जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • जे लोक नियमित बैठे काम किंवा संगणकावर काम करतात. त्यांना मान आखडण्याची आणि दुखण्याची समस्या होत असते. मानेला आराम मिळण्यासाठी स्ट्रेचिंग केली पाहिजे. याची सर्वात मोठी बाब म्हणजे हे स्ट्रेचिंग तुम्ही काम करत असतानासुद्धा आरामात करू शकता. फ्रंट टू बॅक डोक्याला पुढून पाठीमागे झुकवा. जेणेकरून वर पाहता येईल. काही सेकंदासाठी याच स्थितीत राहावे. आता परत पहिल्या स्थितीत या. हे स्ट्रेचिंग दिवसातून तीन ते पाच वेळा करावे. साइड टू साइड मान सरळ करून आरामात बसा. आता मान उजवीकडे थोडी झुकवावी. मान...
  February 16, 05:08 PM
 • व्यायाम केल्यानंतर आणि संतुलित आहार घेतल्यानंतरही वजन कमी होत नसल्यास समस्या वेगळी आहे. मूळ समस्येकडे वेळीच लक्ष दिल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येईल. वजन वाढण्याला अनियमित जीवनशैली जबाबदार आहे. म्हणून अनेक आरोग्यतज्ज्ञ आपल्या सवयी सुधारण्याचा सल्ला देतात. असे असले तरी काही आरोग्यविषयक समस्यासुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणकोणत्या कारणांमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतच जातं...
  February 15, 02:01 PM
 • महिलांचे केस गळण्यामागे अनेक कारणे असतात, पण काहीवेळा हा आजारपणाचा इशारासुद्धा असू शकतो. या इशा-याकडे वेळीच लक्ष देत पहिल्यापासून सतर्क राहणे योग्य ठरते. केसाची समस्या दूर करायची असल्यास समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा ही समस्या कधी दूर होणार नाही, असे या विषयातील जाणकारांचे मत आहे.
  February 12, 08:13 AM
 • अशा अनेक क्रिया आहेत, ज्याद्वारे मेंदूची कार्यक्षमता वाढवता येते. तज्ज्ञांच्या मते ज्या कामामध्ये मेंदूचा वापर होतो त्यांचा आपल्या दिनचर्येत अवश्य समावेश केला पाहिजे. अशा पद्धतीने नवीन ब्रेन सेल्स वेगाने विकसित होतात.
  February 11, 12:52 PM
 • एखादा मित्र किंवा पार्टनरसोबत व्यायाम करणे अत्यंत उत्साहवर्धक ठरते. या व्यायामादरम्यान दोघेही परस्परांना सहकार्य करतात. शक्तीचे जास्त प्रदर्शन करतात. दररोज आपल्या एक्झरसाइज प्रोग्राममध्ये पाच मिनिटे वाढवणे फारसे अवघड नसते. दोघांचीही फिटनेस लेव्हल वेगळी असेल तर पार्टनरची बरोबरी करण्यासाठी स्वत:च्या शरीराला फार त्रास देऊ नका. उदाहरणार्थ स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्झरसाइजदरम्यान दोघांची क्षमता व सोयीनुसार वजन उचलावे. आपला पार्टनर पुरुष असेल आणि जास्त वजन उचलण्यात सक्षम असेल तर त्याला...
  February 9, 10:45 PM
 • केस लांब, दाट आणि सुंदर बनवण्यासाठी खोब-याचे तेल जास्त वापरले जाते. मात्र, खोब-याच्या तेलाचे लाभ केसांपुरतेच मर्यादित नाहीत. हे तेल त्वचेला मॉइश्चराइझ करते. त्याचा वापर सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात केला जातो. ते रोज लावल्यास त्वचेवरील डागांचा रंग निवळू लागतो. यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात सुरक्षित राहतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम बनते. कामा आयुर्वेदाचे सल्लागार आयुर्वेदिक डॉक्टर अवलोचनसिंह यांनी खोब-याच्या तेलाचे पुढीलप्रमाणे काही फायदे सांगितले आहेत...
  February 9, 02:00 AM
 • पोट आणि कमरेला आकर्षक बनवण्यासाठी स्ट्रेचिंग केले पाहिजे. काही दिवस नियमित स्ट्रेचिंग केल्यास परिणाम दिसून येतो. पोट आणि कमरेच्या भोवती जमा होणारी चरबी जळण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते. सिंगल लेग स्ट्रेचिंग जमिनीवर आरामात झोपा. आता डावा गुडघा वाकवून डोके आणि खांदा त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. या वेळी हनुवटीने छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही गुडघे छातीजवळ आणता, त्या वेळी श्वास आत घ्या. आता आपला डावा हात पोटरीवर आणि उजवा हात...
  February 8, 02:20 PM
 • शारीरिक तंत्राची कार्यक्षमता कायम राखण्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. पाण्याअभावी शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यप्रणाली बाधित व्हायला लागते. त्यामुळे अधिकाधिक पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.दिवसभर भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी अनेक अर्थांनी गरजेचे आहे. कारण यावरच तुमची कार्यप्रणाली अवलंबून असते.
  February 7, 11:14 AM
 • बाळंतपणानंतर कमीत कमी वेळात झटपट वजन कमी करण्यासाठी शॉर्टकटचा वापर कधीच करू नका. कारण हा शॉर्टकट आई आणि बालकासाठी धोकादायक ठरू शकतो. या कालावधीत पोषक आहारासोबत शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणे फार गरजेचे असते. गर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर शरीरातील हार्मोन्स बदल झाल्याने वजन वाढणे स्वाभाविक आहे, परंतु याला आटोक्यात आणता येते.
  February 6, 12:00 PM
 • स्नायूमधील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. मात्र हे स्ट्रेचिंग करून वाढवता येते.स्ट्रेचिंग करताना शरीरातील सर्व अवयवांमध्ये समन्वय वाढवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या व्यायामामुळे गुडघे दुखण्याचा त्रास कमी होतो.
  February 5, 11:12 AM
 • लिंबाचा रस किंवा लिंबूपाण्याचे नियमितपणे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात लिंबूपाणी घेऊन करावी. यामुळे त्वचा खुलून दिसते, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अनेक इतर समस्यांपासून सुटका होते.
  February 4, 01:34 PM
 • संसर्गजन्य ताप किंवा वारंवार सर्दी-पडसे झाल्याने प्रतिकार प्रणाली (इम्युन सिस्टिम) कमी कार्यक्षम आहे असे म्हणता येणार नाही. प्रतिकारशक्ती कमी होण्यास इतरही अनेक कारणे आहेत. ती कमी होऊ नये म्हणून पुढील गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे.
  January 31, 12:12 PM
 • पायात वापरण्यात आणि फॅशन म्हणून फ्लॅट चप्पल भले चांगला पर्याय असेल, पण दररोज अशा स्वरूपाची चप्पल घातल्याने पायांना याचा त्रास जाणवू शकतो. अशा चपलांमुळे पायांचे भाग दुखावू शकतात. म्हणून नियमित आणि सातत्याने फ्लॅट चप्पलचा वापर करू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  January 30, 02:28 PM
 • वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु अनियमित जीवनशैलीमुळे अवेळी प्रौढावस्था येत आहे. मात्र, याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपण लवकर वयस्क होत आहोत याची लक्षणे शरीरातील अवयवांतून वेळोवेळी दिसत असतात. पाहूयात ते कसे संकेत देतात.
  January 29, 11:18 AM
 • बैठे काम करणार्या व्यक्तींनी मध्ये मध्ये हातांना आराम देणारा व्यायाम केला पाहिजे. संगणकावर काम करणार्यांच्या हाताचे कोपरे बर्याच कालावधीसाठी एकाच स्थितीत राहतात. अशाने हाताचे स्नायू आखडून दुखण्याचा त्रास होतो. प्रकार 1 - दोन्ही हात समोर करत आरामात बसावे - दोन्ही हात सावकाशपणे मागे घ्या. हातांवर दाब असल्याप्रमाणे मागे घ्या. या वेळी हाताची बोटे वरच्या दिशेने असावीत. - आता पंजांना खालच्या दिशेने झुकवा. बोटांची दिशा जमिनीच्या बाजूने असावी. - हा प्रकार करताना मनगट एकदम सरळ असावे. प्रकार-...
  January 28, 07:30 PM
 • निरामय जीवनासाठी गैरसमजांपासून दूर राहणे आवश्यक आहे, अन्यथा आरोग्यास अपायकारक असलेल्या अनेक गोष्टी आपण करत राहतो. अशाच काही गैरसमजांबद्दल माहिती घेऊया... *अंडी हृदयासाठी घातक : अंड्यांत 200 मिलिग्रॅम कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता बळावते. हृदयरोगतज्ज्ञांच्या मते दररोज एक अंडे खाल्ल्यास आरोग्यास काहीही अपाय होत नाही. आपल्याला आरोग्याची जास्तच काळजी वाटत असेल तर अंड्याचा पांढरा भागच फक्त खावा. त्यातील प्रोटीन्स आरोग्यास हितकारक ठरतील. * फ्ल्यू व सर्दीत फरक...
  January 26, 07:53 AM
 • तज्ज्ञांच्या मते कोणत्याही आजाराने पीडित होण्यापूर्वी शरीर त्याचे संकेत द्यायला लागते. या संकेतांकडे मात्र गांभीर्याने पाहावे. ही लक्षणे जर वेळीच ओळखली तर समस्येचे निदान केले जाऊ शकते.
  January 25, 11:46 AM
 • मेंदूला स्वत:च्या कार्यासाठी ग्लुकोजची गरज भासत असते. सर्वसामान्यपणे रक्तात ग्लुकोज म्हणजे साखरेचे प्रमाण वाढणे धोकादायक मानले जाते. मधुमेह असणार्यांना शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन घेण्याचा सल्ला दिला जातो, परंतु रक्तातील साखर वाढण्याबरोबर ती कमी होणेसुद्धा धोकादायक असते.
  January 24, 11:38 AM
 • सुखी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, शरीर शक्तिशाली असणे. शरीरात कोणत्याही प्रकारची कमजोरी असले, तर जीवनातील दुःखात आणि अडचणीत वाढ होते. जर पुरुषामध्ये कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहत नाही. पुरुषांची ही कमजोरी दूर करण्यासाठी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत. जाणून घ्या, त्यातीलच सहा खास उपाय ..
  January 23, 12:28 PM
 • अनेक लोक निरोगी आरोग्यासाठी शरीरातील अंतर्गत अवयवासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करतात; परंतु झोपण्याच्या पद्धतीकडे जास्त लक्ष देत नाहीत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या स्थितीमध्ये झोपणे शरीरासाठी आरामदायक ठरते ...
  January 22, 10:31 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात