आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaiprakash Chokse Bollywood Feature On Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हा- मर्यादा आणि मादकता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हाचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले दोन्ही चित्रपट यशस्वी झाले आहेत. माध्यमांनी प्रचारित केलेल्या आजच्या काळातील सुविधांनी संपन्न महानगरातल्या मुलीचे पात्र न करता सोनाक्षीने छोट्या गावातील मुलीच्या भूमिका अगदी उत्तम साकारल्या. महानगरातली मुलगी असल्यामुळे अंगप्रदर्शनाची सूट मिळते आणि उघड्या शरीराने अभिनयाच्या कमतरतेला लपवले जाऊ शकते; पण ग्रामीण मुलगी असल्यामुळे सोनाक्षीने दोन्ही चित्रपटांत साड्या घातल्या. साडीत सर्व काही लपवले आणि बरेच काही दाखवले जाऊ शकतं, हे तिने दाखवून दिले.
खरं तर साडी दोष लपवते आणि आकर्षणाला धार देते. महानगरीय पद्धतीची साडी सोनाक्षीने घातलेली आहे. ज्याला आपण महानगरीय म्हणतो, खरं तर तशा साड्या काही ग्रामीण भागात घालण्याची जुनी पद्धत आहे. तेथे मजुरी करणार्‍या महिला अशाच साड्या घालतात किंवा साडीसारखा कपडा बांधतात. र्शीमंतांचे नोकर महानगरातल्या मॉलमध्ये किंवा किराणा दुकानात मालकासाठी जव किंवा बार्ज‍याचे पीठ विकत घेताना दिसतात. वजन कमी करण्यासाठी समृद्ध लोक गरिबांचे पीठ खात आहेत. हे पीठ खाल्याने चरबी कमी होत नाही. तर मेहनत केल्याने होते, याचा र्शीमांताना विसर पडला आहे. वातानुकूलित खोल्यांत वॉटर बेडरवर झोपून बाजरी किंवा जवाचे पीठ खाल्ल्याने चरबी कमी केली जात नाही, त्यातही ती चरबी दुसर्‍यांचा हक्क हिसकावून मिळवलेल्या सुविधामुळे वाढली आहे. कमरेवर जेव्हा एक इंच चरबी वाढते तेव्हा मेंदूवरदेखील एक सेंमी वाढते; त्यमाुळे संवेदना या वजनाखाली दबून जातात.
सोनाक्षीचा साधेपणा आणि तिच्या डोळ्यांची चमक तिच्या यशाचे रहस्य आहे. मादक दिसण्यासाठी अंगप्रदर्शन करण्याची गरज नाही, तर अंग झाकून ठेवल्यावरही यश मिळवता येते, हे सोनाक्षीने दाखवून दिले. फक्त डोळे बोलले पाहिजेत. सोनाक्षीच्या नजरेत आमंत्रण आहे, हसण्यात मेजवाणीचे वचन आहे. ती वर्तमानातली असूनही तिला पाहून जुन्या जमान्यातील नायिकांची आठवण येते. मादकतेची व्याख्या तिने आपल्या पद्धतीने केली आहे. ही मादकता र्मयादा भंग करत नाही, तर मनात इच्छा जागृत करते. ‘दबंग’ आणि ‘राउडी राठौर’ तिचे आतापर्यंतचे नायकप्रधान अँक्शन चित्रपट होते. त्यात नायिकाचे काम खूप कमी होते; पण तिने र्मयादित संधीतच अभिनयाचे सोने केले. तिने अँक्शन हीरोच्या नाकाखालून दृश्य चोरले. कॅमेर्‍यासोबत तिची मैत्री आहे. अँक्शन चित्रपटांच्या आयुर्वेद काढय़ावर ती आपल्या होमियोपॅथिक औषधाने बाजी मारते. यात तिचा लवचीकपणा तिची मदत करतो. काही कलावंत कॅमेर्‍यासमोर तणाव घेत असतात; पण सोनाक्षी तणावमुक्त राहते. याच नात्याला कॅमेर्‍याची मैत्री म्हणतात. या दोन चित्रपटांतील नायक तिच्यापेक्षा वयाने मोठे होते. ती आपल्या समवयस्क रणबीर कपूर आणि इम्रान खानसारख्या नायकांसोबत प्रेमकथा मिळताच कमाल करू शकते. सलमान खान आपल्या नायिकांसोबत मस्ती, प्रेक्षकांना हसू येईल असे काही करतो; पण तो कधीच शारीरिक जवळीक होऊ देत नाही. ही त्याची प्रेम करण्याची पद्धत आहे.
आज करिना कपूर आणि कॅटरिना कैफ आघाडीच्या नायिका आहेत आणि प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन त्यांच्या जवळपास आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शर्मा भविष्यात अत्यंत लोकप्रिय होऊ शकतात. अनुष्काला यश चोप्राचे मार्गदर्शन आहे आणि ती यश चोप्राच्या दिग्दर्शनात शाहरुखसोबत काम करत आहे. सोनाक्षी सिन्हालादेखील अशाच संधीची गरज आहे. आजच्या पाश्चात्त्य पद्धतीने सादर होणार्‍या स्त्री पात्राच्या काळात सोनाक्षीने आपल्या भारतीयत्वाला शाबूत ठेवले आहे आणि हे भारतीयत्व राजकारणात नारा लावणारे नसून शुद्ध आहे. प्रकाश झा यांनी ‘मृत्युदंड’ सारखा दुसरा चित्रपट बनवला असता, तर सोनाक्षीने त्यांच्या दिग्दर्शनात कमाल केली असती. आज एमएफ हुसेन आपल्यामध्ये असते तर त्यांना माधुरीप्रमाणे सोनाक्षीमध्येही संपूर्ण स्त्री दिसली असती.
आजकालचे सर्व चित्रपट पुरुष आणि अँक्शनप्रधान आहेत. आजच्या चित्रपट निर्मात्यांत बिमल रॉयसारखे स्त्रीच्या हृदयात घर करणारे निर्माते नाहीत. त्यामुळे ‘सुजाता’ आणि ‘बंदिनी’ अशक्य आहे; पण ‘मधुमती’ शक्य आहे. ‘गंगा जमना’ची नायिकादेखील संभव आहे. सोनाक्षी याच धाग्यापासून विनलेला आणि शरीर झाकून मन उघड करणारा जाड कपडा आहे.एक्स्ट्रा शॉट
सोनाक्षीने आपल्या पहिल्या दबंग चित्रपटासाठी 30 किलो वजन कमी केले होते.
फेरारीच्या सवारीची नशा
चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न-शांघाय