आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तहानलेल्या नद्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिमल रॉय यांच्या ‘मधुमती’ साठी शैलेंद्र यांनी कबीरसारखे गाणे लिहिले ‘मैं नदिया फिर भी मैं प्यासी, भेद ये गहरा बात जरासी’. नायिका एका कोरड्या नदीतून जात आहे, असे दाखवण्यात आले. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ च्या या आठवड्यातील भागात अतिशय गंभीर समस्या पाण्यावर प्रकाश टाकण्यात आला. पावसाच्या पाण्याचा साठा करणेच या मोठय़ा समस्येचे समाधान आहे. वॉटर हार्वेस्टिंग लागू करण्यासाठी सरकारला काळबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. घराच्या छतावरील पाणी पाण्याचा संचय केला नाही तर त्यांच्या घराचे सिवेज कापण्यात येईल, असा इशारा तमिलनाडूमध्ये लोकांना देण्यात आला होता. महाराष्ट्रातील गावामध्येही कमी सुविधा असूनही पावसाचे पाणी साठवण्यात आले. पाण्याची साठवण सोपी असल्यामुळे ती अवघड झाली आहे. लोक बेजबाबदार असल्यामुळे एवढे छोटे काम करून पृथ्वीवर दीर्घकाळ जगता येऊ शकते यावर त्यांचा विश्वास बसत नाही. यापेक्षाही सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे पाण्याविषयी आपल्या मनात आदर असला पाहिजे, प्रत्येक थेंबात लपलेल्या आयुष्याला ओळखले पाहिजे, पाण्याच्या रक्षणाची शपथ घेतली पाहिजे.

पृथ्वीवर 75 टक्क्यापेक्षा जास्त पाणी असूनही काही वर्षांत पृथ्वीवरून पाणी नाहिसे होईल, हे सत्य आमिर खानने या कार्यक्रमात उघड केले. या पाण्यापैकी पिण्याचे पाणी फक्त तीन टक्केच आहे. यावरुनच नदीचे दु:ख कळते. नदी आणि स्त्रीविषयी आपल्या निर्दयीपणानेच समाज आणि पृथ्वीपुढे अस्तित्वाचे संकटात उभे ठाकले आहे. नदी आणि स्त्रीच्या सन्मानाची बाब वेदपुराणापासून ते घटनेतदेखील आहे. जगातल्या अनेक देशापेक्षा सर्वाधिक पाणी आपल्या देशात आहे आणि याला ‘मल्हार देश’ म्हटले जाते, पण पाण्याचा सर्वात जास्त अपमानसुद्धा याच देशात होतो.

जल सिंचनाची सुरुवात करणार्‍यांचे म्हणणे आहे की चुकीच्या प्रथांमुळे काम करण्यात अडचण येते. तानसामधील भदरसा धरणातून मुंबईला पाणी पुरवले जाते याला गावामधील वेगवेगळ्या जातीसाठी वेगळ्या विहरीच्या धोकादायक व्यवस्थेचे भव्य स्वरुप म्हटले पाहिजे. मुंबईत पाण्याची कमतरता आहे आणि धरण असणार्‍या भागात लोकांना पाणी मिळत नाही. आपल्या देशात महानगरांना जीवंत ठेवण्यासाठी पाणी असलेल्या गावांच्या हक्कावर गदा येते. मुंबईपासून 100 किलोमीटर दूर शाहपुरमधील लोकांना पाणी मिळत नाही, कारण ते पाणी पाइप द्वारे मुंबईला पुरविले जाते.

ग्रामीण भागात टँकरने पाणी पुरवठा होणे वाईट स्थिती आहे. टँकरद्वारे पाणी मिळत असल्याने लोकांची सामाजिक जबाबदारी आणि नीतिमूल्यांत फरक पडला आहे. टँकर नियमित येत नसल्यामुळे कित्येक लोक टँकर येताच लग्न किंवा अत्यंयात्रा सोडून पाणी भरायला जातात. आजदेखील अनेक गावांत महिलांचे आयुष्य मैलोनमैला पाणी आणण्यात जाते.

एकेकाळी भारतात पाच लाखाहून जास्त तालाव होते, पण आता बहुतांश कोरडे पडले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या नद्या देखील कोरड्या पडल्या आहेत. आपल्या परंपरांमुळे नद्याचे पाणी प्रदूषित झाले आणि उद्योगांनीदेखील आपले रासायनिक द्रव्य नद्यामध्ये सोडले. नद्यांना आपणच कचराकुंडी बनवले आहे. मनोज मिर्शा यांनी सांगितले की 1400 किलोमीटरपर्यंत पसरलेल्या यमुनेचा पानीपत ते इटावापर्यंत 800 किलोमीटर भाग प्रचंड प्रदुषित झाला आहे.

दिल्लीच्या गटरांचे पाणी वंृदावनच्या पाण्यात मिसळले जाते. नदीच्या पाण्यात डिजॉल्व्ड ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे त्यातील माशांमध्ये धोकादायक केमिकल्स मिसळतात. त्यामुळे असे प्रदूषित मासे खाणार्‍यांना अनेक आजार होतात. सुविधासंपन्न इंडियाजवळ पाणी आहे पण सुविधाहीन भारत तहानलेला आहे. जमिनीच्या आत पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे 500 फुटपर्यंत बोरिंग केले जात आहेत आणि जमिनीच्या खोल भागात असलेले विष पाण्यात मिसळत आहे. जमिनीला आपण पोकळ केले आहे. आपण सर्वच आत्महत्या करत आहोत आणि हे काम टप्याटप्याने होत आहे. भूमिपुत्रच आपल्या आईला मारण्याचा पराक्रम करत आहेत.

आज आपण पाण्याची किमत करत नाहीत पण दुसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्याप्रमाणे पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत त्याचप्रमाणे भविष्यात पाणी विकत मिळेल. 15 वर्षांपासून अनेक कालनीत टँकरने पाणी जात आहे. भविष्यात टँकरवर माफियाचा अधिकार होईल आणि पाण्यासाठी लढाई होईल, असा इशारा यातून मिळतो. भारतातल्या सगळ्याच नद्याना जोडून पाण्याची समस्या सोडविली जाऊ शकते पण ज्या देशात पाण्यासाठी राज्य न्यायालयात लढत आहेत. तिथे नद्याना कसे जोडता येईल. शतकापूर्वी रहिमने लिहिले होते,

‘रहिमन पाणी राखिए, बिन पाणी सब सून,

पाणी गए न ऊबरे, मोती, मानस चुन’
एक्स्ट्रा शॉट

1988 मध्ये प्रदर्शित ऋषी कपूर अभिनित ‘जनमजनम’ चित्रपट बिमल रॉय यांच्या ‘मधुमती’चा रिमेक होता.