आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बोल बच्चन'ची ३ दिवसांत ७२.८ कोटींची कमाई, आता तयारी सिक्वेलची...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगण आणि अभिषेक बच्चनच्या 'बोल बच्चन' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे चांगले यश मिळत आहे. अभिषेक बच्चनचे उत्तम कॉमिक टायमिंग आणि रोहित शेट्टी-अजय देवगणच्या हिट जोडीमुळे या चित्रपटाने शुक्रवारी १२.१० कोटींची ओपनिंग केली. दुस-याच दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा १४ कोटींवर गेला. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७२.८ कोटींची कमाई केली आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज, श्री अष्टविनायक सिनेविजन आणि अजय देवगण फिल्म्स प्रॉडक्सशनचा हा चित्रपटही हिटच्या यादीत सामील झाला आहे.
भारतात या सिनेमाची कमाई आजपर्यंत ४२ कोटी एवढी झाली आहे. याचबरोबर परदेशातून मिळवलेल्या कमाईचा आकडा जमेस धरला, तर ही कमाई ७२ कोटी ८० लाख रुपये होत आहे.
रोहित शेट्टी- अजय देवगण जोडीच्या 'गोलमाल-३' आणि 'सिंघम' या दोन्ही सिनेमांनीही १०० कोटींचा टप्पा पार केला होता. आता 'बोल बच्चन' हा सिनेमाही १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असेच दिसत आहे.
चित्रपट भरघोस कमाई करत असल्यामुळे साहजिकच चित्रपटाची संपूर्ण टीम खूप खुश आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवल्यामुळे रोहित शेट्टीने 'बोल बच्चन'चा सिक्वेल तयार करण्याची घोषणाही केली आहे. अभिषेक बच्चननेही चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. आता अजय देवगणशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याचे रोहितने सांगितले.
फसवी 'बोल बच्चन'गिरी
EVENT PICS: 'बोल बच्चन'च्या प्रीमिअरला बच्चनचा बोलबाला
गुजरातमध्ये मध्यरात्री रिलीज झाला 'बोल बच्चन'
'क्रेजी कॉमेडी' आहे 'बोल बच्चन'