आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bol Bachchan Released In The Midnight In Gujarat

गुजरातमध्ये मध्यरात्री रिलीज झाला 'बोल बच्चन'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक रोहित शेट्टीने गुजरातमध्ये राहणा-या चाहत्यांना एक अनोखी भेट दिली आहे. रोहितने 'बोल बच्चन' हा चित्रपट चक्क गुरुवारी मध्यरात्री रिलीज केला. चित्रपट मध्यरात्री रिलीज करण्याचा निर्णय रोहितने खास गुजराती महिलांसाठी घेतला.
गुजरातमध्ये सध्या जयापार्वती हे व्रत सुरु आहे. गुजराती महिला आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी हे व्रत करत असतात. या व्रताच्या पाचव्या दिवशी महिला रात्रभर जागरण करुन दुस-या दिवशी सकाळी या व्रताची सांगता करत असतात. गुजरातमध्ये एक जुलैपासून या व्रताला सुरुवात झाली असून शुक्रवारी त्याची सांगता होणार आहे. भारतात इतर ठिकाणी हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही तासांपूर्वीच म्हणजे गुरुवारी मध्यरात्री 12 ते 3 आणि 3 ते 6 अशा दोन खेळांचे आयोजन रोहितने केले. गुजराती महिलांच्या मनोरंजनासाठी रोहितने हा विशेष निर्णय घेतला.
सुत्रांच्या माहितीनुसार, अशाप्रकारे एखादा चित्रपट रिलीज होण्याची ही पहिलीच घटना आहे.
1979मध्ये आलेल्या 'गोलमाल' या चित्रपटावर बोल बच्चनचे कथानक आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण, अभिषेक बच्चन, असिन आणि प्राची देसाई मेन लीडमध्ये आहेत.

'क्रेजी कॉमेडी' आहे 'बोल बच्चन'
VIDEO : 'बोल बच्चन'च्या 'नच ले'मध्ये अभिषेक-प्राचीचा जलवा !
PHOTOS : 'डान्स इंडिया डान्स'च्या सेटवर 'बोल बच्चन'
छायाचित्रांमध्ये पाहा, 'बोल बच्चन'चा जलवा