आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mayor Vs Sunny Leone: Mayor Sunil Prabhu Orders Removal Of Jism 2 Posters!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरांचे बेस्ट बसेसवरुन 'जिस्म २'चे उत्तेजक पोस्टर काढण्याचे ऑर्डर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बृह्नमुंबई महानगर पालिकेच्या नजरेत 'जिस्म २'चे पोस्टर खूपच उत्तेजक आहेत. त्यामुळेच महापौरांनी बेस्ट बसेसवरुन चित्रपटाचे पोस्टर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. एनसीपीच्या नगरसेविका विदया चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विदया चव्हाण यांच्या मते चित्रपटाचे पोस्टर खूपच उत्तेजक आहेत. महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले की, ''चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मी बेस्टच्या मॅनेजरांना बसेसवरील जिस्म २चे सनी लियोनचे पोस्टर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.''
पूजा भट्टचा बहुचर्चित 'जिस्म २' हा चित्रपट या शुक्रवारी रिलीज होत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोव-यात अडकला आहे. चित्रपटाचे टायटल साँग चोरी केल्याचा आरोप या चित्रपटावर आहे. शिवाय चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
पाहा या चित्रपटाविषयी कोणते वाद निर्माण झाले आहेत...