आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Doesn't Want To Go Home Because Of Krish 3

घर सोडून दुस-याच ठिकाणी राहातोय ऋतिक रोशन !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋतिक रोशन 'क्रिश ३'ला यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीय. तो आपला लूक, मेकअप, स्टंट्स, एक्टिंग या सगळ्यांवर जीवतोड मेहनत घेत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ऋतिक 'क्रिश ३'मध्ये एवढा बिझी झाला आहे, की त्याने कित्येक दिवसांपासून आपल्या घराचा रस्ताच बघितलेला नाही. म्हणजेच गेल्या काही दिवसांपासून हृतिक घरीच गेलेला नाही. ऋतिकने फिल्म सिटीजवळ असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रुम बुक केली आहे. वेळ आणि श्रम वाचावे म्हणून ऋतिकने घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतिकच्या घरापासून म्हणजेच जूहू ते फिल्म सिटीपर्यंत जाण्याच्या मार्गावर भरपूर ट्रॅफिक जाम असते. त्यामुळे शुटिंगच्या ठिकाणी पोहचायला भरपूर वेळ लागतो. या सगळ्यांचा परिणाम 'क्रिश ३'वर होऊ नये म्हणून ऋतिकने हा सगळा खटाटोप केला आहे. 'क्रिश ३'मध्ये ऋतिक म्हातारा आणि तरुण अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहे.
आता ऋतिकच्या या निर्णयामुळे तोही आमीरसारखा पर्फेक्शनिस्ट होऊन काम करत असल्याचे दिसत आहे. मात्र त्याच्या या मेहनतीचा फायदा 'क्रिश ३'ला यश मिळवण्यासाठी झाला म्हणजे मिळवलं.

'क्रिश-3' च्या सेटवर 'अग्निपथ'च्या यशाचे सेलिब्रेशन!