आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amir Khan Throws Light On Problems Created By Medical Field

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्‍टर बनले यमराजः 'सत्‍यमेव जयते'मधुन आमिरने टाकला प्रकाश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्‍येक व्‍यक्ती कधी ना कधी आजारी पडतो. त्‍याला डॉक्‍टरकडे जावेच लागते. औषधे घ्‍यावीच लागतात. अनेक जणांना गंभीर आजार होतात. त्‍यावरील उपचार प्रत्‍येकालाच परवडतीलच असे नाही. इथेच पाणी मुरते. वैद्यकीय सेवा ही इश्‍वराप्रमाणे मानल्‍या गेली आहे. परंतु, डॉक्‍टरकडे गेल्‍यापासून लूट सुरु होते. तपासणीपासून ते औषधोपचारापासून प्रत्‍येक ठिकाणी कमिशन ठरलेले असते. औषधे लिहून देण्‍यासाठीही औषध निर्मात्‍या कंपन्‍या डॉक्‍टरांना वेगवेगळ्या स्‍वरुपात कमिशन देतात. याप्रकरातून पोळला जातो तो सर्वसामान्‍य गरीब व्‍यक्ती. 'सत्‍यमेव जयते'मधून आमिर खानने आज याच समस्‍येवर प्रकाश टाकला आहे.
भारतीय संस्‍कृतीमध्‍ये डॉक्‍टरला इश्‍वराचा दर्जा दिला जातो. परंतु, आज अनेक ठिकाणी डॉक्‍टर यमराज झाल्‍याचे दिसून येते. विनाकारण तपासणी करण्‍यात येते, त्‍यासाठी डॉक्टरला कमिशन मिळते. ही एक साखळीच आहे. आमिरने काही पॅथालॉजी प्रयोगशाळा चालविणा-यांना बोलते केले. अनेक ठिकाणी प्रत्‍येक चाचणीसाठी डॉक्‍टरला कमिशन द्यावे लागते. काही चाचण्‍यांसाठी तर 50 टक्‍के द्यावे लागतात, असे या प्रयोगशाळा संचालकांनी सांगितले. गरज नसतानाही अशा चाचण्‍या करण्‍यासाठी सांगण्‍यात येते. रुग्‍णाच्‍या खिशातून पैसे जातात आणि चाचणीतून काहीही निष्‍पन्‍न होत नाही.

औषध कंपन्‍यांकडून अशी होते लूट
गोरगरीब जनतेला औषध कंपन्‍यांकडून अक्षरशः लुटण्‍यात येते. औषधे तयार करण्‍यासाठी अतिशय कमी खर्च होतो. परंतु, तिच औषधे शेकडो पट जास्‍त किंमतीत विकण्‍यात येतात. 'सत्‍यमेव जयते'च्‍या व्‍यासपीठावर आलेल्‍या डॉक्‍टरांनी मधुमेहाच्‍या औषधाचे उदाहरण देऊन कशा प्रकारे लुट सुरु आहे, हे जनतेसमोर मांडले. मधुमेहासाठी लागणा-या एका औषधाच्‍या 10 गोळ्यांची स्‍ट्रीप फक्त 1.95 रुपयांमध्‍ये तयार होते. तेच औषध बाजारात 117 रुपयांना विकण्‍यात येते. यामधुन कर वेगळे केले तरीही कितीतरी जास्‍त पटीने या औषधाची विक्री होत असल्‍याचे वास्‍तव आहे. अनेक किरकोळ आजारांवरील औषधे 50 ते 100 रुपयांपर्यंत मिळू शकतात. परंतु, ती औषधे 400 ते 500 रुपयांमध्‍ये विकली जातात. गोरगरीब जनता एवढे पैसे मोजू शकत नाही. त्‍यामुळे अगदी उलटी आणि जुलाबासारख्‍या आजारामुळे या गरीबाच्‍या घरातील मुल दगावते. स्‍वातंत्र्याच्‍या 65 वर्षांनंतरही अशीच स्थिती आहे. यापेक्षा मोठी लाजीरवाणी गोष्‍ट आपल्‍यासाठी नाही.
'सत्‍यमेव जयते'मधुन यावेळी आमिरने मांडली हुंड्याची समस्‍या
सत्यमेव जयते मध्ये आमिरने का लपवले 'सत्य'