आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस- 5: आकाशदीप सहगल 'गुडी बॉय' बनण्‍याचा प्रयत्‍न करतोय?

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकाशदीप सहगल बिग बॉसच्‍या घरात आल्‍यापासून त्‍यानं अनेकांमध्‍ये भांडण लावण्‍याचा प्रयत्‍न केलाय. त्‍यानं घरात अनेक वाद निर्माण केलेत. तो स्‍वत:च फक्‍त भांडत नसून तो इतरांनाही भांडण उकरून काढण्‍यास प्रवृत्‍त करतो. त्‍यानं पूजा मिश्राला विदाशी भांडण्‍यास भाग पाडलं. तसंच स्‍वत: मेहेकच्‍या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्‍यानंतर आकाशदीपला त्‍याची चूक उमगली, त्‍यानं मेहेकची माफीही मागितली. पण तरीही, परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
ताजी बातमी अशी की, आकाशदीपनं मेहेकशी असलेले वाद मिटवून भूतकाळातील गोष्‍टी विसरण्‍याचं ठरवलंय. आकाशदीप अनेकदा चेष्‍टा मस्‍करी करत घरातील वातावरण बदलण्‍याचा प्रयत्‍न करतोय. त्‍याच्‍या या वागण्‍यामुळं पूजा बेदी आणि जुही परमार इंप्रेसही झाल्‍या आहेत. अगदी त्‍याच्‍या पाठीमागंही त्‍याचं कौतुक करतात.
आकाशदीप त्‍याचे वेगवेगळे रंग दाखवण्‍याचा प्रयत्‍न करतोय. त्‍यामुळं घरातील सदस्‍यांना तो नेमका कसा आहे हेच समजत नाहीये. पण आता तरी घरातील वातावरण शांत होईल हीच अ पेक्षा आहे.