आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Exclusive Interview Of Aamir Khan By Mayank Shekhar Second Part

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सत्यमेव जयते'नंतर आमिरला व्हायचे आहे रिलॅक्स !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आमिर खानचा 'सत्यमेव जयते' हा सामाजिक विषयांशी निगडीत असलेला रिएलिटी शो देशभर गाजतोय. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. आमिरने आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यामातून अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडली. या कार्यक्रमा दरम्यान आमिर कोणकोणत्या अनुभवातून गेला हे जाणून घेतले आहे प्रख्यात चित्रपट समीक्षक मयांक शेखर यांनी. या मुलाखतीच्या पहिल्या भागात आमिरने टीव्ही हे माध्यम इतर माध्यमांपेक्षा कसे प्रभावशाली आहे, शिवाय एका सामान्य व्यक्तीची समस्या सगळ्यांपुढे मांडणे किती कठीण आहे याविषयीचे आपले अनुभव शेअर केले.
आमिरची मुलाखत विविध भागांमध्ये दिव्य मराठीच्या साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आमिरच्या या खास मुलाखतीचा दुसरा भाग...

प्रश्न : तू सामान्यांचे प्रश्न मांडतांना त्यांच्याशी भावनिकरित्या जुळला होतास का ?
आमिर - जेव्हा मी त्या लोकांच्या कथा ऐकल्या, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून, ऐकून कुणीही कोसळून जाईल. त्या सगळ्या कथा या ह्रदय पिळवटून टाकणा-या होत्या. सामान्यांना तर हे माहित देखील नव्हते की, हे आमिर खान पाहणार आहे. आमच्या या कार्यक्रमाची रितसर घोषणाही करण्यात आली नव्हती. तेव्हा आम्ही केवळ रिसर्च करत होतो. आम्ही एखाद्या माहितीपटाच्या टीमप्रमाणे देशभरात फिरलो. आम्ही न्यूज चॅनलच्या पत्रकारांप्रमाणे देशाच्या कानाकोप-यात गेलो. एकदा आमचे समाधान झाले नाही, म्हणून आम्ही पुन्हा संपूर्ण टीमसह तिथे गेलो. त्यांना सांगितले तुम्ही तुमचे अनुभव सांगा. हे आमचे दुस-या
टप्प्यातले काम होते. पहिल्यांदा त्यांना काही माहितच नव्हते. त्यांना त्यांची संपूर्ण कथा आमच्या समोर ठेवली. पीडितांच्या समस्या ऐकून माझे आयुष्यही प्रभावित झाले.तुझी पत्नी किरणच्या मते तुला थेरपीची गरज आहे, हे खरे आहे का ?
आमिर - होय. हे खरे आहे. त्यासाठी मी अपॉईन्टमेंटसुद्धा घेतली आहे.का ?
आमिर - कारण, मी अनेक भावनिक चढउतारातून गेलो आहे. मला असे वाटते की आता हे नाजूक मुद्यावर आले आहे. मी शुटिंगदरम्यान प्रत्येक तिस-या दिवशी पाच-सहा पाहुण्यांसह चर्चा करतो. ते सगळे माझ्या आजूबाजूला बसलेले असतात. त्यांच्या या कथा ऐकण्याचा अनुभव अतिशय वेगळा असतो. जे मनोविकारतज्ज्ञ आणि समुपदेशक असतात ते नेहमी असे करतात. मात्र ते प्रशिक्षित असतात.पत्रकारसुद्धा...
आमिर - पण पत्रकार देखील प्रशिक्षित नसतात. जेव्हा समुपदेशक आणि मनोविकारतज्ज्ञ एखाद्याची कथा एकतात तेव्हा ते त्यापासून अलिप्त राहातात. मात्र आपण जेव्हा ते एकतो तेव्हा त्यात बूडून जातो. त्यात गटांगळ्या खातो. त्यांच्या त्या कथेने प्रभावित होतो. हे आमच्या हातात नसते. एक वेळ अशी येते जेव्हा मी कोसळतो. त्याचे काहीही कारण कळत नाही. चित्रिकरणाच्यावेळी देखील असे होते. तेव्हा मी माझ्या खोलीत जातो. एक चहा घेतो. आणि थोडा निवांत होतो. असे अनेक वेळा होते. प्रेक्षकांच्या समोर देखील माझी अशीच स्थिती होते. तेव्हा मी थांबतो. स्वतःला सावरण्यासाठी १० मिनिटे जातात. त्यानंतर नव्याने सुरुवात होते. हे केवळ माझ्या सोबतच होत नाही. माझ्या क्रिएटिव्ह टीमसोबत देखील असे घडले आहे. एवढेच नाही तर तेथील स्पॉट बॉईज यांना देखील हाच अनुभव आला आहे. तु्म्ही कधी टेलिव्हिजनच्या इतिहासात असे कधी पाहिले आहे का की, कॅमेरामनच्या संचाने एखादे शुटींग संपल्यानंतर १३ चेकचे एक पाकिट सुत्रसंचालकाला दिले आहे. कॅमेरामन मला म्हणाले की, तुम्ही कार्यक्रमाच्या शेवटी गरजूंना मदत करा म्हणून सांगता. तेव्हा ही आम्ही केलेली मदत आहे. प्रत्येक भागाच्या शेवटी कार्यक्रमाला उपस्थित असलेला प्रत्येकजण हा भावूक होतांना मी पाहिले आहे.

प्रश्न - तू स्वतः एक अभिनेता आहेस, या कार्यक्रमात प्रेक्षकांनी तुला खूपच भावूक होतांना पाहिले आहे, कित्येकदा तुझे डोळेसुद्धा पाणावले आहे. भावूक होऊन एखादा विषय मांडणे हे कलाकाराला सहज जमते, मात्र तू अभिनेता म्हणून हे करतोस की स्वतः एक व्यक्ती म्हणून भावूक होतोस ?
आमिर - अभिनेता म्हणून नाही तर मी एक सामान्य व्यक्ती म्हणून लोकांशी बोलत असतो. तुम्ही कितीही चांगले अभिनेते असाल आणि तुम्हाला जर कोणी म्हणाले, आमिरजी.. मी बलिया येथून बोलत आहे... आणि मी १४ वर्षांची आहे... या क्षणाला तुम्ही समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकण्यात गुंग झालेले असता. तुम्हाला माहित नसेत पुढे काय ऐकायला मिळणार आहे. समोरच्या व्यक्तीची समस्या ऐकतांना त्या व्यक्तीची पार्श्वभूमि काय आहे, हे ठाऊक नसते. या प्रकारच्या चर्चांमध्ये मी पुढाकार घेतो. त्यामुळे माझी क्षमता काय आहे आणि मी काय करु शकतो याची पडताळणी मला या चर्चांमधून करता येते. विशेतः जेव्हा प्रेक्षक आणि कॅमेरे माझ्या जवळ असतात.
आम्ही काही छुपे कॅमेरे लावले. त्यातून अधिक चांगल्या पध्दतीने आम्ही पाहू शकलो. तसेच जेव्हा तुम्ही भावनिक होता तेव्हा तुम्हाला भीती नसते की, तुमच्यावर एखादा कॅमेरा रोखलेला आहे. आम्ही अगोदरच निर्णय घेतला होता की, पाहुण्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणी भेडसावू नये याची आम्ही अगदी सुरुवातीपासूनच काळजी घेतलेली आहे. शिवाय मी सेलिब्रिटी नाही तर तुमच्यापैकीच एक आहे, मी त्यांना आपलासा वाटावा याचाही प्रयत्न मला करावा लागला. प्रत्येक शोच्या एक दिवस आधी मी १५-२० पाहुण्यांसोबत जेवण करतो. त्यांच्यासोबत संबंधित विषयावर चर्चा करतो. यामुळे त्यांना थोडे रिलॅक्स वाटते. त्यामुळे लोक एखाद्या स्टारबरोबर चर्चा करत नाही. ती एक अगदी नैसर्गिक चर्चा रंगते.क्रमशः ...
AAMIR SPL : कोका कोलासाठी आमिरने लावले होते स्वतःचे स्टारडम पणाला !
AAMIR SPL : सत्यमेवच्या बाबतीत आमिरला वाटत होती \'ही\' भीती !