आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'72 मैल एक प्रवास...\' सिनेमाचा रोमांचित करणारा प्रवास पुस्तक रुपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांच्या 'ग्रेझींग गोट पिक्चर्स' निर्मित, 'व्हायकॉम 18' प्रस्तूत बहुचर्चित '72 मैल एक प्रवास' हा सिनेमा येत्या 9 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखक अशोक व्हटकर यांच्या '72 मैल' या कादंबरीवर आधारित असलेल्या या सिनेमात एका मुलाचा आपलं जीवन समृद्ध करण्यासाठीचा संघर्ष चित्रीत करण्यात आला असून सोबत त्यावेळेच्या ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडले आहे.

राजीव पाटील दिग्दर्शित या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरला आहे.

'72 मैल एक प्रवास' हा सिनेमा साकारत असतानाचा रोमांचित करणारा प्रवास पुस्तक रुपात सादर करण्यात आला आहे. अलीकडेच या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी 'पॉप्युलर प्रकाशन'चे रामदास भटकळ, 'ग्रेझींग गोट पिक्टर्स'च्या अश्विनी यार्दी, 'व्हायकॉम 18' चे जयेश मुजूमदार, सिनेमाचे गीत आणि संवाद लेखक संजय कृष्णाजी पाटील, संगीतकार अमितराज, अभिनेत्री स्मिता तांबे, बालकलाकार चिन्मय संत, चिन्मय कांबळी आणि दिग्दर्शिक राजीव पाटील उपस्थित होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या सिनेमाविषयी नाना पाटेकर काय म्हणाले...