Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • सायनसची (अस्थिविवर) समस्या हिवाळ्यात अधिक निर्माण होते. अशावेळी पीडितास शिंक येणे, नाक वाहणे, डोकेदुखी, डोके किंवा डोळ्यांवर दबाव जाणवणे, हलका ताप येणे आणि भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे पीडिताने खाणेपिणे आणि जीवनशैलीबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत जाणून घेऊया. फ्रिजमध्ये ठेवलेले कोणतेही खाद्यपदार्थ काढून लगेचच खाऊ नये. कारण सायनस असलेल्या लोकांसाठी असे करणे घातक ठरू शकते. आहारात मिठाचा वापर जास्त प्रमाणात करू नये. कारण मिठामुळे उतींमध्ये द्रव एकत्र होऊ...
  January 15, 09:05 AM
 • आहारतज्ज्ञांच्या मते, पोट हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. जेवणातील चांगल्या-वाईट बदलांनुसार पोट लवकर प्रतिक्रिया देते. अशा वेळी पोट कमी करण्यासाठी खाण्या-पिण्यात योग्य बदल करणे फायदेशीर ठरू शकते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकणा-या अशाच काही सोप्या पद्धती जाणून घेऊया. सरळ उभे राहासरळ चालणे-फिरणे आणि बसण्याची सवय तुमचे शरीर सडसडीत करू शकते. सॅन लुईस आॅबिस्पो येथील स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग स्पेशालिस्ट डेबोराह एल. मुलेन यांच्या मते, पोटाची चरबी कमी करण्यासाठी पायलेट्स (एक...
  January 15, 08:58 AM
 • रात्री उशिरा झोपणे, मेकअप तसाच ठेवणे आणि कोणतीही सावधगिरी न बाळगता थंड हवेत जाणे यासारख्या वाईट सवयींचे दुष्परिणाम काही दिवसानंतर पाहायला मिळतात. साधारणत: या समस्या सौंदर्याशी निगडित असल्याचे लोक समजतात. तथापि, खरी कारणे वेगळी असतात. डोळे सुजणे : अधिक थकवा आल्याने डोळ्यांखाली सूज येते. लंडन येथील कॅडोजेन क्लिनिकच्या सुझान मॅयू म्हणतात की, अल्कोहोलचे अधिक सेवन, हार्मोनल समस्या आणि पुरेशी झोप होत नसल्याने डोळ्यांखालील त्वचेत फ्लूड म्हणजेच द्रव एकत्र होऊ लागते. त्यामुळेच डोळे...
  January 14, 02:16 PM
 • वजन कमी करण्यासाठी नेहमी एका निरोगी प्रक्रियेचा अवलंब केला पाहिजे. या फे-यात अडकून आजारी पडाल किंवा कमी पोषण मिळाल्याने शरीराला नियमित कामे तडीस नेण्यास अडथळेही येऊ शकतील. वजन कमी करणा-या प्रक्रियेचा अंगीकार करणा-यांनी डाएट आणि व्यायाम यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. जाणून घेऊया कसा असावा डाएट प्लॅन आणि व्यायामाचे वेळापत्रक.हे करावे दिवसभरात नियमित अंतराने थोडे-थोडे जेवण करावे. जेवणात उच्च प्रथिने आणि तंतुमय पदार्थ हवेत. उदाहरणार्थ अंड्यातील पांढरा भाग, डाळ, शेंगा, कमी मेद असलेले...
  January 14, 02:10 PM
 • खाण्यापिण्यात निष्काळजीपणा वा रसायनयुक्त शाम्पूचा वापर हीच केसगळतीची मुख्य कारणे नाहीत. दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक सवयीही केसांवर नकारात्मक परिणाम घडवतात. तज्ज्ञांच्या मते, केसगळतीची आनुवंशिक समस्या वैद्यकीय उपचार केल्याशिवाय सोडवता येत नाही. मात्र, तुम्ही वैयक्तिक पातळीवर विविध उपाय करू शकता. जाणून घेऊया याबाबत.* हिवाळ्यात उन्हात जाणे चांगले आहे. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही तासन्तास उन्हात बसून राहावे. केशतज्ज्ञांच्या मते, ज्या प्रकारे उन्हात जास्त वेळ बसल्यावर त्वचेवर...
  January 13, 01:29 PM
 • लठ्ठपणाबरोबर दुबळेपणानेही अनेक आजारांना निमंत्रण मिळते. दुबळेपणामुळे पचनशक्ती मंदावते आणि पाचकद्रव्याची निर्मितीही कमी प्रमाणात होते. त्यामुळे अशक्तपणा येतो. अशक्तपणा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. - अशक्तपणा असलेल्या रूग्णाने जेवणात दूध, तूपाचा वापर करावा.- भरपूर झोप घ्यावी.- गव्हाची चपाती, मूगाची दाळ, पालक, पपई, भोपळा, मेथी, पडवळ, पान कोबी, फूल कोबी इत्यादीचे मोठया प्रमाणात सेवन करावे.- रोज डाळिंब, सफरचंद, मोसंबी खावे किंवा त्यांचा रस घ्यावा. सुका मेव्यामध्ये अंजिर,...
  January 12, 12:35 PM
 • फायदेशीर खाद्यपदार्थ हानिकारक आणि हानिकारक खाद्यपदार्थ फायदेशीर ठरू शकतात, हे थोडे आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र, तज्ज्ञांच्या मते शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. जाणून घेऊया अखेर हे कसे शक्य आहे याबाबत. भरपूर नाश्त्यामुळे शरीर सडपातळ राहते, हे खरे की खोटे? खोटे : तज्ज्ञांच्या मते, भरपूर नाश्ता केल्यास ओव्हरइटिंग म्हणजेच भुकेपेक्षा जास्त खाण्याची समस्या नियंत्रित होते, मात्र शरीर सडपातळ राहत नाही. जवळपास 400 लोकांवर झालेल्या एका जर्मन संशोधनात आढळले की, भरपूर नाश्ता केल्यावरही...
  January 12, 07:26 AM
 • काही लोकांच्या शरीरामध्ये कमरेच्या वरच्या भागात तर काही लोकांच्या कमरेच्या खालच्या भागात अधिक चरबी असते. तसेच काही लोकांमध्ये लवकर चरबी वाढत नाही. तज्ज्ञांच्या मते, माणसाचे शरीर एकसारखे नसते, त्यामुळे असे होते. प्रत्येकाच्या शरीराचा आकार वेगळा असतो. त्यामुळे भोजन पद्धतीही त्यानुसारच असायला पाहिजे. सर्वांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांत चरबी वाढत असते. त्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी शरीराच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. जाणून घेऊया आपल्या शरीराच्या कोणत्या गरजा आहेत.अँपल शेप...
  January 6, 09:12 AM
 • रिकामे डोके हे सैतानाचे घर असते, असे म्हटले जाते. रिकाम्या डोक्याने फक्त आपला तणावच वाढत नाही तर त्याचा आपल्या शरीरावरदेखील वाईट परिणाम होतो. अनियमित जेवणामुळेदेखील शरीर अशक्त होते. तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल आणि अनियमित दिनचर्या, तणाव व अनियमित जेवणाच्या वेळा यामुळे अशक्तपणा वाटत असेल तर खाली दिलेला उपाय आजमावून पाहा. धुतलेली उडीद डाळ आणि शिंगाडयाच्या पीठाचे चूर्ण 100-100 ग्रॅम. उडीद डाळ शुद्ध तुपात भाजून त्याचे पीठ करावे. दोन्ही चूर्ण एकत्र करावे. एक चमचा (चहाचा) मात्रा घेऊन...
  January 5, 03:50 PM
 • रोजच्या धावपळीत आणि कामाच्या ताणामुळे आपले खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर तसेच मानसिकतेवरही होत असतो. आपली रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते आणि तीच आपल्या वैवाहिक जीवनाला मारक ठरते. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले नाही किंवा वेळेवर जेवण न घेतल्यास आपल्या 'सेक्स लाईफ'वर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. जर आपल्याला ही समस्या भेडसावत असेल तर खालील गोष्टींचा आपल्या जेवणात समावेश करा आणि चमत्कार पाहा. - खाण्यात सॅलड आणि कांदा, लसूण, अद्रकाचे संतुलित सेवन करावे.-...
  January 4, 11:15 AM
 • हिवाळ्यात विविध अँलर्जी किंवा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. तज्ज्ञांच्या मते अनेकजण हिवाळ्यामध्ये अधिक संवेदनशील होतात, त्यामुळे त्यांना लवकर सर्दी-खोकला किंवा स्कीन अँलर्जी होते. अशाच काही संसर्गांच्या बाबतीत जाणून घेऊया.. एअरबोर्ड बोर्न म्हणजेच बुरशीमुळे दूषित हवेच्या संपर्कात येताच अँलर्जी होण्याची शक्यता अधिक असते. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची बुरशी घरात किंवा घराबाहेर कुठेही परिणाम करू शकते. तसेच हा धोका पावसाळ्यामध्येही असतो. तथापि, घरात असलेला ओलावा...
  January 2, 11:06 AM
 • कामाच्या अधिक ताणामुळे जीवनशैली बिघडते; मात्र वेळ कमी असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करणे अत्यंत चुकीचे आहे. जीवनशैलीत काही बदल केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता.फिटनेससाठी स्वतंत्र वेळ देण्याची गरज नाही. तज्ज्ञांच्या मते जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करूनही फिट राहता येऊ शकते. हे कसे शक्य आहे ते जाणून घेऊया..ताठपणे चालावे- लंडन येथील फिजियोथेरपिस्ट सॅमी मार्गो यांच्या मते, जणू एखादा राजकुमार चालत आहे, याप्रमाणे दोन्ही हात मागच्या बाजूने बांधून चालावे. अशा पद्धतीने तुमची छाती...
  January 2, 08:35 AM
 • जर्मनीच्या वोल्फगँग लिंके आणि त्यांच्या टीमने हृदयाचा इलाज करण्यासाठी व्हायग्राचा यशस्वी प्रयोग केला आहे. लिंके यांचे म्हणणे आहे की, हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या समस्यांनी ग्रस्त असणा-यांसाठी व्हायग्रा अत्यंत फायदेशीर ठरले आहे, कारण व्हायग्रा ऊन धमण्यांना नरम ठेवत रक्तप्रवाह कायम राखतो. हार्टफेलच्या अनेक प्रकरणांमध्ये डायस्टोलिक फेल होते. यामध्ये हृदयाला पंप करणा-या चेंबर्सपर्यंत रक्त पोहोचू शकत नाही. या प्रकरणांमध्ये व्हायग्रा अत्यंत फायदेशीर ठरले आहे. यामुळे हृदयाच्या...
  January 1, 08:00 AM
 • साधारणपणे निरोगी राहायचे असेल तर वाईट सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. याउलट अशा अनेक सवयी असतात ज्यामुळे आरोग्य सुधारू शकते, फक्त त्याचे प्रमाण जास्त असू नये. तज्ज्ञांच्या मते कॉफीचे सेवन करणे, झोपेतून उशिरा उठणे किंवा रागावणे यासारख्या अनेक सवयी आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत; परंतु कधी-कधी असे करणेही वाईट नाही. कोणती वाईट सवय आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे, ते जाणून घेऊया... काम करताना चालणे विद्यार्थीवर्ग सुरू असताना कॉरिडॉर किंवा मैदानात दिसता कामा नये, आदींबाबत शाळांमध्ये...
  January 1, 07:56 AM
 • जेव्हा शरीराचे वजन वाढते तेव्हा अनेक व्याधींची लागण होते. हळूहळू शरीर अनेक आजारांचे घर बनते. जर आपलेही वजन वाढत असेल तर वाढणा-या कॅलरीजवर लक्ष ठेवावे लागेल. पुरूष आणि काम करणा-या महिलांना दररोज 2500 कॅलरीची आवश्यकता असते आणि गृहिणींना 2000 कॅलरीची आवश्यकता असते. आपल्याला जर दोन आठवडयात वजन कमी करायचे असेल तर दररोज 300 ते 500 कॅलरी कमी करावी लागतात. दररोज अर्धा तास व्यायाम करावा. यामुळे अनावश्यक जमा झालेली कॅलरी घटवता येते. जेवण कमी पण वांरवांर केले पाहिजे. त्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थीत चालते...
  December 30, 08:28 PM
 • केवळ 15 मिनिटांत डोळ्यांच्या आसपास असणा-या सुरकुत्या गायब करणारे अँटी-रिंकल पॅच इंग्लंडमध्ये लवकरच सादर केले जाणार आहे. याच्या वापराने वाढते वयही लपवता येऊ शकणार आहे. कसे करणार काम : हा पॅच कोलेजन आणि क्यु 10 तंत्रज्ञानावर काम करतो. या तंत्रामध्ये त्वचेच्या संपर्कात आल्यावर झालेल्या नुकसानीची भरपाई करणारे प्रोटिन आणि आवश्यक पोषक द्रव्ये प्रभावीत जागेवर लावले जातात. सुरकुत्या किंवा वयाशी निगडित इतर लक्षणे अनियमित खान-पान आणि जीवनशैली यासह झोप न येणे आणि पोषण न मिळाल्याने दिसून येतात....
  December 29, 07:06 AM
 • किडनी स्टोनने पीडित असल्यावर जर भोजन पद्धतीत योग्य बदल केला तर या समस्येवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण मिळवता येऊ शकते. पीडिताच्या वेदना कमी केल्या जाऊ शकतील अशा काही उपायांच्या बाबतीत जाणून घेऊया... भरपूर प्रणामात ऑक्सेलेट्स असलेले खाद्य पदार्थ जसे चॉकलेट, पालक, स्ट्रॉबेरी आणि कॉफी यांचे सेवन केल्यानेसुद्धा हा धोका वाढू शकतो. भरपूर पेय पदार्थांचे सेवन केल्याने किडनी अनावश्यक खनिज बाहेर फेकते. यामुळे स्टोनचा आकार वाढू शकणार नाही. तसेच सोडा आणि अल्कोहोलयुक्त पेय पदार्थांपासून दूर...
  December 29, 07:00 AM
 • तज्ज्ञांच्या मते अनेक कारणांनी शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करणा-या पांढ-या रक्त पेशींवर नकारात्मक परिणाम जाणवतो. अशावेळी संसर्ग आणि अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो. शरीराच्या प्रतिकारशक्तीला धोका असणा-या अशाच काही कारणांच्या बाबतीत जाणून घेऊया... जास्त गंभीर असणे ज्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो आणि जे लोक निखळ मनाने हसतात अशा लोकांच्या शरीरात स्ट्रोस हार्मोन नियंत्रित राहतो. याउलट जास्त गंभीर असणा-या लोकांसोबत असे होत नसल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. तसेच लोमा लिंडा...
  December 28, 01:50 PM
 • व्यग्र जीवनशैली आणि अयोग्य खान-पानामुळे हृदयाला नुकसान पोहोचू शकते. तज्ज्ञांच्या मते केवळ व्यायाम केल्यानेच हृदय निरोगी राहते, असे नाही. भोजन प्रणाली आणि इतर उपायांच्या मदतीने हे धोके कसे कमी केले जाऊ शकतात, त्याबाबत जाणून घेऊया... जेवणात मिठाचा अधिक वापर केल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात की, दररोज सहा ग्रॅमपेक्षा जास्त मीठाचा वापर जेवणामध्ये करू नये. वजन नियंत्रित ठेवावे. जेवणात अधिक कॅलरीचा समावेश केल्याने वजन वाढते. यामुळे हृदयाला रक्तपंप करण्यासाठी...
  December 28, 01:40 PM
 • पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणा-या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो. ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते. हिवाळ्यात दमा असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होतो. अशावेळी ओवा गरम करून एका...
  December 26, 04:53 PM
 
जाहिरात

RECOMMENDED