आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feature Story By Jaypraksha Choukase On Rakesh Roshan

'रोशन' रौप्यमहोत्सव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राकेश रोशन आपल्या कॉलेजच्या दिवसांत मित्रांसोबत मौजमजा करत दिवस घालवत होते. त्यांना अभ्यासाची विशेष आवडत नव्हती. त्यांचे वडील रोशन साहेब मोठे संगीतकार होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले. लता मंगेशकर यांनी आपल्या एका चित्रपटात आपल्या आवडत्या मदनमोहन आणि ज्येष्ठ संगीतकार शंकर जयकिशन यांना न घेता रोशन साहेबांना करारबद्ध केले. मात्र, तो चित्रपट आला नाही. राजेश रोशन यांचा दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरव केला आहे. रोशन साहेब अतिशय गुणी आणि गंभीर व्यक्ती होते. एका रात्री त्यांनी जोक सांगून लोकांना खूप हसवले आणि स्वत:ही हसत हसत खाली पडले. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने त्यांची मुले राजेश आणि राकेशचे जीवन बदलले. रोशन साहेब काही संपत्ती सोडून गेले नव्हते. त्यांच्यासारखा सृजनशील मनुष्य सांस्कृतिक संपत्ती सोडून जात असतो. त्यांच्या घरात काही अपूर्ण गीते, काही पत्रे आणि अपुर्‍या इच्छा असतील.
राजेश यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा सहायक म्हणून काम सुरू केले आणि राकेश मोहनकुमारचे सहायक दिग्दर्शक बनले. यापूर्वी दोघा भावांचे जीवन मौजमस्तीने सुरू होते. मात्र, वडिलांच्या निधनानंतर आयुष्य थांबल्यासारखे झाले. चित्रपटाच्या भाषेत सांगायचे झाले तर 'फ्रिज शॉट' झाला होता. राकेश रोशन यांनी 1970 मध्ये अभिनय सुरू केला. त्याच वर्षी ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट 'मेरा नाम जोकर' प्रदर्शित झाला होता. जितेंद्र यांनीदेखील यशाची चव घेतली होती आणि प्रेम चोप्रा खलनायकाची भूमिका करत होते. अभिनेता सुजीत कुमारचे देखील करिअर सुरू झाले होते. हे सगळे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि आजही त्यांची मैत्री कायम आहे. फक्त यांच्यापैकी सुजीतकुमार आज नाहीत. त्या काळी स्पर्धक मित्रदेखील असायचे. दुसरीकडे राजेश रोशन यांना मेहमूद यांनी आपल्या चित्रपटात संगीत देण्याची संधी दिली. त्यांनी संगीतबद्ध केलेला 'जुली' सुपरहिट ठरला.
राकेश रोशन यांनी 1982 मध्ये निर्माता म्हणून ऋषी कपूर आणि टीना मुनीमसोबत चित्रपट बनवला आणि निर्मिती करत गेले. मात्र, 1987 मध्ये त्यांनी अभिनय सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कधी अभिनयाची इच्छा होऊ नये म्हणून त्यांनी मुंडण करून घेतले आणि 'खुदगर्ज'चे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला भरपूर यश मिळाले. या वर्षी त्यांनी दिग्दर्शनाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. सध्या ते आपला महत्त्वाकांक्षी 'क्रिश 2' चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. त्यांचा स्टार मुलगा वडिलांच्या कारकिर्दीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त एक लघु वृत्तचित्र बनवत आहे आणि त्याचा मित्र शाहरुखदेखल त्याला मदत करत आहे. शाहरुख खानचा पहिला जबरदस्त यशस्वी चित्रपट 'करन अर्जुन' राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. आजच्या बाजार भाषेत या चित्रपटाला पहिला शंभर कोटींचा चित्रपट म्हणू शकतो. राकेश रोशन यांची प्रतिभा आणि प्रयत्नांचे खरे चित्र त्या लघु चित्रपटात यावे म्हणून हृतिक रोशन आपल्या वडिलांसोबत काम करणार्‍या सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञांची भेट घेत आहे.
राकेश रोशन यांनी पंचवीस वर्षांत अनेक सुपरहिट चित्रपट बनवले आणि आपल्या मुलालादेखील सुपरस्टार बनवले. राकेश रोशन यांना मागील दोन दशकांमधील सर्वात यशस्वी चित्रपट निर्माता मानले पाहिजे. त्यांनी कधीच स्वत:च्या कीर्तीसाठी गट तयार केला नाही. अवतीभोवती चमचे जमा होऊ दिले नाहीत. कोणी प्रचारक ठेवला नाही. ते फक्त आपले काम करत गेले. त्यांनी कधीच कोणता दावा केला नाही. चित्रपट निर्मितीच्या बारीकसारीक गोष्टींची त्यांना माहिती असल्यामुळे त्यांना संपूर्ण चित्रपट निर्माता म्हणता येईल. सर्वात मोठी गोष्ट की, ते पडद्यावर भव्यता दाखवतात. मात्र, काटकसर त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. चित्रपटनिर्मिती त्यांच्यासाठी साधना आणि यज्ञाप्रमाणे आहे. 20 वर्षांत मी त्यांना कुणाविषयी वाईट बोलताना पाहिले नाही. चित्रपट उद्योगात ते चिखलात कमळाप्रमाणे आहेत.
ते आपला मित्र जितेंद्रसोबत अनेक वर्षांपासून चित्रपटाच्या पहिल्या दिवशी पहिला शो पाहतात. चित्रपट त्यांच्यासाठी एक व्यापार नसून एक धर्म आहे. त्यांनी दिलीपकुमार अभिनित 'राम और श्याम' अनेकदा पाहिला. रोज सकाळी ते 10 ते 1 वाजेपर्यंत आपल्या लेखकांच्या टीमसोबत काम करतात. शूटिंगच्या दिवशी सकाळी 4 वाजेपासून ते दिवसभराच्या प्रत्येक शॉटवर मेहनत घेतात. वडिलांच्या सृजनपरंपरेला रोशन कुटुंब वैयक्तिक प्रतिभेने बळकट करत आहेत हे पाहून मोठय़ा रोशन साहेबांना त्यांच्या दोन्ही मुलांवर आणि नातवावर अभिमान वाटत असेल. त्यांचे गाणे आठवा - 'ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में..'