आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा कॉमेडीच्या 'एक्स्प्रेस'मध्ये चढणार अमृता खानविलकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या 'कॉमेडी एक्स्प्रेस' या कार्यक्रमाला मध्यंतरीच्या काळात अभिनेत्री अमृता खानविलकरने रामराम ठोकला होता. तीन वर्षे या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा अमृताने सांभाळली होती. अमृताने एक्स्प्रेस सोडल्यानंतर आधी पल्लवी सुभाष आणि नंतर मनीषा केळकरने ही एक्स्प्रेस पकडली. मात्र 'कॉमेडी एक्स्प्रेस'ची गाडी वेग पकडू शकली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा वाहिनीने अमृतालाच ही एक्स्प्रेस पकडण्यासाठी सांगितले आहे. विशेष म्हणजे अमृतानेही यासाठी होकार दिला आहे.छोट्या पडद्यावरच्या ई टीव्ही वाहिनीवर सुरु असलेल्या 'कॉमेडी एक्स्प्रेस' या शोच्या तब्बल साडेतीनशे एपिसोड्सचे अँकरिंग अमृताने केले होते. मात्र नंतर तोचतोपणा येत असल्यामुळे आणि हातात भरपूर इतर प्रोजेक्ट्स असल्यामुळे अमृताने या कार्यक्रमातून ब्रेक घ्यायचा ठरवला होता. अमृतानंतर पल्लवी सुभाषने काही एपिसोड्सचे अँकरिंग केले. त्यानंतर मनिषाने ही धुरा सांभाळली. मात्र आता वाहिनीने अँकर बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमृता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालनाची धुरा आपल्या खांद्यावर घेणार आहे. येत्या १५ जुलैपासून अमृता अँकरिंग करतांना दिसणार आहे.
दुस-यांदा आई होणार आहे अमृता अरोरा
फुलवाल्याचे दुकान आणि अत्तरगल्ली भावली - अमृता सुभाष
नाशिक छानच आहे : अमृता खानविलकर
अभिनेत्री अमृता यादवसह तीन युवक ताब्यात