जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणते की, मी नैसर्गिक स्लिम असून दर दोन तासाला काही ना काही खात राहते. यामुळे माझी पचनक्रिया चांगली राहते आणि दिवसभर ऊर्जा मिळते. आपल्या शरीराच्या प्रकारानुसारच आहार घेतला पाहिजे, असा सल्ला तरुणींमध्ये प्रसिद्ध असलेल्या अनुष्का शर्माने दिला आहे. सेलिब्रिटी घेतात म्हणून आपणही डोळे बंद करून तसा आहार घेता कामा नये. त्याऐवजी एखाद्या प्रमाणित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आहार व व्यायामाचे वेळापत्रक बनवावे, असे सल्लाही अनुष्काने दिला आहे. वजन कमी...
  June 17, 08:05 AM
 • कमी वजन, हिमोग्लोबिन कमी असणे, अशक्तपणा जाणवणे, कामात उत्साह कमी होणे अशा अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन आहाराशी निगडित असतात. चारीठाव जेवण ही आपल्या पूर्वजांची पद्धत होती. आता एवढे पदार्थ खाणे आणि बनवणे कमी होत आहे. मोजके पोट भरतील एवढे पदार्थ करणे आणि खाणे यामुळे विविध रोगांना आपण आमंत्रण देत असतो. आरोग्य नीट ठेवण्यासाठी आहार व त्यासंबंधीत सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे.भाज्यांचा रस, सूप यांचा आहारात समावेश करा. कधीतरी गोड खाण्यास हरकत नाही. मात्र त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. अशा...
  June 16, 02:06 PM
 • तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी आपल्या शरीराबाबत माहिती असणे खूप गरजेचे आहे. जाणून घेऊया शरीराचा कोणता भाग कसे काम करतो आणि कशा प्रकारच्या व्यायामाने फिट राहता येईल... फुप्फुसे निरोगी असावीत अशक्त फुप्फुसांमुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि पुढे चालून ही एक मोठी समस्या बनू शकते. नियमितपणे वेगाने चालल्यास फुप्फुसांचा चांगला व्यायाम होतो. कोणत्याही वयात नियमितपणे व्यायाम केल्यास एरोबिक क्षमता वाढवता येते.
  June 15, 01:26 PM
 • त्वचेतील ओलावा आणि रंग सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक उपचार करणे फायद्याचे ठरते. अल्ट्राव्हायलेट (अतिनील)किरणांचे वाईट परिणाम रोखणे, त्वचेवरील सुरकुत्या मिटवणे आणि त्वचेचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. जाणून घेऊया अशाच काही खाद्यपदार्थांविषयी.
  June 14, 04:37 PM
 • आजकाल सडपातळ राहण्यासाठी लोक वजनावर नियंत्रण ठेवतात. काही लोकांना त्यात यश मिळते, तर काहींना अडचणी येतात. अशा वेळी आहारतज्ज्ञांद्वारे चालवण्यात येणारी काही संकेतस्थळे कामी येऊ शकतात. जाणून घेऊया अशा संकेतस्थळांच्या बाबतीत..fitday.comलेखांच्या माध्यमातून आहारनियमनाबाबत माहिती मिळवण्याचे आणि इतर लोकांसोबत सल्ला-मसलत करण्याचे हे चांगले माध्यम आहे. आहाराशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी जमा करायची असेल तर हे संकेतस्थळ अत्यंत फायद्याचे ठरेल. येथे तुम्हाला आहारातील उष्मांक, प्रथिने, मेद आणि...
  June 14, 08:11 AM
 • शरीराचे सर्व अवयव ठणठणीत आणि योग्य आकारात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते.पाय आणि कंबर, हे दोन्हीही शरीराचे महत्त्वाचे अवयव आहेत. हे अवयव ठणठणीत असतील तरच इजा होण्याची शक्यता कमी असते. स्नायूंची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना ऊज्रेची गरज असते. कमरेत चार स्नायू असतात. हे स्नायू कमरेची हालचाल नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.स्क्वॉट्स : हा कंबर आणि मांड्यांसाठी खूप चांगला व्यायाम आहे. हातात वजन...
  June 13, 08:09 AM
 • कमी कालावधीत वजन कमी करण्याचे प्रयत्न केल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात. आहारात कॅलरीचे (उष्मांक) प्रमाण कमी केल्यास शारीरिक कार्यक्षमता मंदावते आणि थोडीशी मेहनत केली तरी शरीर थकून जाते. तसेच पीडिताला खूप अशक्तपणा जाणवतो. जाणून घेऊया कडक आहारनियमन आणि त्यामुळे होणार्या नुकसानीबाबत.स्ट्रिक्ट डाएट म्हणजे काय?मेद आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असणे म्हणजेच स्ट्रिक्ट डाएट प्लॅन (कडक आहारनियमन योजना) होय. साधारणत: असा आहार वजन नियंत्रित किंवा कमी करण्यासाठी घेतला जातो. जाणून घेऊया या...
  June 12, 09:55 AM
 • आजच्या धावपळीच्या युगात निद्रानाश होणार्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे काही लोक झोप येण्यासाठी गोळ्यांचा आधार घेतात. त्याचे नकारात्मक परिणाम शरीरावर होताना दिसतात. त्यासाठी रात्रभर अंथरुणावर कूस बदलूनही झोप न येणार्या लोकांनी नैसर्गिक उपाय करावेत. या उपायांचा कसलाही नकारात्मक परिणाम शरीरावर होत नाही.करा योग्य उशीची निवड - चांगली झोप आणि उशी यांचा घनिष्ठ संबंध आहे. उशी गळा आणि डोक्याला आधार देते तसेच पाठीचा मणकाही ताठ ठेवते. जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर मऊ उशीचा वापर करा. जर...
  June 10, 11:49 AM
 • प्रत्येकाला तंदुरुस्त राहावेसे वाटते. मात्र आहारनियमन किंवा व्यायामाचे नाव काढताच सर्वांचा उत्साह मावळतो. मात्र काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. निरोगी जीवनासाठी खूप कष्ट करण्याची गरज नाही, केवळ काही गोष्टी लक्षात ठेवून निरोगी जीवन जगता येईल. तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार आणि थोडासा व्यायाम केला तरी पुरेसे ठरते. जाणून घेऊया त्याबाबत अधिक.
  June 8, 01:07 PM
 • आगामी काळात केवळ एका रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती किती काळ जगेल हे समजू शकणार आहे. त्याबरोबरच तिला वाढत्या वयात कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागेल हेही कळू शकेल.तुम्ही किती वर्षे जगणार आहात आणि तुम्ही केव्हा वृद्ध होणार हे जाणून घेणे लवकरच शक्य होणार आहे. एक सर्वसाधारण रक्तचाचणी अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.काय आहे तंत्र? - रक्तचाचणीत टेलोमिअर्सच्या तपासणीतून संबंधित व्यक्तीचे जैविक वय काय असेल हे समजू शकेल. ही चाचणी भारतात या वर्षीच्या अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे....
  June 7, 12:37 PM
 • असे म्हणतात की, मनुष्याला जर स्वस्थ आणि निरोगी शरीर हवे असेल तर त्याने पौष्टिक आहार घेतला पाहिजे. संतुलित आहार घेतल्याने आजार जवळ येत नाहीत. परंतु अनेक लोकांना हे माहित नाही की, कोणता आहार जास्त फायदेशीर आहे. तर चला आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टींची माहिती देतो. त्या गोष्टींचा जर तुम्ही तुमच्या जेवणात वापर केला तर तुमचे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहील.पेरू - हृदयाच्या आजाराला दूर ठेवण्यासाठी, तसेच वारंवार कफ होत असेल तर पेरूचा वापर जेवणात करा. ज्यांना मधुमेह आहे त्यांनीही औषधी म्हणून पेरू...
  June 6, 02:00 PM
 • दिवसातून दोनवेळा ब्रश करण्याचे अनेक फायदे आहेत. या सवयीमुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतात. तसेच हृदयविकाराचा झटका, मधुमेह यासह अनेक आजारांपासूनही बचाव होतो.हृदयविकाराचा झटका - दातांना किड लागण्यास सुरुवात होताच शरीरात सी-रिअँक्टिव्ह प्रथिने आणि फायब्रिनोजेनची पातळी वाढू लागते. या घटकांमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच किडलेले दात ताबडतोब काढण्याचा सल्ला न्यूयॉर्क विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देतात. एवढेच नव्हे तर दातांमध्ये असलेले जिवाणू रक्तात मिसळून...
  June 5, 03:08 PM
 • व्यायाम करण्यासाठी जिममध्येच जावे असे काही नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळापत्रकात थोडासा बदल करावा लागेल.जर तुम्हाला नियमित जिममध्ये जाता येणे शक्य नसेल तर काळजी करू नका. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या वेळापत्रकात बदल करावा लागेल. निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही सोप्या पद्धती..भरपूर पाणी प्यावे - उन्हाळ्यात विशेषत: डिहायड्रेशनची (निर्जलीकरण) समस्या उद्भवते. शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी न मिळणे, हे त्याचे प्रमुख कारण आहे....
  June 4, 02:57 PM
 • प्रत्येकाला तंदुरुस्त राहावेसे वाटते. मात्र आहारनियमन किंवा व्यायामाचे नाव काढताच सर्वांचा उत्साह मावळतो. मात्र काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ व्यायाम करणेच आवश्यक नाही, तर योग्य आहार आणि थोडासा व्यायाम केला तरी पुरेसे ठरते. जाणून घेऊया त्याबाबत अधिक.1. लो कॅलरी अर्थात कमी उष्मांकाच्या मसाल्यांचा वापर करा. मेयोनीजऐवजी मोहरीचा वापर केला जाऊ शकतो.2. खाण्याचे वहीखाते मेंटेन करा. दिवसभर जे खाल, त्याची नोंद करा. त्यावरून तुम्ही किती...
  June 3, 07:50 AM
 • तरुणाई चेहर्याला खूप जपते. त्यामुळे अनेकजण प्रखर उन्हात जाणे टाळतात; पण प्रत्येकवेळी बाहेर पडणे टाळणे शक्य नसते. डॉक्टरांच्या, सौंदर्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार काही घरगुती उपचार करून किंवा बाजारातील काही फेशियल्स वापरून आपण या समस्येला बाय-बाय करू शकतो. उन्हातून आल्यानंतर फेसवॉशने चेहरा धुवून डॉक्टरांनी सुचवलेले एखादे क्रीम लावावे. त्याचबरोबर चेहर्यावरील तेज कायम ठेवण्यासाठी फळांचे ज्यूस, ताक पिणे, पालेभाज्यांचे सेवन करणेही तेवढेच आवश्यक आहे.त्वचेचे मुख्य प्रकार - कोरडी...
  June 1, 08:19 AM
 • धावपळीच्या आयुष्यात आपल्याकडून बर्याच गोष्टी विसरला जातात. या समस्येला आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सामोरे जाव लागत आहे. एखादी गोष्ट विसरण्या पाठीमागचे मुख्य कारण म्हणजे एकाग्रता कमी असणे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला सतत सक्रिय ठेवले पाहिजे. तुम्ही देखील सारख-सारख विसरण्याला कंटाळला असाल तर खाली दिलेले घरगुती उपाय करा अवश्य फरक पडेल.उपाय - नऊ बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी त्याचे साल काढून बारीक पाउडर तयार करून गरम दुधात टाकावी. यात तीन चमचे मध टाकावा. अशा...
  May 31, 05:18 PM
 • थंड पाणी - उन्हाळ्यात आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जर हे पाणी बर्फाचे असेल तर दिवसभरात 250 ते 500 कॅलरी (उष्मांक) वापरले जाऊ शकतात. खरे म्हणजे शरीरातील मेद कमी करण्यासाठी उष्णतेची गरज असते आणि बर्फाच्या पाण्यामुळे मेद कमी करण्यास मदत होते. एवढेच नाही तर बर्फाचे पाणी पिल्यास एका आठवड्यात एक पाउंड वजन कमी केले जाऊ शकते. दिवसातून दोन ग्लास जास्त पाणी पिल्यास चयापचय शक्ती 30 टक्के वाढते. हिरवा चहा - दिवसातून तीन ते पाच कप हिरवा चहा पिल्यास 35 ते 43 टक्के मेद वापरणे शक्य होते. नारळाचे पाणी -...
  May 30, 02:40 PM
 • शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोक योगा व निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम करत असतात. मात्र, चेह-याला निरोगी व चांगले ठेवण्याचा फेस योगा हा उत्तम मार्ग आहे. पूर्ण शरीराची काळजी घेताना आपल्याला चेह-याचा देखील विचार करणे जरुरीचे असते. शरीर आतून खराब असेल तर त्याचा प्रथम परिणाम चेह-यावर दिसून येत असतो. आपल्याला तणाव असल्यास तो चेह-यावरून कळून येतो. म्हणूनच शरीराच्या इतर योगाप्रमाणेच फेस योगा हा फायदेकारक ठरतो. फेस योगा ऑफिसमध्ये देखील करता येतो. याकरिता कोणत्याही योगा मॅटची गरज नाही. तज्ज्ञांच्या...
  May 29, 11:55 AM
 • अनेक प्रयत्नांनंतरही तुम्ही निरोगी राहात नसाल तर तुम्हाला जीवनशैली आणि खाण्यापिण्यावर लक्ष देण्याची गरज आहे. निरोगी जीवनासाठी खूप कष्ट करण्याची गरज नाही, केवळ काही गोष्टी लक्षात ठेवून निरोगी जीवन जगता येईल.व्यसनापासून राहा दूर : आजकाल मद्यपान करणे फॅशन बनली आहे. तथापि, त्यामुळे हृदयविकारांसह मधुमेह आणि रक्तदाबाची शक्यता वाढते, हे तथ्य नाकारून चालणार नाही.भेसळीपासून राहा दूर : भेसळयुक्त रंगापासून बनवलेली मिठाई आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कर्करोग व त्वचेचे विकार...
  May 28, 02:09 PM
 • एकट्याने व्यायाम करण्यात ज्यांचे मन लागत नाही, त्यांना कंटाळा यायला लागतो. त्यांना एखादा जोडीदार मिळाला तर व्यायामाचा आनंद काही वेगळाच असतो. एकट्याने व्यायाम करणे कंटाळवाणे वाटू शकते. मात्र एखादा जोडीदार मिळाला तर व्यायाम करणे सोपे होते. तुम्ही एखादा असा व्यायाम निवडा जो जोडीदारासोबत जुगलबंदीने करता येईल. लेग प्रेस जमिनीवर पाठ करून झोपा आणि गुडघे वाकवून पंजे जमिनीवर ठेवा. जोडीदार तुमच्या मागे गुडघ्यावर बसेल. आता तो रेसिस्टन्स ट्यूब किंवा दोरी तुमच्या पायाकडून खांद्याकडे घेऊन...
  May 27, 01:13 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात