Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • मान्यता रद्दच्या तंबीला वर्ष झाले; तरी प्राणिसंग्रहालयात सुधारणा नाही
  सोलापूर - केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) प्राणिसंग्रहालयाची मान्यताच रद्द करण्याची तंबी महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयास दिली होती. या घटनेला वर्ष झाले. पण, काहीही सुधारणा झाल्या नाहीत. पुढील महिन्यात महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (एमझेडए) समिती पहिल्यांदाच प्राणिसंग्रहालय तपासणीसाठी येत आहे. त्यांच्याकडूनही कारवाई दणका बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सीझेडए समितीने महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाची तपासणी केली. त्यावेळी उद्यान...
  April 25, 09:16 AM
 • संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा आज कोल्हापुरातून सुरू, सुनील तटकरे यांची सोलापुरात माहिती
  सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडून राज्यभर संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. संघर्ष यात्रेचा तिसरा टप्प्याची सुरुवात मंगळवारी (दि. २५)पासून कोल्हापूर येथून काढण्यात येणार आहे. ही यात्रा पुढे सांगली, सातारा जिल्ह्यात जाणार आहे. १० ११ मे रोजी असे दोन दिवस आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली....
  April 25, 09:16 AM
 • टॉवेल, नॅपकीन घेण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरू, खासदार अॅड. शरद बनसोडे यांचे आश्वासन
  सोलापूर - सोलापुरात उत्पादित होणारे टॉवेल, नॅपकीन केंद्रीय कार्यालयांत जाण्यासाठी पंतप्रधानांकडे आग्रह धरू, असे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी येथे सांगितले. पद्मशाली स्मशानभूमीत बांधलेल्या ५० हजार लिटर क्षमतेच्या टाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या कामासाठी त्यांनी १५ लाख रुपये निधी दिला. त्याबद्दल पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी सत्कार केला. या वेळी सरचिटणीस सुरेश फलमारी, उपाध्यक्ष बालराज बोल्ली, नगरसेवक नागेश...
  April 25, 09:07 AM
 • पंढरपूरला महापूजेसाठी जाणाऱ्या बुलडाण्याच्या ४ भाविकांचा मृत्यू
  बीड- पंढरपूरला महापूजेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला चौसाळ्यानजीक वानगावजवळ झालेल्या अपघातात चार जण ठार, तर सात जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. सर्व मृत व जखमी हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. साखरझोपेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. बुलडाणा येथील दिवंगत माजी आमदार डॉ. राजेंद्र गोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील विविध भजनी मंडळे महापूजेसाठी पंढरपूरला जात होते. एकूण ३० गाड्यांचा ताफा भाविकांना घेऊन पंढरपूरकडे जात असताना सोमवारी...
  April 25, 04:57 AM
 • भाजप आमदार ठाकुरांचे नियम डावलून तुळजाभवानी देवीचे 'व्हीआयपी' दर्शन; हजारो भाविक ताटकळले
  तुळजापूर - भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी रविवारी मंदिर देवस्थानचे सर्व नियम मोडीत काढत आपल्या ५० ते ६० कार्यकर्त्यांबरोबर श्री तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन घेतले. त्यामुळे बराच वेळ ताटकळत बसावे लागणाऱ्या इतर भाविकांनी मात्र संताप व्यक्त केला. भाजप आमदार ठाकूर रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्यकर्त्यांसह तुळजाभवानी मंदिरात दाखल झाले. ठाकूर आणि त्यांच्यासमवेत आलेल्या कार्यकर्त्यांनी मंदिराचे नियम डावलून मंदिरात घुसून दर्शन घेतले. यामुळे जवळपास अर्धा तास रांगेत...
  April 24, 09:50 AM
 • सांगता मिरवणूक उत्साही, भीमलेकरांचे अभिवादन; मोहक देखाव्यांतून सामाजिक संदेश
  साेलापूर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत लाइव्ह डीजे, लेझर शो, लाइव्ह व्हिडिओ यांच्या सोबतच थिरकरणारी तरुणाई जय भीमचा गजर करीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाली. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे अाकर्षक देखावे आणि विविध मंडळांनी दिलेले सामाजिक संदेश. डॉल्बीच्या बेभान सुरांवर थिरकणारी तरुणाई उत्साहाच्या निळ्या लाटेवर स्वार झालेली दिसून आली. मिरवणुकीत सहभागी होताना डॉ. आंबेडकर यंाच्या पुतळ्याला अभिवादन केले जात होते. रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून पार्क...
  April 24, 09:38 AM
 • पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमास विरोधी गट गैरहजर; शिस्तीचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपात बेदिली
  सोलापूर- शिस्तीचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपमधील बेदिली रविवारी पुन्हा एकदा दिसून आली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासह १६ नगरसेवकांनी पाठ फिरवली. ही मंडळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे समर्थक मानली जातात. अर्थात कार्यक्रम त्यांच्या विरोधी गटाच्या म्हणजे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा होता. स्वीकृत नगरसेवक पदाच्या भाजपच्या दोन्ही जागांवर पालकमंत्र्यांच्या...
  April 24, 09:34 AM
 • मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रिपद, तरीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; सुनिल तटकरे यांची टीका
  पंढरपूर- दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या आमदार निवासाात तरुणीवर झालेल्या दुष्कर्माचा प्रकार गंभीर आहे. राज्यात दिवसाढवळ्या महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत. अत्याचार करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असूनही राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत अाहे. सरकारच्या दृष्टीने ही शरमेची बाब असल्याची असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. नागपूर अत्याचाराच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची...
  April 23, 09:59 AM
 • तिघा शेतकऱ्यांची प्रकृती खालावली, माेहोळमध्ये उपचारानंतर घरी सोडले
  पापरी- आष्टी उपसा जलसिंचन योजनेच्या डाव्या उजव्या कालव्यात पाणी सोडावे, कालव्यासाठी संपादित जमीनीचा मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कोन्हेरी येथे आष्टी योजनेच्या उजव्या कालव्यात महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लाभक्षेत्रातील ३०० शेतकऱ्यांचे सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. शनिवारी (दि. २२) उपोषणकर्त्या तिघा शेतकऱ्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यात अंगात ताप, अशक्तपणा आढळल्याने मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार...
  April 23, 09:56 AM
 • उजनीचे पाणी वाया, चार हजार कोटींचा फटका बसेल; अजित पवार यांनी व्यक्त केली भीती
  मोहोळ- यंदा उजनी धरण ११० टक्के भरले होते. मात्र, केवळ नियोजनाचा अभाव असल्याने पाणी वाया गेले. यामुळे उसासह द्राक्ष डाळिंबाचा हंगाम अडचणीत आल्यास जिल्ह्याला तीन ते चार कोटी रुपयांचा फटका बसेल, अशी भीती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. शनिवारी (दि. २२) बारामती सहकारी बँकेच्या येथील शाखेचे उद््घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील सहकार क्षेत्रासमोर दररोज नवनवीन आव्हाने निर्माण होत असल्याचे सांगून पवार म्हणाले, कॅशलेस व्यवहार कठीण असला तरी काळाची गरज आहे. ज्याची पत...
  April 23, 09:39 AM
 • मंगळवेढ्यात अवैध साठ्यावर कारवाई, 300 ब्रास वाळू जप्त
  मंगळवेढा - मंगळवेढा पोलिस प्रशासनाने तांडोर येथील भीमा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून शासकीय जमिनीवर केलेल्या साठ्यावर कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुरुवारी दुपारी २.३० वा. छापा टाकून ३०० ब्रास वाळूसह २२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन जाफर पवार याच्यासह दोन दोघांवर वाळू चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय लवादाने भीमा नदीतील वाळू उपशावर निर्बंध घातले असतानाही बठान, तामदडी, तांडोर, ब्रह्मपुरी,...
  April 22, 11:15 AM
 • हस्तांतरणामुळे दोन हजार झाडांकडे दुर्लक्ष; ठोंबरे यांच्यामुळे झाडांना मिळाले जीवदान
  कळंब - तांदूळवाडीते मोहा राज्य महामार्गावर लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी वाळत असल्यामुळे एका युवकाने स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी आणून झाडांना टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे तांदूळवाडी-मोहा मार्गावरील दोन हजार झाडांना जीवदान मिळाले आहे. संगोपन कालावधी संपल्यामुळे झाडे पाण्याविना वाळून जात होती. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. झाडे लावा झाडे जगवा असे शासन सर्वांना सांगत आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून शासनही झाडे लावण्यासाठी पुढाकार घेत आहे. मात्र, दुसरीकडे शासनच...
  April 22, 09:49 AM
 • अंधांची राज्य क्रिकेट स्पर्धा : सोलापूरसह सांगली, मुंबई पुणे उपांत्य फेरीत
  सोलापूर - अंधांच्या राज्य क्रिकेट स्पर्धेत यजमान सोलापूरसह सांगली, मुंबई पुणे संघांनी उपांत्य फेरी गाठली. येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर शुक्रवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत सोलापूरने लातूरवर १५ धावांनी मात केली. कर्णधार राजू शेळके त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने २५ धावा फटकावल्या. अन्य सामन्यात अविनाश घोडकेच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर सांगलीने सातारास ८८ धावांनी पराभूत केले. मुंबईने कोल्हापूरवर तर पुण्याने औरंगाबादवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. मुंबईचा सुनील...
  April 22, 09:15 AM
 • आत्महत्या प्रकरण: व्हटकरांकडेच ‘कचऱ्या’सह वाहन, झाडू खरेदीची फाइल
  सोलापूर - महापालिकेतील मिश्रक संजय व्हटकर यांच्याकडे टिपणी काढण्याचे कौशल्य होते. नियम-कायद्याला धरून ते व्यवस्थित कागदपत्रे तयार करत असत. त्यामुळे मिश्रक असूनही त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फाइल हाताळण्याचे प्रशासकीय काम दिले होते. कचरा वाहतूक खासगीकरण मक्ता, वाहन खरेदी आणि रस्ते सफाई अशा तीन कामांच्या तीन फाइल ते पाहात होते. व्हटकर यांनी गुरुवारी रेल्वेगाडीखाली आत्महत्या केली. त्यांच्याकडील चिठ्ठीत तीन अधिकाऱ्यांचा आणि कामाबाबत ताण असल्याचा उल्लेख आहे. व्हटकर हे सहायक...
  April 22, 09:08 AM
 • बॅनर आणण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, दोघे ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून ठार
  वाशी- भूमतालुक्यातील रामकुंड येथील यात्रेमध्ये भाविकांच्या स्वागतासाठी लावण्यात येणारे बॅनर आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांवर परतताना वाटेत काळाने घाला घातला. ही घटना बुधवारी (दि.१९) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील गिरवली (पाटी) येथे घडली. रामकुंड येथील तरुण बालाजी कदम (२७) आणि विशाल बोंद्रे हे दोघे तरुण पारगाव येथे यात्रेसाठी लागणारे बॅनर आणायला गेले होते. दरम्यान, बालाजी कदम आणि विशाल बोंद्रे हे दोघे मध्यरात्री पारगाव येथून रामकुंड येथे येण्यासाठी निघाले. यावेळी...
  April 21, 10:03 AM
 • सोलापूर: चालकाच्या चुकीने दुभाजकावर एसटी, एकूण 14 प्रवासी जखमी
  सोलापूर -सोलापूरते मुरुम जाणारी एसटी बसचालकाच्या चुकीमुळे थेट दुभाजकावर चढली. यात १४ प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सोलापूर बस स्थानकाच्या समोर घडली. दरम्यान, एसटी प्रशासनाने घटनेच्या चौकशीचा अादेश दिला अाहे. तसेच जखमी प्रवाशांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात आली. सोलापूरहून मुरुमला जाण्यासाठी सकाळी सोलापूर बस स्थानकावरून एसटी निघाली. बस स्थानकाच्या समाेर असलेल्या दुभाजका समोर थेट एसटी चढली. काही...
  April 21, 09:47 AM
 • सोलापूर : महापालिका; पालकमंत्री गटाचा वरचष्मा, सुभाष देशमुख गटाला झटका
  सोलापूर - महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात स्वीकृत नगरसेवक निवडीवरून घडलेल्या राजकीय डावपेचात पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाने दोन्ही जागा अापल्या गटाकडे खेचून घेत सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाला चांगलाच तडाखा दिला. त्यांचे विश्वासू अविनाश महागावकर यांचाच पत्ता कट झाला. तर नवख्या मुन्ना वानकर यांना संधी दिली गेली. या निमित्ताने पक्षातील गटबाजी इंद्रभुवन परिसरात उघडपणे समोर अाली. या घोळात सकाळी ११ होणारी निवड दुपारी १.३० वाजता झाली. भाजपच्या वाट्याला दोन सदस्यपदे...
  April 21, 09:38 AM
 • सोलापूर: मनपाच्या वादग्रस्त कचरा टेंडरची फाइल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याची अात्महत्या
  सोलापूर - महापालिकेतील वादग्रस्त ठरलेल्या कचरा खासगीकरणाच्या टेंडरची फाइल सांभाळणारे फार्मासिस्ट संजय ज्ञानोबा व्हटकर (वय ४५, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल चौक) यांनी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आत्महत्येविषयी चिठ्ठी सापडली आहे. त्यात महापालिकेच्या अारोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी त्रास दिल्याचा उल्लेख अाहे. होटगी रस्ता परिसरातील रेल्वेरुळावर त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. सोलापूर रेल्वे मार्ग पोलिसांनी सकाळी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली....
  April 21, 09:22 AM
 • उस्मानाबादचा पारा 42.2 सेल्सिअस, जलतरणासाठी वाढतेय गर्दी
  उस्मानाबाद दोनते तीन दिवसांपासून राज्यासह उस्मानाबादच्या तापमानात वाढ होत आहे. बुधवारी उस्मानाबादचे तापमान ४२.२ सेल्सिअस नोंदवले गेले. तापमान वाढल्याने दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत रस्त्यावर शुकशुकाट होतो. बाजारपेठा, शासकीय कार्यालयातदेखील शुकशुकाट जाणवत होता. उन्हाच्या कडक्यापासून बचावासाठी अनेकांनी दुपारी घराबाहेर पडणे पसंत केले. पुढील स्लाइडवर वाचा,पाथरुड परिसरात उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचीही होतेय काहिली!... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या...
  April 20, 10:44 AM
 • उस्मानाबाद: येडेश्वरीच्या यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलांना अटक
  उस्मानाबाद - येरमाळायेथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिला भाविकांचे मंगळसूत्र तसेच मोबाइल लंपास करणाऱ्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन येरमाळा पोलिसांकडे सोपविले. तसेच संशयास्पद वाटणाऱ्या जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. येरमाळा यात्रेदरम्यान, गर्दीचा फायदा घेऊन काही बाहेर जिल्ह्यातील चोरटे सक्रिय झाल्याची माहिती स्थािनक गुन्हे शाखेला मिळालेली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे, पोलिस...
  April 20, 10:37 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा