आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Hrithik Roshans Homely Gesture Towards Quadriplegic At Mumbai

ऋतिक रोशन देतोय 'क्वाड्रोब्लेजिक'च्या रुग्णाना नवजीवन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गुजा‍रिश'मध्ये 'क्वाड्रोब्लेजिक' रुग्णाची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन अशा रूग्णांच्या मदतीला धावून आला आहे. 'क्वाड्रोप्लेजिक' या आजाराने ग्रासलेल्या साधनाला (नाव बदलले आहे) त्याने घर दिले आहे. विशेष म्हणजे त्याने तिला वर्षाला 2 लाख 21 हजार रूपये देण्याचाही निर्णय घेतला आहे.
फिजिकल रिहॅबिलिटेशन थेरेपिस्ट डॉ. इंदू टंडन यांनी ऋतिकला गुजारिश चित्रपटामधील 'क्वाड्रोब्लेजिक' या भूमिकाबाबत विशेष प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच ऋतिकने साधना हिला मदत करण्याचे ठरविले आहे.
मुंबईतील अंधेरी-पूर्व भागात आपल्या पतीसोबत राहणारी साधनाला 'क्वाड्रोप्लेजिया' या आजाराने ग्रासले आहे. तिला रुग्णालयात येण्यासाठी अंधेरी ते ओशिवरा दररोज ये-जा करावी लागते. त्याचा तिला खूप त्रास होतो.
ऋतिक रोशनने साधलाला मदत करण्‍याचे ठरविले आहे. साधनाला त्याने रुग्णालयाजवळ असलेल्या मिल्लत नगरात घर दिले आहे. या घराचे त्याने 12 महिन्यांचे भाडेही दिले आहे. विशेष म्हणजे साधनाला औषधासाठी वर्षाकाठी 2 लाख 21 हजार रूपये देण्याचाही निर्णय ऋतिकने घेतला आहे.