आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जिस्म २'मध्ये पोर्नस्टारच्या भूमिकेत सनी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म २' हा सिनेमा २००३मध्ये रिलीज झालेल्या बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमच्या 'जिस्म' सिनेमाचा सिक्वेल आहे. 'जिस्म २' ही कहाणी आहे एका पोर्नस्टार इज्नाची. एक डॅशिंग इंटेलिजेंस ऑफीसर (अरुणोदय सिंग) पोर्नस्टार इज्नाला (सनी लियोन) आपल्या एका केससाठी हायर करतो.
इज्नाने एका वाँटेड क्रिमिनलला (रणदीप हुड्डा) आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पोलिसांच्या ताब्यात द्यावे, अशी या इंटेलिजेंस ऑफीसरची इच्छा असते. खरे तर हा क्रिमिनल पोर्नस्टार इज्नाचे पहिले प्रेम आहे. आता प्रेम की कर्तव्य या पेचात इज्ना अडकते. या दोघांपैकी एकाची निवड करण्याची वेळ इज्नावर येते. इज्ना कोणता निर्णय घेते, ती रणदीपला पोलिसांच्या ताब्यात देते का, याची कहाणी आपल्याला 'जिस्म २'मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ३ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होत आहे.
पोर्न स्टार सनी लियोन या चित्रपटाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेत आहे. 'ए' सर्टिफिकेट मिळालेला हा चित्रपट लहान मुलांनी पाहू नये असे या चित्रपटाची निर्मिती पूजा भट्टने आधीच स्पष्ट केले आहे. बोल्ड कंटेंटमुळे हा चित्रपट रिलीजपूर्वीच भरपूर चर्चेत आला आहे. सनी 'बिग बॉस'च्या घरात असतांना महेश भट्ट यांनी बिग बॉसच्या घरात जाऊन ही फिल्म सनीला ऑफर केली होती. इंडो-कॅनडियन वंशाची सनी व्यवसायाने पोर्न स्टार असून चित्रपटातही ती पोर्न स्टारचीच व्यक्तीरेखा साकारत आहे. इरॉटिक थ्रीलर असलेल्या या चित्रपटात सनी लियोनबरोबर अरुणोदय सिंग आणि रणदीप हुड्डा स्क्रिन शेअर करत आहेत.