आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशा शर्वाणीचं झाडाला लटकणं झालंय सफल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुभाष घईच्या किसना चित्रपटाची नायिका लक्षात आहे ना? अहो तीच, झाडाला लटकून रस्सीवर डान्स करणारी ईशा शर्वाणी. आता लक्षात आली असेल. मुद्दा हा आहे की, तिचं हेच नृत्याचं ज्ञान तिच्यासाठी वरदान ठरलंय.
आपल्या नृत्यकौशल्याच्या बळावर ईशाला कमल हसनच्या आगामी विश्वरुपम या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. असं म्हणतात की,ईशाला या चित्रपटात घेण्यामागचं मुख्य कारण हेच की, तिला कथ्थक, कलारिपायतु आणि इतर शास्त्रीय नृत्यप्रकार येतात. हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषेत तयार होणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनापर्यंतच न थांबता कमल हसन या चित्रपटाचं संगीत आणि संवादलेखनही स्वत:च करणार आहे.