आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी' वेब साइटवर पहा लॅक्मे फॅशन वीकचे खास कव्हरेज....

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (3 ऑगस्ट) पासून लॅक्मे फॅशन वीकची सुरूवात होत आहे. ही पहिलीच वेळ आहे जिथे तुम्हाला एखादी मराठी वेब साइट अशा शो बद्दलची घडलेली प्रत्येक गोष्ट सांगेल. या फॅशन वीकमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचे फोटो आणि त्यासंदर्भातील प्रत्येक बातमीचे कव्हरेच करणार आहेत मार्कल बॅटिस्टा.
लॅक्मे फॅशन वीक हा असा शो आहे ज्यामुळे फॅशन डिझायनर्स जगभरात फेमस झाले आहेत. मनीष मल्होत्रा आणि रितू बेरी यासारखे डिझायनर्सचे उदाहरण तुमच्या डोळ्या समोर आहे.
अशा या फॅशन शोबद्दलच्या प्रत्येक घटनेची बातमी वाचण्यासाठी दिव्य मराठीला वेबसाइट अवश्य भेट देत रहा.
या शोमध्ये पहिल्यांदाच प्रसिध्द डिझायनर्स ऐवजी तरूण डिझायनर्सना संधी देण्यात आली आहे. या शोमध्ये कलोल दत्ता, पंकज आणि निधी यांसारखे नावं देखील सहभागी झाले आहेत. पल्लवी जयकिशन ही नवोदित डिझायनर पहिल्यांदाच सहभागी होत आहे. पहिल्यांदाच तिला तिची कलाकुसर दाखवण्याची संधी मिळणार आहे.
हे काही निवडक डिझायनर्स आहेत जे लॅक्मे फॅशन वीकमध्ये रंग भरतील. हा कार्यक्रम मेन्टॉर डिझायनर आणि स्टायलिस्ट अक्की नरूला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
या शोमध्ये अनिकेत सातम, आस्था सेठी, सिध्दार्थ अरोरा, कविता शर्मा, मेहक, काइना सेठ, रिचा अग्रवाल,स्नेहा अरोरा यांचे कलेक्शन देखील बघायला मिळणार आहे. या शोसाठी काही मॉडेल्स पहिल्यांदाच कॅटवॉक करणार आहेत. ज्यामध्ये ज्योतप्रिया, जामी, श्वेता,पारूल, नताशा आणि स्टेला यांचा सामावेश आहे. याची सुरुवात जया जेटली आणि कृष्णा मेहता यांच्या पॅनल डिस्कशनने होणार आहे. या शोमध्ये ८६ डिझायनर्ससमवेत १० स्पॉन्सर्स सहभागी झाले आहेत.
विशेष म्हणजे यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये भारतीय संस्कृतीला उत्कृष्टपणे सादर करणा-या डिझायनरला पहिल्यांदाच एक खास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये नवोदित डिझायनर्सचा जलवा
ऑगस्ट महिन्यात लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसणार फॅशनचे फंडे
'लॅक्मे फॅशन वीक 'मध्ये मलायका-अमृताचा जलवा (फोटो फिचर )