आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात धुवून घतोय अभय देओल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभय देओलचा मागचा आठवडा खूप धावपळीचा होता. सुरूवातीला तर अभय आपल्या फेसबूक अकाऊंट पून्हा सुरू करण्याच्या कामात होता. त्यानंतर आपला हॉलिवूडपट सिंगुलॅरिटीमधील आपला लूक समोर आणायचा की नाही, याच्या विचारात तो होता.
या सगळयांमध्ये त्याची टिम फेसबूकवरील त्याचं फेक अकाऊंट बंद करण्याच्या प्रक्रियेत होती. जेंव्हा त्याची टिम बनावट अकाऊंट बंद करण्याच्या कामात होती, तेंव्हा त्याच्या ख-या अकाऊंटलाच खोटं ठरवण्यात आलं. त्यामुळं त्याचं अकाऊंट ब्लॉक झालं.
अभयनं फेसबूक अधिका-यांशी संपर्क केला. आपलं अकाऊंट खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला त्याचा पासपोर्टही जमा करावा लागला होता. त्यानंतर त्याचं अकाऊंट पून्हा सुरू झालं.
अभयसमोर अजून एक प्रश्न होता की, मार्केटिंगच्या नियमांनुसार हॉलिवूड चित्रपट सिंगुलॅरिटीचा लूक जाहिर करायचा की नाही. जे लोक अभयला ओळखतात त्यांचं म्हणणं आहे की, पब्लिसिटीपासून दूर राहून चित्रपटानंच काम केलं तर चांगलं आहे. पण आता वाटतंय की, वाहत्या पाण्यात हात धुवून घेत मार्केटिंग टिमसोबतच जाण्याचं अभय ठरवत आहे.
त्यानुसार हातात मोबाईल धरून या चित्रपटातील आपला लूक अभय पुढं आणत आहे. यात त्याचे केस वाढवलेले आहेत. दाढीही वाढवली आहे.पण त्यानंतर लगेच त्यानं केस कापले आणि दाढीही काढून टाकली. आजकाल अभय आपल्या लूकवर जास्तच काम करतांना दिसतोय.