आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बोल बच्चन'ने दाखवला दम, आठवड्याभरात केली १०१.७६ कोटींची कमाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात रिलीज झालेला 'बोल बच्चन' हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आठवड्याभरातच रोहित शेट्टीच्या या सिनेमाने शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. बुधवारी ५.४३ कोटींची कमाई करुन या चित्रपटाचे नाव शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले. भारत आणि ओवरसीज मार्केटमध्ये या चित्रपटाने आत्तापर्यंत १०१.७३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकट्या भारतात ८८.४ कोटींचा बिझनेस केला. तर परदेशात २.४ मिलियन डॉलरची कमाई केली. अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडीची ही आत्तापर्यंतची सगळ्यात हिट फिल्म ठरत आहे.
अभिषेक बच्चन, असीन, अजय देवगण, प्राची देसाई यांची ही फिल्म फॅमिली ऑडीअन्सच्या पसंतीला उतरली आहे. विशेष म्हणजे यावर्षी रिलीज झालेल्या 'राऊडी राठौड' आणि 'अग्निपथ' या चित्रपटांपेक्षाही 'बोल बच्चन' चांगला बिझनेस करत असल्याचे चित्र आहे.
'बोल बच्चन'ची ३ दिवसांत ७२.८ कोटींची कमाई, आता तयारी सिक्वेलची...
EVENT PICS:'बोल बच्चन'च्या प्रीमिअरला बच्चनचा बोलबाला
'क्रेजी कॉमेडी' आहे 'बोल बच्चन'