आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Sonam Kapoor Never Item Number One

आयटम नंबर शक्य नाही : सोनम कपूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेत्री सोनम कपूरने आतापर्यंत आयटम गाणे केले नाही. ते न करण्यामागचे कारण सांगत सोनम म्हणाली की, आयटम गाणे करण्यासाठी मी योग्य आहे, असे मला वाटत नाही.
मी सडपातळ आहे, हेल्दी आहे, परंतु आयटम गाणे करण्यासाठी जी अदाकारी, सौंदर्य लागते ते माझ्याकडे नाही, असे सोनमने सांगितले. सद्य:स्थितीत मी मलायका अरोरा खानची चाहती असून आयटम गाण्यांमध्ये मी तिला पहिल्या क्रमांकावरच ठेवेन. मलायका सध्याची हेलन आहे, असे सोनम म्हणाली. विशेष म्हणजे दबंग चित्रपटातील मलायका अरोरावर चित्रित झालेल्या मुन्नी बदनाम हुई गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवली होती.
भविष्यामध्ये आपण वडिलांप्रमाणेच हॉलिवूड चित्रपटात काम करण्यास इच्छूक आहे. असे असले तरी सध्या हॉलिवूडचे कोणतेही प्रस्ताव आपल्याकडे नाहीत, असे सोनम प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितले.
सोनम कपूर सध्या राकेश ओमप्रकाश मेहराच्या भाग मिल्खा भाग या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. प्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. चित्रपटामध्ये सोनम कपूरसोबत फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. सोनम कपूरचे गेले काही दिवस बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने चांगले राहिले नाहीत.
यावर्षी तिचा प्लेअर्स हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला. अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपटत चालला नाही. याव्यतिरिक्त गेल्यावर्षी शाहीद कपूरसोबतचा बहूप्रतिक्षित चित्रपट मौसम प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही दर्शकांनी नाकारले.