Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • सर्वच धर्मांमध्ये उपवासाची आवश्यकता सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परंपरेप्रमाणे उपवास किंवा व्रत करतच असतो. उपवासाचा संबंध आपल्या मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरणाशी आहे. हे महत्त्व ध्यानात घेऊनच अनेक धर्मांनी उपवासाची योजना केलेली असावी. वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही आठवड्यातून एकदा उपवास करणे आवश्यक आहे. प्रत्येक आजारावार उपवास हाच उपाय आहे असे नाही, परंतु अधिकांश आजारांवर उपवास रामबाण आहे.उपवासाचे अनेक फायदे आहेत. उपवासाने शरीराला ऊर्जा मिळते. उपवास केल्याने...
  September 16, 07:05 PM
 • आजकाल लोकांचे जीवन धावपळीचे बनले आहे. वाढत्या कार्यबाहुल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ताण-तणाव वाढणे सामान्य गोष्ट आहे. काही जणांना वाढत्या कामांमुळे अनिद्रेचा त्रास होऊ लागतो. अंगठा आणि अंगठ्या शेजारील बोटांचे टोक जुळविल्याने ज्ञानमुद्रा बनते. या मुद्रेत रोज दहा मिनिटे बनल्याने मेंदूची दुर्बलता दूर होते. साधनेत मन लागते. ध्यान एकाग्रचित्त होते. या मुद्रेसोबत मंत्राचा जप केल्यास तो मंत्र सिद्ध होतो. परमानंदाची प्राप्ती होते. या मुद्रेच्या आधारानेच ऋषी मुनींनी परमज्ञान प्राप्त...
  September 15, 04:02 PM
 • आजच्या काळात प्रदूषण वाढलेले आहे. जेवणाच्या वेळा अनियमित झाल्या आहेत. परिणामी केसांच्या समस्या वाढल्या आहेत. केस कोरडे आणि निष्प्राण झाले आहेत. अशाने आपण चिंतीत असाल तर आजीच्या कानगोष्टी करून पाहा. या गोष्टी शेकडो वर्षांपासून वापरात आहेत. - दहीत बेसन घालून केसांच्या मुळांशी लावा. एका तासानंतर केस धुवून काढा. याने केसांची चमक वाढेल. केसांच्या समस्या दूर होतील.- कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी दहीत कालीमिर्च चूर्ण मिसळून डोके धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. यामुळे कोंडा नाहीसा होईल....
  September 14, 10:05 PM
 • आयुर्वेदात अदरकाला औषधी असल्याचे म्हटले आहे. अदरकात अनेक औषधी गुण आहेत. असाध्य रोगांना दूर करणारे अदरक वरदान आहे. तोंडापासून ते घशापर्यंतच्या अनेक रोगांत अदरक गुणकारी आहे. अदरक पचनशक्ती वाढविणारे आहे. अपचन, गॅसेस, उलटी, खोकला, कफ अशा अनेक आजारांत अदरक रामबाण औषध आहे. अदरकाचा पुढीलप्रमाणे उपयोग करून रोगांपासून मुक्ती मिळवा...- अदरकाचा अधिकाधिक वापर केल्याने थंडी, ताप, घशाला सूज, हिरड्यांचे दुखणे आदी आजार कमी होतात.- पाण्यासोबत सुंठ घासून यात थोडे जुने गुळ आणि पाच सहा थेंब तूप मिसळून गरम करून...
  September 13, 03:19 PM
 • कच्चे दूध त्वचेसाठी वरदान आहे. कच्चे दूध पिल्याने आणि त्वचेला लावल्याने त्वचेवर एक प्रकारची चमक येते. दुधाने शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होतो. त्वचेच्या क्लीजिंगचे कामही दुधामुळे होते. कच्च्या दुधात गुलाबाच्या पाकळया वाटून टाकावेत आणि हे दूध त्वचेवर लावल्याने त्वचेचे सौंदर्य वाढते.गाढविणीचे दूध सेवन केल्याने त्वचेचे सौंदर्य वाढते. याला इतिहास साक्षी आहे. इजिप्तमध्ये महिला आपले सौंदर्य वाढविण्यासाठी गाढविणीच्या दुधाचा वापर करीत असत. गाढविणीच्या दुधाने केवळ सौंदर्य वृद्धीच होते...
  September 12, 04:40 PM
 • मध हे औषधी आहे. शरीराला उपकारक आहे. परंतु मध खाताना आपण काही बाबींकडे दुर्लक्ष केले तर मध हानीकारकही ठरण्याची शक्यता असते. तुम्ही जेव्हा केव्हा मध खाल तेव्हा पुढील गोष्टी सदैव ध्यानात ठेवा.- चहा आणि कॉफी आदी पेयांसोबत मध घेऊ नका. - ऊस, द्राक्ष, पेरू आणि आंबट फळांसोबत मध खाणे अमृत खाल्लयासारखे आहे.- शरीराला आवश्यक असणारे लोह, गंधक, मॅगनीज, पोटॅशियम आदी खनिज द्रव्ये मधात असतात.- एक चमचा मधात 75 ग्रॅम कॅलरी ऊर्जा असते.- काही कारणाने मध खाल्ल्याने त्रास झाला तर लिंबू खा.- मध कधीही तापवू नका.- मांस, मासे...
  September 9, 05:47 PM
 • अनियमित खाणे पिणे आणि कमी शारीरिक श्रम यामुळे आजकाल तरुण वयातच ढेरी वाढलेले अनेकजण दिसतात. वेस्टर्न कपड्यांमध्ये ढेरी लपविणे शक्य होत नाही. ढेरी कमी करण्याचा दावा करणारे अनेक बेल्ट, स्लिमिंग टी बाजारात सहज मिळतात. परंतु योगसन हाच एकमेव उपाय असा की जो आपल्या पोटाला योग्य आकार देऊ शकतो.आसन कसे करावे ?सतरंजी किंवा चटई अंथरून त्यावर उभे राहा. पायात किंचित अंतर ठेवा. छाती समोर फुलवा. आता दीर्घ श्वास घ्या आणि कंबर शक्य तेवढे फिरवा. पुढे मागे, डावीकडे उजवीकडे. 40 सेंकदापासून सुरू करून रोज ही अवधी...
  September 8, 07:08 PM
 • डोळ्यांचे विकार कोणत्याही वयात होऊ शकतात. डोळ्यांचे आजार असणा-यांना वाचन-लेखन करताना त्रास होतो. अक्षरे अस्पष्ट दिसतात. कमी वयात चष्मा लागतो. दृष्टी असेल तर सृष्टी आहे असे म्हणतात, ते खरेच आहे. डोळे अनमोल आहेत. डोळ्यांची योग्य निगा राखणे आपल्याच हिताचे असते. योगशास्त्रातील काही बाबी आत्मसात केल्यास आपल्याला डोळ्यांच्या आजारांवर मात करता येणे शक्य आहे. हस्तमुद्रा आणि प्राणमुद्रा केल्यानेही डोळ्यांच्या अनेक तक्रारी दूर होतात.प्राणमुद्रा. अंगठ्याच्या टोकाला करंगळी आणि अनामिका या...
  September 7, 04:15 PM
 • आपल्या जीवनात श्वासाला खूप महत्त्व आहे. श्वास या शब्दाचा वापर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याने अंतिम श्वास घेतला असा करण्यात येतो. श्वास घेताना आपण प्राणवायू घेतो, त्याला विष्णुपदामृतही म्हटले जाते. एकूणच काय तर आपल्या जीवनात श्वास आणि उच्छवास याला अतिशय महत्त्व आहे. योग आणि प्राणायाम यामध्येही श्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्वास घेणे म्हणजे पूरक, सोडणे म्हणजे रेचक आणि रोखून ठेवणे म्हणजे कुंभक होय. असे म्हटले जाते की आपल्याला श्वास हे मोजूनच मिळालेले असतात. दीर्घायुष्य प्राप्त...
  September 6, 05:29 PM
 • कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरूनही ठरत असते. मुलगा असू द्या की मुलगी, सुंदर ओठांमुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. परंतु काही लोकांचे ओठ हे नैसर्गिकरीत्याच काळे असतात. किंवा काही लोकांचे ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडते. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. येथे काही अतिशय साधे घरगुती उपाय आहेत. या उपायांनी तुमच्या ओठांचे सौंदर्य निश्चितच वाढेल.उपाय- ओठांचे पापुद्रे निघत असतील, ओठांना चीर पडत असतील तर रात्री झोपताना...
  September 5, 04:39 PM
 • धर्म, पूजा-पाठ, व्रत-उपवास आदी बाबी श्रद्धा आणि आस्थेच्या मर्यादित कक्षेतच बांधून ठेवणे कितपत योग्य आहे ? या सर्व गोष्टींना विज्ञानाच्या कसोटीवर घासून पुसूनच घ्यावे लागेल. या बाबी विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्या तर तरुण पिढी निश्चित स्वीकारेल. पाश्चात्य जगतात योगाची हजारोने केंद्रे उभी राहात आहेत, यामागे हेच तर कारण आहे.केवळ श्रद्धा आणि विश्वास याचे नाव पुढे करून एखादी जीवनशैली कोणावरही लादता येणार नाही. बुद्धीप्रधान आणि तर्कनिष्ठ तरुणाईला वैज्ञानिक परिभाषेत धर्म, अध्यात्म योग्य वाटणे...
  September 3, 02:49 PM
 • आजच्या काळात सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. अशा स्थितीत टेन्शन येणे, तणावग्रस्त होणे स्वाभाविक आहे. छोट्या छोट्या अडचणींमुळे निराशाही येऊ शकते. अत्याधिक कामाचा ताण आणि चंचल मन यामुळे एकाग्रता कमी होत आहे. या समस्येवर औषधांमुळे मात करता येणे शक्य नाही. केवळ योगाच्या आधारानेच आपल्याला यावर मात करणे शक्य आहे. टेन्शन दूर करण्यासाठी योगनिद्रा सर्वाेत्तम आहे. योगनिद्रेमुळे मेंदू आणि हृदय दोन्हीही तंदुरुस्त राहतात. योगनिद्रेच्या माध्यमातून कमी वेळ निद्रा घेऊनही ताजेतवाने राहणे शक्य...
  September 2, 06:04 PM
 • जीवनात सुख, शांती, आनंद आणि उल्हास आणण्यासाठी नियमितपणे ध्यान करणे आवश्यक आहे. काही लोकांना वाटते की ध्यान करणे ही गोष्ट खूप अवघड आहे. परंतु ध्यान करणे ही गोष्ट आपण समजतो त्याप्रमाणे अवघड नाही. खाली सांगितल्याप्रमाणे प्रयोग केल्यास ब्लडप्रेशर, हार्ट अॅटॅकसारखे आजार पळून जातात आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.ध्यान कसे करावे ?तुम्हाला आराम वाटेल अशा कोणत्याही एका आसनात बसा. पद्मासन किंवा वज्रासनात बसणे अधिक सोयीचे. आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पाठ मान आणि डोके एका सरळ रेषेत असू...
  September 1, 07:24 PM
 • बडीशेप खूपच गुणकारी आहे. बडीशेप ही केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाही. आयुर्वेदानुसार नियमित बडीशेप खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. बदाम, बडीशेप आणि मिश्री एकत्र वाटून दररोज जेवणानंतर एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते.- दररोज जेवल्यानंतर 30 मिनिटांनी बडीशेप खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो.- रोज 5/6 ग्रॅम बडीशेप खाल्ल्याने यकृत चांगले राहते. डोळे तेजस्वी होतात. - जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने पोटदुखी कमी होते. गॅस्ट्रो आजारातही लाभ होतो.- नियमित बडीशेप खाल्ल्याने अपचनाचा त्रास...
  September 1, 02:49 PM
 • ब-याच वेळेस आजार हे नकळत किंवा एखाद्या गोष्टीच्या अधीन जाऊन काम केल्यामुळे होतात. आयुर्वेदात याला प्रज्ञाअपराध म्हणले जाते. जसे की आपल्याला माहित आहे असुरक्षित शरीर संभोग हा खतरनाक असतो तरीही जाणूनबुजून, अनवधानाने केल्या गेलेल्या कामामुळे 'एच.आई वी संक्रमणाचा धोका आयुर्वेदात खूप वर्षापूर्वी प्रज्ञाअपराध नावाने सांगितला गेला आहे. प्रज्ञापराधाला सर्व रोगांच्या उत्पतीचे कारण मानले गले आहे. म्हणजे जीवनात खान-पान, संयमित व्यवहार करणे, पथ्य-अपथ्य (जे प्रकृतीला अनुरूप आहेत) व्यवस्थित...
  August 30, 11:58 AM
 • मधुमेह असणा-यांच्या रक्तात साखरेचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी वॉक करण्याचा सल्ला दिला जातो, परंतु यापूर्वी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दररोज पायी चालावे. कारण कामाचे वेळापत्रक कोलमडल्याने योग्य लाभ होत नाही. सुरुवातीला १० ते १५ मिनिटे चालावे. त्यानंतर हळूहळू वेळ वाढवावा. पायाचा घाम शोषून घेणारे मोजे घालावे. तसेच पायातील रक्तप्रवाह या मोज्यांमुळे थांबता कामा नये. सुविधायुक्त बूट पायात घालावा. कारण पाय जखमी होण्याची शक्यता राहणार नाही. वॉक केल्यानंतर पायामध्ये खाज येते, तेव्हा ओपन...
  August 26, 09:25 AM
 • पाणी पिण्याची सवय लावून घेतली पाहिजे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपले वजन नियंत्रित राहते. दीर्घकाळपर्यंत तंदुरुस्त राहण्यासाठीही पाण्याचे महत्त्व आहे. पाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. पाण्याने वजनही कमी होते. त्यामुळेच म्हणतात की दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. व्यायामही केलं पाहिजे. परंतु काही लोकांना व्यायामानंतर किंवा थकून आल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. असे करणे चुकीचे आहे.व्यायामानंतर किंवा...
  August 24, 06:14 PM
 • देवाने दिलेली अनमोल देणगी म्हणजे डोळे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. परंतु वाढत्या तंत्रज्ञानामुळे आज कॉंप्युटर आणि टीव्हीशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सतत तासंतास कॉंप्युटरवर काम करण्याने, टी.व्ही. पाहिलेल्याने, वाचन आदीमुळे अनेकांना डोळ्यांचे विकार जडतात. योगाचा अवलंब केल्यास या विकारांवर मात करणे सहज शक्य आहे. काही मुद्रा आहेत. या मुद्रांचा नियमित सराव केल्यास मनुष्य अनेक शारीरिक आजारांपासून मुक्ती मिळवू शकतो. डोळ्यांशी निगडित...
  August 22, 03:13 PM
 • भाग्य, नशीब, प्रालब्ध, कर्मफळ, योग हे असे काही शब्द आहेत जे खूप बहुचर्चित आहेत. कोणी कितीही आयुष्यात यशस्वी झाले तरी कधी न कधी मनुष्याला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागते की, मनुष्याला भाग्य, योग-संयोग या गोष्टींवर विचार करावा लागतो. असे मानण्यात येते की, कर्मफळ हे आपण केलेल्या कर्मानुसार मिळते आणि ते ज्या पद्धतीचे असेल तसे भोगावे लागतात. परंतु काही अशा सक्ती आहेत की ज्या अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात. तर जाणून घेऊ की ती कोणतीही शक्ती आहे जी अशक्य काम शक्य करू शकतेब्रम्हमुहूर्त जागरण...
  August 16, 08:10 PM
 • असंतुलित आणि अनियमित जेवण-खाण्यामुळे तोंडाला येणे किंवा तोंडात व्रण आणि दुर्गंधीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. अनेक प्रकारची औषधे घेऊनही काहीच उपयोग होत नाही. तोंडातील व्रण काही कमी होताना दिसत नाहीत. अशा वेळी गडबडून जाऊ नका. खाली दिलेले प्रयोग करून पाहा. तुम्हाला निश्चित फायदा होईल.1. दिवसातून तीन चार वेळा तोंडातील व्रणांच्या ठिकाणी हळद लावा.2. तुळसीची चार-पाच पाने सकाळ संध्याकाळी चावून खा. नंतर थोडे पाणी प्या. चार पाच दिवसात फरक जाणवेल.3. ज्यांना वारंवार तोडाला येते त्यांनी टोमॅटो...
  August 13, 04:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED