सुमारे ८५ हजार सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल झाले. शहऱ- जिल्ह्यात सिटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या...
  August 26, 10:48 AM
 • बोगस नळ जोडप्रकरणी ४१ जणांवर गुन्हा दाखल
  सोलापूर - शहरात बोगस नळ शोधमोहीम सुरू असून गेले चार दिवसांतील मोहिमेअंतर्गत २४३ बोगस नळजोड उघडकीला आले आहेत. महापालिकेच्या वतीने बोगस नळ घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात सुमारे ४१ नागरिकांवर विविध गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस ठाणेनिहाय दाखल झालेले गुन्हे संशयित आरोपींची नावे : फौजदार चावडी : विजयकुमार शहा, योगेश राडिया, नारायणजी ठक्कर, गणेश वाघमारे, सुनील गुंगे (रा. महावीर सोसायटी). बसवंती (पूर्ण नाव नाही), शैलेश गौतमचंद मालो, चन्नप्पा...
  August 25, 08:33 AM
 • टेलिमेडिसीनच्या सुविधेकडे सिव्हिलच्या डॉक्टरांचीच पाठ
  उस्मानाबाद - दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या जिल्हा रुग्णालयातील टेलिमेडिसीनच्या सुविधेकडे प्रत्यक्ष रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. टेलिमेडिसीनचा आधार घेऊन दुर्धर आजारांवर उपचार करण्याऐवजी रुग्णांना सोलापूरला रेफर करण्यावर भर दिला जात आहे. आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णांना ही सुविधा उपलब्ध करण्याचे कडक शब्दात निर्देश दिले आहेत. दुर्धर गुंतागुंतीच्या आजारांवर जिल्हा रुग्णालयामध्येच उपचार...
  August 25, 08:28 AM
 • वाहतूक सुधारणेसाठी पोलिस महापालिका यांच्यात बैठक, पोलिसांनी केली विविध कामे करण्याची मागणी
  सोलापूर - शहरातवाहतूक सुधारणा होत असल्याचा पोलिसांचा दावा असून, त्यात भर टाकण्यासाठी पोलिसांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे काही सुविधा देण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधित खात्याची बैठक होणार आहे. नवी वेस पोलिस चौकी ते शिवाजी चौक दरम्यान तात्पुरते रस्ता दुभाजक सध्या आहे. तेथे कायमस्वरूपी दुभाजकाची सूचना पोलिसांनी सोमवारी महापालिका आयुक्तांना भेटून केली. नगर अभियंता यांच्यासोबत पोलिस अधिकारी रस्त्याची पाहणी करणार आहेत. रस्त्यावर सध्या तात्पुरते...
  August 25, 08:21 AM
 • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतीत ३५ अनधिकृत नळ
  सोलापूर - शहरात मागील चार दिवसांपासून अनधिकृत नळ शोधमोहीम सुरू अ.सून, चौथ्या दिवशी पाच हजार ३५३ मिळकतींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८१ अनधिकृत नळ सापडले. विकास नगरच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागच्या कोर्ट कॉलनी वसाहतीत सुमारे ३५ नळ अनधिकृत होते. कारवाई करत महाापालिकेने ते बंद केले आहेत. याप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय कुमार काळ-पाटील यांनी दिली. आठझोन मधील ५३५३ मिळकत तपासणी महापालिकेनेसोमवारी...
  August 25, 08:17 AM
 • मंडळांची ‘धर्मादाय’ नोंदणी करणे गरजेचे
  सोलापूर - सार्वजनिक उत्सव मंडळांना कायद्याच्या शिस्तीचे धडे पोलिस प्रशासन देणार आहे. त्याचा कित्ता मंडळाच्या कार्यकर्त्यांना गिरवावा लागणार आहे. कायदा सुव्यवस्था राखणे आणि शिस्तबद्ध उत्सवाचा आनंद घेणे यासाठी पोलिस प्रशासन आग्रही आहे. विशेष म्हणजे, यंदापासून उत्सवासाठी कार्यकर्त्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे मंडळाची नोंदणी बंधनकारक केली आहे. मंडळाकडे नोंदणी क्रमांक नसल्यास महापालिका, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस आणि महावितरणकडून पुढील परवाने मिळणार नाहीत. मात्र, परवाने...
  August 25, 08:14 AM
 • शहर विकासावर शिंदे-बनसोडे चर्चा, खासदार बनसोडेंकडून सुशीलकुमार शिंदेंना घरी निमंत्रण
  सोलापूर - खासदार शरद बनसोडे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना चहापानासाठी घरी बोलावले आणि शिंदेंनीही मोकळेपणाने ते निमंत्रण स्वीकारले. श्रावणी सोमवारी सायंकाळी ही भेट झाली. यावेळी शहरातील विकासकामांवर चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांनी नंतर दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. श्रावणी सोमवारनिमित्त सिद्धरामेश्वरांची पूजा करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे दरवर्षीप्रमाणे यावेळीही सोलापुरात दाखल झाले आहेत. सकाळी त्यांनी सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत...
  August 25, 08:07 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा