आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
Loading advertisement...

नवी कथा:'अग्गंबाई सासूबाई'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय पुढची कथा 'अग्गंबाई सूनबाई', तेजश्री प्रधानऐवजी लागली या अभिनेत्रीची वर्णी

5 महिन्यांपूर्वी
  • आता मालिकेची नवीन कथा येत्या 15 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
Loading advertisement...
दैनिक दिव्य मराठी वाचण्यासाठी...
ब्राउजर मध्येच

छोट्या पडद्यावरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका प्रचंड गाजत आहे. आजोबा, आसावरी, अभिजीत राजे, बबड्या आणि शुभ्रा या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत आता आसावरीच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत झाल्याचे दिसत आहे. बबड्या अर्थातच सोहम सुधारला आहे. सर्वकाही गोडीगुलाबीने चाललंय. आता मालिकेची नवीन कथा येत्या 15 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या नव्या कथेसह मालिकेचे शीर्षकही बदलण्यात आलेले आहे. आता 'अग्गंबाई सासूबाई'ऐवजी 'अग्गंबाई सूनबाई' हे मालिकेचे शीर्षक आहे.

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील व्यक्तिरेखा नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच झी मराठीने नवीन मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहेत. यात अभिजीत राजे आणि आसावरी दिसत आहेत. आसावरी एका मोठ्या कंपनीची मालकीण झालेली या प्रोमोत दिसतेय. तिचा लूकही बदलेला दिसतोय. तर अभिजीत राजेदेखील थोडे वयस्कर झालेले दिसत आहेत. विशेष म्हणजे या प्रोमोत एक लक्ष वेधून घेणारा बदल आहे. म्हणजे शुभ्राच्या भूमिकेत आता तेजश्री प्रधान दिसणार नाहीये. अभिनेत्री उमा हृषिकेश हिने मालिकेत तेजश्रीची जागा घेतली आहे.

नव्या प्रोमोत अभिजीत आणि आसावरी आजीआजोबा झाले असून शुभ्रा आणि सोहम आईबाबा झाल्याचे दिसत आहेत.

अभिनेत्री उमा हृषिकेश हिने स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंच्या भूमिका वठवली होती. आता ती 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेमध्ये शुभ्राचे पात्र साकारताना दिसणार आहे. या नव्या कथेत सोहमची भूमिका आशुतोष पत्की साकारणार की नाही, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. मात्र या नव्या कथेचा प्रोमो लक्ष वेधून घेतोय हे नक्की.

Loading advertisement...
बातम्या आणखी आहेत...