आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयात ऋतिक रोशन झाला अरबपती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आता झाला आहे बॉलिवूडमधला कमी वयाचा अरबपती. ऋतिकने ही मजल कशी मारली याचाच विचार तुम्ही करत असाल ना ? खरं तर ऋतिक बॉलिवूडमध्ये मेहनती अभिनेता आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर ऋतिक कमी वयातच अरबपती झाला आहे. ऋतिकचा 'अग्निपथ' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. करण जोहर निर्मित आणि करण मल्होत्रा दिग्दर्शित 'अग्निपथ' या सिनेमाने बॉक्स ऑफीसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या सिनेमाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळवली. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तब्बल १२५ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या रेकॉर्ड ब्रेक कमाईमुळे ऋतिक बी टाऊनचा सगळ्यात कमी वयाचा अरबपती ठरला आहे.

सध्या ऋतिक आपल्या आगामी 'क्रिश ३'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी असल्यामुळे ऋतिकला यावर्षी आपल्या कुटुंबियांबरोबर होळी साजरी करता आली नाही. एकंदरीतच 'अग्निपथ'च्या यशानंतर ऋतिकला आता वेध लागले आहेत ते 'क्रिश ३' या सिनेमाचे.
शौर्या चौहानने उडवली ऋतिक रोशनची झोप
ऋतिक रोशन दिसणार भगवान शिव शंकराच्या रुपात
पाहा 'बर्थ डे बॉय' ऋतिक रोशनचा जीवनपट छायाचित्रांतून