Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • ऑनलाइन सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सुरू असलेल्या स्पर्धेच्या मध्येच आता वैद्यकीय मदतही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जात आहे. नुकताच दम्याचा झटका आल्याची शक्यता असल्याबाबत तपास करण्यासाठी इंग्लंडमध्ये एक ऑनलाइन टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. याच्या मदतीने दम्याचे रुग्ण झटका येण्याची शक्यता असल्याचा शोध घेऊ शकतील. एवढेच नाही तर संकेतस्थळावर दम्याच्या झटक्याची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक असलेली इतर माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.काय आहे टेस्ट?या टेस्टला ट्रिपल ए : एवायड असे...
  February 9, 04:26 PM
 • दिवसातून दोनवेळा ब्रश करणे आणि नियमितपणे जीभ स्वच्छ करणे पुरेसे नाही. तज्ज्ञांच्या मते वर्षातून एक-दोन वेळा डॉक्टरांकडून दात तपासून घेणे खूप आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची कोरल समस्या उद्भवल्यास माहीत पडेल.तज्ज्ञांच्या मते दातांचा पांढरा किंवा जिभेचा गुलाबी रंग आरोग्याचा परिचय करून देतात. याउलट यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल शरीराची कमतरता दर्शवतो. तसेच दात आणि जिभेचा टेक्शचर आरोग्याशी संबंधित समस्यांचा संकेतही असतो. जाणून घेऊया कोणते लक्षण कोणत्या आरोग्य समस्येशी...
  February 9, 02:58 PM
 • थोडेसे कष्टाचे काम करताच दम लागतो? पायर्या चढताना-उतरताना त्रास होतो? वजनदार सामान उचलण्यास घाबरता? याचा अर्थ तुम्ही लवकर थकता. तज्ज्ञांच्या मते नेहमी थकवा येणे हे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. कसे ते जाणून घेऊया..हृदयाशी संबंधित समस्याशारीरिक थकवा आणि हृदयाशी संबंधित समस्या यांचा एकमेकांशी संबंध आहे. हृदयरोगाने पीडित असलेल्या लोकांवर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, त्यांच्यापैकी 70 टक्के लोकांनी नेहमी थकवा जाणवत असल्याबाबत दुजोरा दिला आहे. आर्टरिजमध्ये होणारा...
  February 7, 12:37 PM
 • तणावादरम्यान सक्रिय होणारा कार्टिसोल हार्मोन चेहर्याची नैसर्गिक चमक नष्ट करतो. परिणामी चेहरा रूक्ष होणे, निर्जीव तारुण्यपीटिका, डोळ्यांखाली काळे चट्टे येणे, त्यात सूज येणे आणि वेळेपूर्वीच सुरकुत्या यायला लागतात. जाणून घेऊया तणावामुळे शास्त्रीयदृष्ट्या त्वचेला कशाप्रकारे नुकसान पोहोचते आणि अशा वाईट परिणामांपासून कसा बचाव करता येईल.त्वचेचा रूक्षपणाक्रॉनिक स्ट्रेटने पीडित असल्यास सक्रिय होणार्या कार्टिसोल हार्मोनमुळे त्वचेची पाणी किंवा ओलावा रोखण्याची क्षमता कमकुवत व्हायला...
  February 7, 12:29 PM
 • अनहेल्दी फूड, मलावरोध, तणाव, दूषित पाणी पिणे, चहा किंवा कॉफीचे अधिक सेवन करणे किंवा प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने शरीरात विषारी घटकांची पातळी वाढायला लागते. यामुळे शरीराच्या अवयवांची कार्यप्रणाली बाधित होते. अशा वेळी विविध प्रकारची अँलर्जी, कमकुवत प्रतिकारशक्ती, डोकेदुखी किंवा थकवा येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण आणि अवयवांची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन आवश्यक आहे. अशा वेळी कोणते खाद्यपदार्थ फायदेशीर ठरू शकतात, याबाबत जाणून घेऊया.....
  February 7, 12:24 PM
 • तुम्ही बेली फॅटमुळे त्रस्त असाल तर सजग व्हा. कारण त्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. याशिवाय सोडा ड्रिंक्स, अल्कोहोल, धूम्रपानामुळेही असे होते. तसेच नियमित वर्कआऊट न केल्यासही हाडांचे नुकसान होऊ शकते.शरीराची कार्यप्रणाली आयुष्यभर सुरळीत व व्यवस्थित ठेवण्यात हाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य भोजनप्रणालीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.नॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशनच्या क्लीनिकल डायरेक्टर...
  February 3, 01:48 PM
 • शरीराच्या सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना झाल्यानंतर पीडितास दिवसभर अस्वस्थ वाटते. अशावेळी त्याच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. जाणून घेऊया स्नायूंमध्ये निर्माण होणारा आकस व ताणापासून कसा बचाव करावा आणि वेदनेपासून कशी सुटका करावी.संगीतसंगीत ऐकल्याने वेदनेपासून सुटका होते, असे एका फ्रेंच संशोधनात आढळले आहे. द इंटरनॅशनल र्जनल ऑफ नर्सिंगने कर्करोगपीडितांवर केलेल्या प्रयोगात आढळले की, जे पीडित 30 मिनिट संगीत ऐकत होते, त्यांच्या वेदना 50 टक्क्यांनी कमी झाल्या. तज्ज्ञांच्या मते,...
  February 3, 01:35 PM
 • तुम्हीसुद्धा फिट राहण्यासाठी सकाळी नियमितपणे व्यायाम करता का? पण संपूर्ण दिवस कार्यालयात बसून राहता का? पोषक द्रव्यांची पूर्तता करण्यासाठी मल्टिव्हिटॅमिन्स घेता का? असे असेल तर सावध व्हा, कारण तज्ज्ञांच्या मते आरोग्यासाठी हे पुरेसे नाही.अमेरिकेच्या ऑनरोलॉजिस्ट आणि द एंड ऑफ इलनेस या पुस्तकाचे लेखक डॉ. डेव्हिड एगस यांच्या मते, साधारणत: व्यक्ती व्यग्र जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी खूप काही करते; परंतु त्याच्याकडून होणारा निष्काळजीपणा आणि इतर अनियमिततेमुळे सर्वकाही वायफळ ठरते....
  February 2, 11:22 AM
 • हिवाळ्यात व्हायरल इंफेक्शनची शक्यता अधिक असते, त्यामुळे खान-पानात योग्य बदल करून शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यास साहाय्यक असलेल्या पांढर्या रक्त पेशींची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, त्याबाबत जाणून घेऊया..पालक :जेवणात पालक व इतर पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पालकात भरपूर फोलेट असते. तसेच यामुळे डीएनए आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होत नाही.लसूण :बाह्यसंसर्ग आणि साथरोगांपासून दूर ठेवण्यात...
  February 2, 11:07 AM
 • नियमित मालिश केल्याने आपले शरीर तंदरुस्त राहते. मेंदूही व्यवस्थित कार्य करतो. आपली स्मरणशक्ती वाढते. रक्ताभिसरण देखील चांगल्याप्रकारे होते. थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व त्वचा ताजीतवानी दिसते.लहान-सहान आजारांवर मालिश उपयुक्त आहे. त्यामुळे लहान मुलांची मालिश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मालिशचे विविध प्रकार आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी एक विशिष्टप प्रकारची मालिश सांगितली जाते. मालिश करण्याचे देखील एक तंत्र आहे. पोटाच्या मालिशमुळे पचनक्रिया व्यवस्थित होते....
  February 1, 03:18 PM
 • नवी दिल्ली: नेहमी साडी परिधान करण्यार्या महिला सावधान! धोक्याची घंटा आहे. बॉम्बे हॉस्पिटल जरनलनुसार नेहमी साडी परिधान करणार्या महिलांना कर्करोग होऊ शकतो. साडीसोबत वापरल्या जाणार्या पेटीकोटच्या नाडीने कमरेवर गाठ तयार होते आणि ही गाठ कर्करोगाची असू शकते. बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ.अरुण पाटील, डॉ.गिरीश बक्षी, डॉ.योगेश पुरी, डॉ.माणिक, डॉ.अभिजीत आणि डॉ.रिती यांनी केलेल्या अभ्यासात 'साडी परिधान करणार्या महिलांना कर्करोगाचा धोका' असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या चमूने या...
  January 31, 03:51 PM
 • पिलाटेस हा व्यायामाचा अत्यंत जुना प्रकार आहे, परंतु सध्या तो लोकप्रिय होत आहे. फिटनेससाठी सजग असणा-यांचा कल याकडे वाढत आहे. परदेशात आणि मेट्रो शहरातच नाही, तर आता छोट्या शहरातही याचे प्रमाण वाढत आहे. एकाग्रता : यामध्ये खूप जास्त फोकस होण्याची गरज असते. कारण संपूर्ण व्यायामादरम्यान व्यक्तीला मानसिकरीत्या एकाग्रचित्त होऊन परफॉर्म करावे लागते. रिलॅक्सेशन : यामध्ये इतर व्यायामाप्रमाणे जास्त शारीरिक मेहनत करावी लागत नाही, अशी ही व्यायामाची पद्धत आहे. संपूर्ण सेशनदरम्यान तणावमुक्त होऊन...
  January 31, 07:38 AM
 • खासगी आयुष्यात चढउतार, एखाद्या प्रिय व्यक्तीचा विरह किंवा काही कारणांमुळे आयुष्यच प्रभावीत होणे ही तणावग्रस्त होण्याची प्रमुख कारणे आहेत. तज्ज्ञांच्या मते अशा वेळी पीडिताचे कशातच मन लागत नाही आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत तो निष्काळजीपणा करतो. मात्र, भोजन पद्धतीत बदल केल्याने पीडितास फायदा होऊ शकतो. कसा तो जाणून घेऊया... ज्यांच्या शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता असते ते लोक अधिक तणावग्रस्त असतात, असे 2010 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आले. टोरँटो विद्यापीठातील...
  January 30, 07:29 AM
 • साधारण दिसणारी आरोग्याशी संबंधित छोटी-छोटी लक्षणे अनेकदा आरोग्य समस्यांची सुरुवातीची अवस्था असू शकतात. बहुतांश लोक याबाबत गंभीर राहत नाहीत त्यामुळे अनेक वेळा उपचार करण्यात उशीर झालेला असतो. जाणून घेऊया तुम्हाला मदत करू शकणा-या आणि वेळेत तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकाल अशा लक्षणांच्या बाबतीत... पायातील फोड जर पायाच्या अंगठ्यात किंवा बोटांच्या मध्ये फोड दिसून आला तर ती गंभीर बाब आहे. कारण बॅक्टेरिया फोडास नुकसान पोहोचवू शकतात. अशा वेळी पीडिताचा त्रास आणखी वाढेल. खेळाडूला ही समस्या...
  January 29, 07:17 AM
 • सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर आरोग्याशी निगडीत काही गोष्टींकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागते. त्यासाठी स्वत:ला तंदुरूस्त ठेवणे आवश्यक असते. मन आणि शरीरासाठी प्रत्येकाने काही वेळ काढला पाहिजे. तरूणपणी योग्य काळजी घेतली नाही तर संपूर्ण आयुष्य डॉक्टर आणि औषधांच्या आधारेच जगावे लागते. इथे आम्ही तुम्हाला अशी एक माहिती देणार आहोत जी तुमच्याजवळ असूनही त्याचा तुम्हाला संपूर्ण लाभ घेता आलेला नाही. सर्व रोगांवर एकच औषध आहे ते म्हणजे 'हसणे'. सकाळच्या प्रहरी फक्त 20 मिनिटापर्यंत हसून...
  January 28, 03:46 PM
 • बहुतेक आजारांवर लोक नियमित औषधी सेवन करीत असतात. त्यातील मुख्य आजार म्हणजे उच्च रक्तदाब होय. उच्च रक्तदाब आणि तणाव हे असे आजार आहे की, त्यावर नियमित औषधी घेतली तरी काहीच फरक पडत नाही. उलट आपल्याला औषधी घेण्याची सवय लागते. तसेच औषधींचा विपरीत परिणाम देखील आपल्या शरीरावर दिसून येतो. योगासने आणि ध्यानसाधना करुन उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. दररोज दहा मिनिटे योगासने आणि ध्यान केल्यानंतर तुम्ही या आजारापासून कायमची मुक्ती मिळवू शकतात. ध्यानसाधना- - दिवसभरातून कोणत्याही वेळी...
  January 27, 01:09 PM
 • मोबाईलच्या अति वापरामुळे ब्रेन कँन्सरचा धोका होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मोबाईलवर संभाषण करताना कानाला लावला जातो. त्यामुळे मोबाईलमधून बाहेर पडणार्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आपल्या मेंदूत शिरतात आणि आपल्याला मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी टेक्सट मेसेज, ईअरफोन असलेल्या हँड्स फ्री उपकरणांचा वापर करणे चांगले असल्याचा सल्लाही आरोग्य संघटनेच्या अभ्यासकांनी दिला आहे. फ्रान्समधील लियोन येथील परिषदेत याबाबात...
  January 26, 03:38 PM
 • हृदयविकार असलेल्या नागरिकांना संभोगापासून दूर राहण्याचा सल्ला विशेषतज्ज्ञ देत असतात. परंतु आता हृदय रुग्ण देखील संभोगाचा परिपूर्ण आनंद घेऊ शकतात, असे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे. मात्र, सेक्स संबंध प्रस्तापित करण्यापूर्वी रुग्णांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, असाही सल्ला अमेरिकन हार्ट संघटनेने दिला आहे. हृदय रुग्णांना लवकर थकावा येत असतो. चालताना धाप लागणे, जीव घाबरणे अशा तक्रारी हृदय रुग्णांकडून येत असतात. परंतु ज्या रुग्णांना चालताना धाप लागत नाही अथवा जिना चढतांना जीव...
  January 25, 04:39 PM
 • आरोग्याच्या दृष्टीने कॅफीन निश्चित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे ठरते, परंतु गरजेपेक्षा जास्त कॅफीनचे सेवन करणे आरोग्यासाठी घातकही ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते 200 ते 300 मिलीग्रॅम कॅफीन म्हणजेच दोन ते चार कप कॉफीचे सेवन केल्याने शारीरिक कार्यप्रणाली चांगली राहते, तसेच अनेक आजार होण्याची शक्यता कमी करण्यातही कॉफी फायदेशीर आहे. तसेच कॉफीमुळे आळसही निघून जातो. कॉफी कशी आणि कोणकोणत्या आजारांसाठी उपयुक्त आहे ते जाणून घेऊया..अल्झायमरएका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे तीन कप कॉफीचे सेवन करतात,...
  January 21, 07:29 AM
 • लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज सोपे असतात. त्याबरोबरच ते कॅलरी बर्न करण्याचा आणि फिटनेस कायम ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. त्याउलट हाय-इम्पॅक्ट एक्झरसाइज ऑर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस, लठ्ठपणा, सांधेदुखीस कारणीभूत व गर्भवतींसाठी हानिकारक असतात. त्यामुळे लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करणेच फायद्याचे ठरते. जाणून घेऊया यात कोणत्या व्यायाय प्रकारांचा समावेश होतो आणि त्यातून किती कॅलरी बर्न होतात. स्केटिंग - सेलिब्रिटी ट्रेनर हॉली पर्किन्स यांच्या मते, नवशिक्यांनी स्केटिंग करताना सावधगिरी बाळगायला हवी,...
  January 20, 10:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED