आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये नवोदित डिझायनर्सचा जलवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लॅक्मे फॅशन वीक' या मोठ्या शोची तयारी पूर्ण झाली आहे. 'लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिवल' ३ ऑगस्टपासून सुरु होत आहे. ३ ते ७ ऑगस्टपर्यंत हा शो सुरु राहणार आहे. फॅशन जगतात या इवेंटला महत्त्वाचे स्थान आहे.
यंदा या शोमध्ये नवोदित फॅशन डिझायनर्सलाही संधी देण्यात आली आहे. शिवाय या शोमध्ये नामांकित डिझायनर्स नीता लुल्ला, अनिता डोंगरे, वेंडल रॉड्रिक, क्रिश्न मेहता आणि रितु बेरीसुद्धा आपले नवीन कलेक्शन सादर करणार आहेत. हे सगळे निवडक डिझायनर्स लक्मे फॅशन वीकमध्ये आपल्या कलेक्शनने रंग जमवणार आहेत. या शोमध्ये अनिकेत सताम, आस्था सेठी, सिद्धार्थ अरोरा, कविता शर्मा, मेहक, काईना सेठ, रिचा अग्रवाल, स्नेहा अरोरा हे डिझायनर्सदेखील आपले कलेक्शन शोकेस करणार आहेत.
हे झाले फॅशन डिझायनर्सबद्दल. आता जरा बोलुया या शोमध्ये कॅटवॉक करणा-या मॉडेल्सविषयी. या मॉडेल्सच्या यादीत ज्योतिप्रिया, जामी, श्वेता, पारुल, नताशा आणि स्टेला यांच्या नावाचा समावेश आहे. ५ ऑगस्ट हा दिवस लॅक्मे फॅशन वीकमध्ये 'इंडियन टेक्सटाईल डे' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याची सुरुवात जया जेटली आणि कृष्णा मेहता यांच्या पॅनल डिस्कशनने होणार आहे. या शोमध्ये ८६ डिझायनर्ससमवेत १० स्पॉन्सर्स सहभागी झाले आहेत.
विशेष म्हणजे यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये भारतीय संस्कृतीला उत्कृष्टपणे सादर करणा-या डिझायनरला पहिल्यांदाच एक खास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसणार फॅशनचे फंडे
'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये मलायका-अमृताचा जलवा (फोटो फिचर )