आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I'm Not Inspired By Any Hollywood Celeb: Sonakshi

कोणाचीही नक्कल करत नाही : सोनाक्षी सिन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दोन वर्षापूर्वी बॉलीवूडमध्ये ‘दबंग’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा ‘राउडी राठौर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर भन्नाट कमाई करत आहे. मला ज्यावेळी जसे कपडे परिधान करायचे असतात तेच मी परिधान करते. तसेच मी हॉलीवूडच्या कोणत्याही कलाकारांची नक्कल करत नाही असे सोनाक्षीने नुकतेच म्हटले आहे.
एका मुलाखतीत तिने बोलताना सांगितले की, आतापर्यंत मी केवळ दोनच चित्रपट केले आहेत. सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याचा अनुभव हा काही वेगळाच होता. काही दिवसांपूर्वी तिच्यावर हॉलीवूड कलाकारांची नक्कल करत असल्याचा आरोप लावण्यात येत होता. यावर तिने नकारात्मक घंटा वाजवून सांगितले की, मी कोणत्याही हॉलीवूड कलाकारांची नक्कल करत नाही. मला भारतीय वस्त्रे खूप आवडतात. त्यामुळे मला जे कपडे आवडतात त्यांना मी प्राधान्य देते. आजकाल अनेक अभिनेत्री या आयटम साँग करण्यासाठी तंग कपड्याचा वापर करतात. मात्र, मला साडीवर नृत्य करण्यात कोणतीही अडचण येत नाही. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असल्याने मला जो काही लाभ होतो तो मी आनंदाने स्वीकारते असेही तिने या वेळी सांगितले. सोनाक्षीने बॉलीवूड दोन वर्षांपूर्वी पदार्पण केले होते.
‘दबंग’ हा तिचा पहिलाच चित्रपट तुफान हिट झाला होता. त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेला ‘राउडी राठौर’ हा चित्रपटदेखील सध्या भन्नाट गाजत आहे. तसेच तिच्याकडे सध्या ‘लुटेरा’, ‘सन ऑफ सरदार’ ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’ चा सिक्वेल हे चित्रपट आहेत. त्यामुळे आगामी वर्षातदेखील रुपेरी पडद्यावर सोनाक्षीचा जलवा कायम राहणार आहे.
‘राउडी राठौर’ 100 कोटींचा - अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांचा अ‍ॅक्शन, थ्रीलर, कॉमेडी, रोमान्स असे मिश्रण असलेला ‘राउडी राठौर’ हा चित्रपट दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शनिवारपर्यंत भारतात 92 कोटींची कमाई केली, तर परदेशात 11 कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘राउडी’ 100 कोटी कमाई करणा-या चित्रपटांच्या रांगेत जाऊन बसला आहे. हा चित्रपट 150 कोटींचा जादुई आकडा पार करेल, असे समीक्षकांना वाटते.