Thu, Nov 19, 2026Updated 10:13 AM IST

वारीत स्वच्छता, पाणीपुरवठा अन् सुविधांना प्राधान्य:कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करून यंत्रणेला सूचना

पंढरपूर1 तासापूर्वी
Loading advertisement...

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी वाखरी पालखी तळ, सरगम चौक, चंद्रभागा वाळवंट आणि भक्तिसागर परिसराची पाहणी करून संबंधित विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Loading advertisement...

या पाहणीवेळी नगराध्यक्षा प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी सीताराम डुबल, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी आदी उपस्थित होते.

चंद्रभागा नदीपात्र व घाट परिसरात स्वच्छता कायम राखण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत. नदीकाठावरील काटेरी झाडे-झुडपे हटवावीत, घाटांवरील माती काढून घाट स्वच्छ धुऊन घ्यावेत, तसेच घाटांच्या कोपऱ्यांत साचलेला कचरा तातडीने हटवावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

भक्तिसागरात तातडीने सपाटीकरण, मुरूमीकरण करा भक्तिसागर परिसरात दिंड्यांसोबत येणारे वारकरी व भाविक मोठ्या संख्येने वास्तव्यास असतात. त्यांच्या सोयीसाठी नदीपात्रात ये-जा करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या घाटाचे मुरूमीकरण व सपाटीकरण तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

.

LockIcon

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा