आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is Famous Bollywood Actor And Actress Secretary

यांच्या मुठीत अमिताभ, आमिर, शाहरुख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रोझी सिंह यांची इच्छा असेल तरच तुम्ही अमिताभ बच्चनला भेटू शकाल. आमिर खानने काय बोलावे हे तो नव्हे, शिल्पा हांडा ठरवतात. शाहरुख खानचे मानधन किती असावे याचा निर्णय करुणा बडवाल घेतात. करिना-सैफच्या विवाहाबद्दल त्यांच्या मातापित्यांऐवजी रोहिणी अय्यर यांच्याशी बोलावे लागेल. या आहेत बॉलीवूडच्या सर्वात पॉवरफुल महिला. सर्वजणी तिशी-पस्तिशीतल्या. पान चघळत वर्षानुवर्षे बॉलीवूडवर सत्ता गाजवणारे सेके्रटरी व पीआरओंपासून यांनी बॉलीवूडच्या बहुतांश मोठ्या कलाकारांना मुक्त केले. या बदलाच्या काळात बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांच्या सेक्रेटरी, इमेज कन्सल्टंट व मॅनेजरही याच महिला आहेत. आयपॅड व ब्लॅकबेरीच्या माध्यमातून सर्व कलाकारांना त्या अपडेट करतात. बॉलीवूडमधील बहुतांश दिग्गज कलाकारांच्या खासजी व व्यावसायिक आयुष्यात यांच्याशिवाय पानही हलत नाही.
या सर्वजणी ग्लॅमरपासून दूर राहतात. बॉलीवूडमधील फार थोड्यांची रोझीशी तोंडओळख आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर शाहरुख खान मैदानावर जल्लोष करत असताना करुणा मैदानावर दिसली. रोहिणीचे नाव तर वर्व्ह मासिकाने ‘पॉवर वूमन’च्या यादीत समाविष्ट केले आहे.
बच्चन कुटुंबीय लहानात लहान कामासाठीही रोझीवर अवलंबून असतात. त्या बिग बी चा वॉर्डरोबच नव्हे तर ईमेल अकांउंटही उघडू शकतात. बच्चन कुटुंबीयांचे एक निकटवर्ती सांगतात की जर बिग बीच्या भेटीची वेळ बदलली असेल, तर त्या वेळेपूर्वी तुम्हाला फोन करतील व तुमचा योग्य आदर राखतील. त्या दररोज बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावर किंवा ‘जनक’ कार्यालयात हजर असतात, बिग बींचा दिनक्रम त्याच ठरवतात. पण आजवर कोणीही त्यांचा चेहरा पाहिलेला नाही. बिग बींचा ब्लॉग सांभाळणारे चित्रपट निर्माते पी. शिवकुमार सांगतात - मी पाच वर्षे बिग बींचा ब्लॉग सांभाळला. घर वा कार्यालयात शेकडोवेळा त्यांना भेटलो, पण रोझी सिंह यांची भेट कधीही झाली नाही. आमिर खान मि. परफेक्शनिस्ट असल्यामुळेच इमेज कन्सल्टंट शिल्पा हांडा त्यांच्यासोबत काम करतात. शिल्पा हांडा व त्यांची कंपनी स्पाइस वन असे क्लाइंट निवडते जे सर्वात्तम आहेत, उदाहरणार्थ राजकुमार हिरानी, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, इमरान खान. चित्रपटांच्या प्रसिद्धीत आमिर खान सर्वांपेक्षा हटके असण्याचे गुपित म्हणजे त्याच्या प्रसिद्धी प्रयोगांच्या सूत्रधार शिल्पा असतात. त्यांनी यापूर्वी यशराज फिल्मस् व एबी कॉर्पच्या पब्लिसिटीची जबाबदारी सांभाळलेली आहे. आमिर खान त्यांच्याशी बोलल्या शिवाय कोणतीही मुलाखत देत नाही, एवढा त्याचा त्यांच्यावर विश्वास आहे.
करुणा बडवाल यांचे नाव इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत आहे कारण त्यांना भेटल्याशिवाय तुम्ही शाहरुख खानला भेटू शकत नाही. करुणा यांचे वडील मदन अरोरा हे प्रसिद्ध अभिनेते डॅनी यांचे सेक्रेटरी होते. शाहरुख खानची कंपनी रेड चिलीजही करुणा सांभाळतात. चित्रपट दिग्दर्शक विवेक शर्मा सांगतात- करुणांवर कोणतीही जबाबदारी सोपवून तुम्ही निश्चिंत होऊ शकता, हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या मीडिया मॅनेजमेंटची जबाबदारी अन्य एक महिला निलोफर कुरैशी याच सांभाळतात.
प्रसिद्ध इमेज कन्सल्टंट रोहिणी अय्यर यांची क्लाइंट लिस्ट म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचा एनसायक्लोपीडियाच आहे. करिना कपूर, सैफ अली खान, विद्या बालन, रणबीर कपूर, कॅटरिना कैफ, एकता कपूर, अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा, जॉन अब्राहम व अभय देओल. संकटाच्या क्षणी या सर्वांना रोहिणीची हमखास आठवण येते.