आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनचे अपिल : अधिक सेक्स चुकीचे; प्राण्यांची नसबंदी करा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोर्न स्टार सनी लियोनचे म्हणणे आहे की, अधिक सेक्स करणे धोकादायक होऊ शकते. यासोबतच सनीने प्राण्यांच्या नसबंदीचे समर्थन केले आहे.
प्राण्यांच्या अधिकारासाठी लढणा-या पेटा संस्थेच्या नव्या जाहिरातीत ती कुत्रे आणि मांजरांची नसबंदी करण्याचे अपील करताना दिसणार आहे.
सनीचे म्हणणे आहे की, 'मोकाट कुत्रे आणि मांजर यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी त्यांची नसबंदी करणे अत्यंत गरजेचे आहे. जर आम्ही आमच्या पाळीव प्राण्यांना, विशेषतः कुत्र्यांना 'अधिक सेक्स' करण्यासाठी मोकळे सोडले आणि त्यांची नसबंदी केली नाही तर, रस्त्यांवर, गल्ली-बोळात त्यांचा सुळसुळाट होईल.'
सनी म्हणते, 'माझे मत आहे की, प्राण्यांना विकत न घेता त्यांना दत्तक घेतले पाहिजे. कारण प्राण्यांना प्रेम हवे असते. प्राण्यांना विकत घेण्याच्या प्रवृत्तीमुळे आज रस्त्यांवर मोकाट कुत्रे फिरताना दिसत आहेत. बेवारस प्राण्यांनाही घर आणि जेवण मिळाले पाहिजे. पेटाची ही मोहिम प्राणीमित्रांच्या जागृतीसाठीच आहे. त्यांनी त्यांच्या मालकीच्या कुत्र्यांची आणि माजरांची नसबंदी केली पाहिजे. तसेच प्राण्यांना विकत न घता बेवारस प्राण्यांना आपल्या घरात आसरा दिला पाहिजे. '
'डर्टी' विद्यावर फिदा झाली पोर्न स्टार सनी लियोन
'जिस्म २'मध्ये पोर्नस्टारच्या भूमिकेत सनी
'लहान मुलांसाठी नाही सनी लियोनचा जिस्म-2'
सनी लियोन बनणार रिएलिटी शोची जज !