आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Was The First Choice For Shirin Farhad

फराहचा खुलासा, 'बोमन नाही तर सलमान होता माझी फर्स्ट चॉईस'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील न्यू लव्हबर्ड्स फराह खान आणि बोमन इराणी 'शिरीन फरहाद की तो निकल पडी' या चित्रपटात एकत्र काम करुन खूपच खुश आहेत. फराह आणि बोमन यांनी नुकतीच आमच्या मुंबई ऑफीसला भेट दिली आणि व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून दैनिक भास्कर डॉट कॉमच्या इतर सेंटर्सबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुलाखतीत या दोघांनीही अनेक इंट्रेस्टिंग गोष्टींचा उलगडा केला.
फराहने सांगितले की, या चित्रपटासाठी बोमनऐवजी सलमान खान सगळ्यांची पहिली आवड होता. फराहला सलमानच्या अपोझिट कास्ट करण्याची योजनाही आखण्यात आली होती.
फरहाने सांगितले की, ''तब्बल सात वर्षांपूर्वी मला आणि सलमानला या चित्रपटात मुख्य भूमिकेत कास्ट करण्याचा प्लान होता. मात्र हे घडू आले नाही. थँक गॉड असे नाही झाले. नाही तर विचार करा सलमानची काय अवस्था झाली असती. बिचा-या सलमानला ४५ वर्षीय हिरॉईनबरोबर काम करावे लागले असते.(फराह हसत बोलली.)'' फराह बोलत असतानाच बोमन मध्येच बोलले की, फराह आणि सलमानची जोडी खूपच छान दिसली असती नाही का.
येत्या २४ ऑगस्टला फराह-बोमनचा 'शिरीन फरहाद की तो निकल पडी' हा चित्रपट रिलीज होत आहे.
शिरीन फरहाद की तो निकल पडी...