जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • अलीकडेच झालेल्या ताज्या संशोधनानुसार दररोज आक्रोड खाल्ल्यास हृदयाशी संबंधित आजार होण्याचे प्रमाण जवळपास 45 टक्क्यांनी कमी होते. आरोग्याच्या दृष्टीने आक्रोड बहुपयोगी मानला जातो. याच्या नियमित सेवनाने व्यक्ती अनेक आजारांपासून लांब राहू शकते.
  August 28, 10:10 AM
 • नाष्ट्यात एक वाटी मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) खाल्ल्यास व्यक्तीला दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आणि पोषण मिळते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये पोषक घटक दुप्पट प्रमाणात असल्याने हे खाल्ल्याने व्यक्तीला जास्त स्फूर्तिदायक वाटते. तसेच यात तेल किंवा मसाल्यांची देखील गरज लागत नाही. म्हणून हे आरोग्यासाठी हितकारक आणि उपयोगी ठरते.
  August 27, 09:23 AM
 • एक्स्प्रेसिव्ह रायटिंग म्हणजे मनातील भाव, भावनांना शब्दबद्ध करण्याची कला. याच्या मदतीने शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी देखील घेता येते. काही लिखाण केल्यास पुढील गोष्टी होत असल्यास घाबरू नका लिहिल्यानंतर मन उदास झाल्यास थकवा जाणवत असल्यास शरीरात उर्जेची कमतरता वाटल्यास या सर्व अल्पकाळासाठी होणार्या समस्या आहेत. काही दिवसांत या समस्या कमी होतात.
  August 22, 01:33 PM
 • आपल्या शरीराच्या रोग प्रतिकारशक्तीच्या क्षमतेवर निरोगी आरोग्य अवलंबून असते. यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन मनमुराद हसतात. रोग प्रतिकारशक्तीकडे बहुतांश वेळा फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, परंतु आपल्याला प्रतिकारशक्ती नष्ट करणारी कारणे (बस्टर) वेळीच ओळखून त्यापासून लांब राहिले पाहिजे. तसेच प्रतिकारशक्ती वाढवणार्या घटकांचा (बुस्टर) स्वीकार केला पाहिजे.
  August 21, 01:59 PM
 • तुम्हाला जर हृदय निरोगी ठेवायचे असेल तर न्याहरी करायला विसरू नका. न्याहरी न करणार्या लोकांच्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. 27 हजार लोकांच्या जीवनशैलीवर संशोधन केल्यानंतर अमेरिकन संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. खरं तर जेवणाची वेळ आरोग्याची किल्ली आहे. न्याहरी न केल्याने शरीर वेळेसोबतच कमकुवत होत जाते. यामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो. याचा परिणाम थेट हृदयावर होतो. पुढील स्लाईड्सवर वाचा, मधुमेहाला पराभूत करणे शक्य
  August 16, 06:44 PM
 • काजू व मनुका शक्तिवर्धक ड्रायफ्रुट्स मानले जातात. तब्बेत कमविण्यासाठी दररोज चार काजू आणि आठ मनुका खाल्याने अनेक आजार झटपट बरे होतात. आयुर्वेदातही काजू आणि मनुकाचे महत्त्व सांगितले गेले आहे. काजू आणि मनुका सेवन केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा काजू आणि मनुकाचे आरोग्यवर्धक फायदे....
  August 16, 10:50 AM
 • गुडवेल एक आयुर्वेदिक औषधी आहे. संस्कृतमध्ये गडूची, अम्रतवल्ली अथवा अमृता तर गुजरातीमध्ये गिलो या नावाने गुडवेल ओळखले जाते. कडूलिंबावर वाढणारा गुडवेल सर्वश्रेष्ठ औषधी मानली जाते. याला निम गडवेल असेही संबोधले जाते. जवळपास डझनभर आजारांवर रामबाण औषध आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा, गुडवेल एक उपाय अनेक
  August 14, 11:53 AM
 • वाढत्या कामाच्या व्यापामुळे शारिरीक आणि मानसिक थकवा येत असतो. त्याचा थेट परिणाम आपल्या स्वभाववरही होतो. वाढत्या तणावामुळे आपले मन कशातच लागत नाही. परंतु आपल्या दररोजच्या डाईड चार्टमधे काही पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही तात्काळ एनर्जी मिळवू शकतात. आश्चर्य वाटले ना, आपल्या दररोजच्या आहारात पेरु, गाजर, पालक, पत्ता गोबी आणि आंबट चुका या पाच पदार्थांचा समावेश केल्याने तुम्ही झटपट ताकदवान बनू शकता. आबंट चुका: आबंट चुका या पालेभाजीत औषधी गुण आहेत. आपल्या दररोजच्या आहारात आंबट चुका याचा...
  August 12, 01:38 PM
 • आरोग्याशी निगडित असलेले हळदीचे सर्वच गुणधर्म तुम्हाला माहीत असतील. मात्र, सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे.
  August 12, 06:32 AM
 • कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरूनही ठरत असते. मुलगा असू द्या की मुलगी, सुंदर ओठांमुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. परंतु काही लोकांचे ओठ हे नैसर्गिकरीत्याच काळे असतात. किंवा काही लोकांचे ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडते. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. येथे काही अतिशय साधे घरगुती उपाय आहेत. या उपायांनी तुमच्या ओठांचे सौंदर्य निश्चितच वाढेल.
  August 9, 11:50 AM
 • फॅशन स्टेटमेंट म्हणून हँडबॅग फार प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी विविध बॅग वापरतात, परंतु या बॅग आरोग्यावर भार ठरत आहेत.
  August 6, 12:45 PM
 • लसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घ्या या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.
  August 6, 10:17 AM
 • घाण पाणी आणि उघड्यावरील अन्नाचे सेवन केल्याने पोटात संसर्ग आणि विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. मात्र, केवळ बाहेरचे जेवण घेतल्यानेच विषबाधा होते, असे नाही.घरीसुद्धा स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर पोटाचे आजार होऊ शकतात.
  August 5, 10:31 AM
 • भेंडी एक फळभाजी असून शेतामध्ये तसेच घराच्या बागेत या भाजीचे उत्पन्न घेतले जाते. सामान्यतः लोक भेंडीकडे फक्त भाजीच्या स्वरुपात बघतात परंतु आदिवासी भागांमध्ये विविध रोगांवर उपचाराच्या हेतूने भेंडी उपयोगात आणली जाते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, भेंडीचे उपयोग...
  August 1, 03:54 PM
 • नकारात्मक भावनेमुळे नकारात्मक विचार वाढतात असे संशोधकांचे मत आहे. नकारात्मक विचार, भावना शारीरिक आणि मानसिक स्वरुपात व्यक्तीच्या आरोग्याचे मोठे नुकसान करतात.
  July 31, 12:04 PM
 • स्वस्थ, निरोगी राहण्यासाठी दररोज फळ खाणे महत्त्वाचे असते. अनेक आजारांचे माहेरघर आपले पोट आहे. पोट चांगले असेल तर शरीर निरोगी राहते. निसर्गाने दिलेल्या विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे भांडारच भरलेले आहे. जर या फळांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केले, तर केवळ आरोग्यच नव्हे, तर सौंदर्य वर्धन होण्यास मदत होते. प्रत्येक फळामध्ये भिन्न पोषक तत्व पोटात जाऊन आरोग्य व सौंदर्य या दोघांचे वर्धन करण्यासाठी फळांचा उपयोग होतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या विविध...
  July 30, 01:00 AM
 • शरीर स्वस्थ ठेवणे आजच्या धकाधकीच्या जीवनात खुप महत्वाचे आहे. कुठलाही आजार हा जर तुमचे पोट (पचनक्रिया) साफ नसेल तर उद्भवू शकतो. आयुर्वेदानुसार पोटासंदर्भातील छोट्या-मोठ्या तक्रारी एखाद्या आजाराचे मुळ असु शकते. पोटाशी निगडित समस्या दुर करण्यासाठी पुढे दिलेल्या आठ गोष्टींपासून नेहमी दुर रहावे.
  July 29, 11:25 AM
 • पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे.ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, ओव्याचे फायदे...
  July 27, 01:00 AM
 • सुखी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, शरीर शक्तिशाली असणे. शरीरात कोणत्याही प्रकारची कमजोरी असले, तर जीवनातील दुःखात आणि अडचणीत वाढ होते. जर पुरुषामध्ये कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहत नाही. पुरुषांची ही कमजोरी दूर करण्यासाठी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत. जाणून घ्या, त्यातीलच सहा खास उपाय ..
  July 26, 11:44 AM
 • पालक एक पालेभाजी असून औषधी गुणांमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. बाराही महिने पालकाचे उत्पन्न संपूर्ण भारतातून घेतले जाते. पालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया असे आहे. पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अॅमिनो अॅसिड असते. जाणून घ्या पालकाशी सबंधित काही उपाय...
  July 25, 02:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात