Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur
 • विठ्ठल -भाविकांमधील अंतर कमी करण्याचे प्रयत्न, मुखदर्शन जवळ नेणार
  पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनरांगेतील गर्दी कमी होण्यासाठी सध्याच्या ठिकाणापेक्षा मुखदर्शन व्यवस्था आणखी जवळ नेता येईल का, या संदर्भात सध्या विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतीच श्री विठ्ठल मंदिरास भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंढे म्हणाले, श्री विठ्ठलाच्या पददर्शन रांगेतील भाविकांची गर्दी कमी होण्यासाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सध्याच्या ठिकाणापासून...
  04:00 AM
 • मुखदर्शन व्यवस्था जवळ नेण्याचा विचार
  पंढरपूर - श्रीविठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील गर्दी कमी होण्यासाठी सध्याच्या ठिकाणापेक्षा मुखदर्शन व्यवस्था आणखी जवळ नेता येईल का या संदर्भात सध्या विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (ता.2) श्री विठ्ठल मंदिरास भेट दिली. या वेळी त्यांनी मंदिरातील पददर्शन रांग तसेच मुखदर्शन रांगेची प्रांताधिकारी संजय तेली, मंदिराचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, तहसीलदार गजानन गुरव, मंदिराचे व्यवस्थापक विलास महाजन आदी...
  July 3, 09:43 AM
 • सोलापूर - आषाढी एकादशी ताेंडावर येऊन ठेपली असून भक्तांसह प्रशासनाला आता पंढरीच्या वारीचे वेध लागले आहे. पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही जोरदार तयारी केली आहे. पंढरपूर येथे दोन नवे बसस्थानक सुरू करण्यात येणार आहेत. पंढरपूरसाठी राज्यभरातून सुमारे हजार ३५० एसटी गाड्या सोडण्यात येतील. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दोनशे अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतल्याची माहिती सोलापूर विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली. पंढरपूरच्या...
  July 3, 09:39 AM
 • सोलापूर - गणेश पेठेतील हिंगुलांबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांची रक्कम मिळत नसल्याने बुधवारी तोडफोड झाली. संस्थेतील कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी साखर पेठ पोलिसांनी दप्तर ताब्यात घेतले. सहकार खात्याकडून फिर्याद नोंदवल्यास संबंधितांवर गुन्हे नोंदवणार आहे,असे पोलिस उपनिरीक्षक अरुण देवकर यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून २९ लाख रुपये ठेवी जमा झाल्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर कर्जे वाटण्यात आली. साधारण ३९ लाख रुपयांची कर्जे असल्याचा अंदाज सहकार खात्याने व्यक्त...
  July 3, 09:24 AM
 • डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल
  सोलापूर - प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने गुरुवारपासून संप पुकारला आहे. राज्यासह सोलापुरातील डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतल्याने आज रुग्णांचे हाल झाले.आज सकाळी शासकीय रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. मार्ड संघटनेच्या राज्यव्यापी संपात सोलापुरातील १४० निवासी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात दिवसभर रुग्णांचे हाल झाले. अनेक रुग्णांना उपचाराविना परतावे लागले. शासकीय रुग्णालयात पर्यायी वैद्यकीयसेवा उपलब्ध केली तरी...
  July 3, 09:19 AM
 • सोलापूर - मोटार वाहनाच्या धडकेमुळे गणेश कुलकर्णी यांच्या शरीरावर १७ ठिकाणी जखमा आढळून आल्या. शरीरांतर्गत २० जखमा होत्या. अशा ३७ जखमांमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची महत्त्वपूर्ण साक्ष शवविच्छेदन करणारे डॉ. अनिल हुलसूरकर यांनी गुरुवारी नोंदवली. माढ्यात झालेल्या गणेश कुलकर्णी खून खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांच्यासमोर झाली. या खटल्यातील २३ व्या साक्षीदाराच्या रूपात डॉ. हुलसूरकर न्यायालयात हजर झाले. त्यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन (पोस्टमार्टेम)...
  July 3, 09:10 AM
 • जिल्ह्यात फक्त १८ टक्के पेरण्या, पाऊस रूसला अन् बळीराजा खचला
  सोलापूर - यंदाच्या वर्षी मान्सूनने वेळेत हजेरी लावली. पण, मोजक्याच भागात पाऊस पडल्यानंतर पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात फक्त १८ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक ६७ टक्के पेरणी अक्कलकोट तालुक्यात अन् सांगोल्यात शून्य टक्के पेरणी झाली. मान्सून वेळेवर दाखल होणार, कधी सरासरीपेक्षा कमी तर कधी जास्त पाऊस होणार, असे अनेक विसंगत अंदाज हवामान खात्याकडून जाहीर केले जात असतानाच जिल्ह्यात...
  July 3, 09:04 AM
 • मनपातील भंडे घोटाळा : आणखी १६ कर्मचारी आढळले दोषी
  सोलापूर - महापालिकेतील बहुचर्चित भंडे घोटाळ्यात आणखी १६ कर्मचारी दोषी आढळले असून त्यांच्यावर गैरप्रकाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी मान्यता दिली. घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करण्यास मनपा आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. पोलिसांनी तशी मागणी करताच जेटिंगराया भंडेसह श्रीराम बाजीराव लबडे, सरस्वती मनोहर जाधव, अशोक सखाराम पवार, सिद्राम अय्यप्पा म्हेत्रे, बबन श्यामराव डोंगरे, कमल सुधाकर मिरजकर, शहनाज...
  July 3, 08:59 AM
 • यंदा आषाढी वारीचे नियोजन अमेरिकन पॅटर्ननुसार, ‘IRS’ प्रणाली वापरणार
  सोलापूर - अमेरिकेतील आयआरएस (इनसिंडन्स रिस्पॉन्स सिस्टीम) व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर यंदाच्या आषाढी सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. अमेरिकेत अधिक लोक जमणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन आयआरएस प्रणालीद्वारे केले जाते. आयआरएस म्हणजेच आपत्ती प्रतिसाद व्यवस्थापन प्रणाली यापूर्वी देशात वनविभागाने राबवली होती. यानंतर प्रथमच आषाढी सोहळ्यासाठी ही यंत्रणा वापरली जाणार आहे. याचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले....
  July 3, 04:00 AM
 • कामात हयगय केल्यास खपवून घेणार नाहीच
  पंढरपूर- आषाढी यात्रेत पालखी मार्गावर भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांनी आपसात योग्य तो समन्वय ठेवून त्या दृष्टीने संबंधित विभागांनी नियोजन करून ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी. ठरवून दिलेल्या कामात कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी वा कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिला. प्रशासनातर्फे यात्रेच्या तयारीचा आढावा प्रांत कार्यालयात मंगळवारी (दि. ३०)...
  July 2, 10:02 AM
 • रमजान विशेष: खजुराची ५० लाखांची उलाढाल
  सोलापूर- रमजान महिना आला की, खजुराची मागणी वाढते. आता तर आखाती देशातील उच्च प्रतीच्या खजुराचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. शहरात खजुराची दररोज किमान ५० लाख रुपयांची उलाढाल होते, असा अंदाज व्यापारी रिजवान मुल्ला यांनी व्यक्त केला. केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर हिंदू बांधवही या काळात खजूर खरेदी करत असतात, असे त्यांनी सांगितले. अबब...५० प्रकारचे खजूर : बाजारात सुमारे पन्नास प्रकारचे खजूर विक्रीस आले आहेत. इराण, सौदीअरब, इस्राईल, ओमान आदी आखाती देशांतून आयात केलेले आहेत. प्रकार दर...
  July 2, 09:58 AM
 • शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
  सोलापूर- जमिनीची पोत तपासणी, पावसाचा प्रत्येक थेंब स्वत:च्या हद्दीत अडवणे, पीक घेण्याचे नियोजन उपलब्ध पाणी अन्् जमिनीचा क्षमता या पंचसूत्रीच्या आधारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती उद्योग करावी. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून आपण सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले. (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन कृषी जागृती सप्ताहाचा...
  July 2, 09:53 AM
 • महामार्ग कार्यालयावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपले
  सोलापूर- राष्ट्रीय महामार्गाचे विभागीय कार्यालय सोलापुरातून कोल्हापूरला पळवण्यात आले. दिव्य मराठीने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर मात्र काँग्रेस आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांकडे बोट दाखवायला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात कार्यालय पळवले गेल्याचे भाजप खासदार शरद बनसोडे यांनी सांगितले तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार बनसोडे आदी भाजप लोकप्रतिनिधींमुळे कार्यालय कोल्हापूरला पळवले गेल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे....
  July 2, 09:48 AM
 • सर, आम्हाला अॅडमिशन द्या प्लीज!
  सोलापूर- आम्ही याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. सर, प्लीज अॅडमिशन द्या की... अशा विनवण्या प्राचार्य आणि विद्यापीठास करूनही पुढील वर्षात प्रवेश मिळत नसल्याने शेकडो विद्यार्थी यंदा हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या मान्यतेसाठी महाविद्यालये विद्यापीठाकडे तर विद्यापीठ शासनाकडे बोट दाखवत आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न जैसे थे आहे. वाढीव विद्यार्थी असलेल्या प्रत्येक महाविद्यालयासमोर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थी या समस्येला तोंड देत आहेत. गतवर्षी शहर...
  July 2, 09:42 AM
 • दर्शनरांगेतील वारकऱ्यांना मोफत चहा, वैद्यकीय सुविधा मिळणार !
  सोलापूर - यंदाच्या आषाढी यात्रेचे संपूर्ण नियोजन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे करत आहेत. वारकऱ्यांना मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाचा अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून दर्शनमंडप व दर्शनरांगेतील भाविकांना मोफत चहा, पाणी देण्यात येणार अाहे. शिवाय आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीचा खर्च मंदिर समिती करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिली. सरकारने मंदिर समिती बरखास्त केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मंदिर प्रशासनाच्या अध्यक्षपदी...
  July 2, 04:00 AM
 • संशयिताऐवजी दुसऱ्यालाच पकडले
  मंगळवेढा- वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिस हवालदाराने संशयित आरोपीला सोडून दुसऱ्याच व्यक्तीला गाडीवरून मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे नेण्याचा प्रकार भाळवणी येथे सोमवारी (दि. २९) सकाळी साडेसातला घडला. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी हवालदाराने दिलगिरी व्यक्त करत त्याला सोडले आणि चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार टळला. नवे पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची खांदेपालट केली आहे. न्यायालयाकडे वाॅरंटसाठीचे हवालदार विठ्ठल साळुंखे यांची वाहतूक तर वाहतूक...
  July 1, 10:35 AM
 • मुले शाळेत अन् शिक्षक शाळाबाह्य मुलांच्या सर्वे प्रशिक्षणात
  सोलापूर- शहरातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने शाळेच्या वेळेतच प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन शाळेतील मुलांच्या शिक्षण सुविधेकडे दुर्लक्ष केले. एकीकडे पालिकांच्या शाळा ओस पडताहेत. शिक्षकांनी कसेबसे मुलांना वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरून पटावर आणले. परंतु शाळेच्या या वेळेतच प्रशिक्षण घेतल्याने शिक्षक शाळाबाह्य अशी स्थिती मनपा शाळांची मंगळवारी होती. महापालिका शाळांकडे विद्यार्थ्यांसह पालकांनी पाठ फिरवली. काही शाळांच्या इमारती ओस पडल्या तर काही शाळांमध्ये...
  July 1, 10:31 AM
 • पदवीधरांसाठी संधी, बँकांमध्ये २० हजार तर टपाल खात्यात हजार पदांची भरती
  सोलापूर- राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी आॅफिसरची २० हजार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्याच्या परीक्षा होतील. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १० जुलैपर्यंत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातही ५०४ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १८ ते २५ वयोगटातील पदवीधर त्यासाठी अर्ज करू शकतात. देशभरातील बँकांमध्ये लाख पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी सुमारे ५० हजार पदे भरली गेली. यंदा २० हजार पदे भरण्याची मोहीम हाती घेण्यात आली....
  July 1, 09:58 AM
 • एचआयव्हीबाधितांसाठी 'लोकमंगल', एड्स आजाराविषयी वर्षभर करणार जनजागृती
  सोलापूर- एचआयव्हीबाधितांना मदतीचा हात देण्यासाठी लाेकमंगल साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. पुढील वर्षभर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मंडळाच्या एड्सविषयी जनजागृती कार्यक्रमात लोकमंगलचा सहभाग राहणार आहे. बाधितांसाठी आरोग्य तसेच शिक्षणाचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. एचआयव्हीबाधितांच्या मदतीसाठी सहकारी संस्था, खासगी कंपन्या, इतर संस्थांना शासनातर्फे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत ही योजना राबवण्यासाठी लोकमंगलने पुढाकार घेतला....
  July 1, 09:53 AM
 • सक्ती नव्हे, हेल्मेट सुरक्षेसाठी वापरा
  सोलापूर- हेल्मेट सक्तीकरणार नाही, पण स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करा, असे आवाहन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी मंगळवारी केले. तुमची काळजी तुम्हीच घ्या. हेल्मेट वापरणे चांगलेच आहे. त्याची अंमलबजावणी अथवा सक्ती करण्यापेक्षा स्वत: नियम पाळा, असेही ते म्हणाले. शहरात बुधवारपासून हेल्मेट सक्ती असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. काही लोकांचा यामुळे हेल्मेटसक्तीला विरोध आहे. काहींनी पोलिस आयुक्तांना भेटून निवेदने दिली आहेत. मंगळवारी पोलिस आयुक्तालयात...
  July 1, 09:49 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा