आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL सामन्यात शाहरुख एकटाच, काय गौरी अजूनही आहे नाराज?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवडचा किंगखान शाहरुख आयपीएल सामन्यांना एकटाच हजेरी लावतांना दिसत आहे. मागील सिजनमध्ये त्याची पत्नी गौरी नेहमी त्याच्या सोबत दिसत होती. मात्र आयपीएल ५ मध्ये गौरी कुठेच दिसलेली नाही. त्यामुळे या स्टार कपलमध्ये काही कुरबूर असल्याचीही बी टाऊनमध्ये चर्चा आहे.

शाहरुख-गौरी एकमेकांना टाळण्यामागे प्रियंका चोपडाची शाहरुख सोबत वाढलेली 'मैत्री' कारणभूत आहे. डॉन-२ दरम्यान शाहरुख आणि प्रियंका यांच्यातील जवळीक वाढली असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे गौरी वैतागली होती. प्रियंकासोबतचा तिचा वादही बरेच दिवस रंगला होता.

तेव्हापासून गौरी आणि शाहरुख फारकाही सोबत दिसत नाही. त्यामुळेच या दोघांमधील वादाच्या बातम्यांना हवा मिळत आहे की, त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे.

गौरी आयपीएल सामन्यावेळी मैदानात दिसत नाही त्याचे दुसरेही कारण सांगितले जात आहे. ती तिच्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कामात व्यस्त आहे आणि त्यामुळेच ती आयपीएल सामन्यांना हाजेरी लावत नाही.

आता कारण काहीही असो, या स्टार कपलच्या चाहत्यांच्या नजरा त्यांना आयपीएल सामन्यात सोबत पाहाण्यासाठी बेचैन आहेत, एवढे नक्की.
वानखेडे स्टेडियमवर शाहरुखचा गोंधळ; सुरक्षारक्षकाला केली मारहाण