आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayprakash Chokase Fiture On Katrina And Sonam Kapoor

सोनम कपूर विरुद्ध कॅटरिना कैफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅटरिना कैफचे चित्रपट पाहून तिचे अभिनंदन केले पाहिजे असे अभिनेत्री सोनम कपूरचे म्हणणे आहे. कॅटरिनाच्या मसाला चित्रपटात गांभीर्य आणि सर्मपणाबरोबरच थोडा निर्लज्जपणाही धाडसाचे काम आहे. तसेच गांभीर्य आणि सर्मपण या दोन्ही गोष्टींवरून कोण व्यक्ती कशी आहे हे ठरवले जाते. सोनमने हे वक्तव्य कोणत्या संदर्भात केले हे सांगणे कठीण आहे. शिवाय सोनम असे बोलली काय हे देखील निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र अशा प्रकारची चर्चा सुरू आहे.
‘सांवरिया’ मध्ये संजय लीला भन्साळी यांनी सोनम कपूरला वहिदा रेहमानच्या रूपात सादर केले होते; पण इतर चित्रपटांत ती वेगळ्या रूपात दिसली आणि अस्वीकृतदेखील झाली. करण जोहरच्या चित्रपटातील एका गाण्यावर तिने धाडस दाखवत अंगप्रदर्शन केले; पण तिचे नाणे बॉक्स ऑफिसवर खनकले नाही. नायिकांची उलटी गणती केल्यास सोनमचे नावच प्रथम येईल. तिच्या घरच्या ‘आयशा’ चित्रपटालादेखील यश मिळाले नाही. अशा अवस्थेत तिचे कॅटरिना कैफवर टिप्पणी ‘अंगूर खट्टे हैं’ प्रमाणेच ठरत आहे. तिने एकीकडे कॅटरिनाच्या सर्मपपणाची प्रशंसा केली आणि दुसरीकडे एकाच झटक्यात तिला निर्लज्ज ठरवले. याला सव्याज स्तुतीदेखील म्हणू शकतो. खरं तर सध्या सर्वच नायिका अंगप्रदर्शन करत आहेत आणि सिनेमा खर्‍या अर्थाने ‘डर्टी पिक्चर’ झाला आहे. ‘चमडी दिखाओ और दमडी कमाओ’ अशी आजच्या नायिकांची स्थिती झाली आहे. जणू काही सोने-चांदी आणि पितळाच्या नाण्यांची नव्हे तर कातडीच्या नाण्यांची चलती झाली आहे. कधी काळी कातडीचे नाणे चालवणार्‍या बादशहाला सनकी आणि मूर्ख म्हटले जाते होते. तसेही दूरदृष्टी ठेवणार्‍यांना त्या-त्या काळात मूर्खच म्हटले गेले आहे.
आजकालच्या नायिका खूप पर्शिम करून आणि संतुलित जेवण ठेवून सुडौल शरीर बनवतात. मग हे शरीर का दाखवू नये, असा त्यांचा विचार असावा. जे दिसते तेच विकते हे त्यांना बाजार आणि जाहिरातींनी शिकवले आहे. आजकाल नायकदेखील पिळदार शरीर दाखवण्याची संधी सोडत नाहीत; पण त्यांची प्रशंसा केली जाते. ज्या गोष्टीवरून पुरुषांची प्रशंसा केली जाते, त्याच गोष्टीवरून स्त्रीवर टीका केली जाते, असे नेहमीच होत आले आहे. तारुण्यात ज्या गोष्टींला पुरुषांचा अनुभव म्हटला जातो, त्याच गोष्टींना मुलींची चरित्रहीनता मानले जाते.
पारंपरिक स्थापित ओळ आहे की, ‘लाज स्त्रीचा दागिना असतो’; पण मनोरंजन उद्योग, फॅशन आणि जाहिरातींच्या जगात निर्लज्ज पणामुळेच दागिने विकत घेतले जातात. दशकापूर्वी प्रसिद्ध सेक्स सिम्बॉल ब्रिजिता बारदोतने आत्महत्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तेव्हा ‘सिमोन द बोव्हा’ यांनी एक लांबलचक लेख लिहिला होता की, ‘जेव्हा एखादी महिला प्रसाधनाच्या पारंपरिक शस्त्रांचा त्याग करून आपल्या स्वाभाविक स्वरूपात येते, तेव्हा पुरुष समाजात भूकंप का होतो. पुरुषांसाठी ज्याला विकास म्हटले जाते, त्याला महिलेसाठी पतन मानले जाते’.
सोनम कपूरच्या टिप्पणीचा शेवटचा भाग कॅटसाठी अपमानास्पद होऊ शकतो. सोनमच्या मते सर्मपण आणि निर्लज्जपणाच्या आधारावरच व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कळते. कॅटरिना कैफ विभाजित कुटुंबातील मोठी मुलगी आहे. डझनभर लोकांच्या जबाबदारीसाठी ती भारतात आली आहे. तिला हिंदी आणि नृत्य येत नव्हते, इंडस्ट्रीत कुणाची ओळख नव्हती. तेव्हा सलमान खानने तिच्यासाठी भाषा आणि नृत्य शिकवण्यासाठी शिक्षक ठेवले आणि स्टार बनण्यासाठी मार्ग मोकळा केला. आज कॅटरिना यशस्वी कलाकार आहे आणि करिना कपूरप्रमाणे टॉप कलाकारांसोबत चित्रपट करत आहे. सोनम कपूर एका प्रसिद्ध घराण्यातील तिसर्‍या पिढीची प्रतिनिधी आहे. लहानपणापासूनच या उद्योगातील कार्यपद्धती चांगल्या प्रकारे ओळखते. तिचे वडील अनिल कपूर पर्शिम, सर्मपण आणि प्रतिभेसाठी प्रसिद्ध आहेत.
‘सर्मपण आणि निर्लज्जपणावरुन कळते की, कोण व्यक्ती कसा आहे’. याला जोडून दोन वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या लोकांचे यश आणि अपयश पाहणे चुकीचे आहे. अभिनय करतेवेळी व्यक्तिमत्त्वाला पडद्यामागे सोडावे लागते. ज्या मुली परिस्थितीमुळे वेश्यावृत्ती करतात त्यांच्या व्यक्तिमत्त्वालादेखील त्यांच्या व्यवसायाशी जोडले जात नाही. आयटम साँगचे चित्रीकरण 100 लोकांच्या युनिटसमोर होते आणि इतक्या गर्दीसमोर लटके-झटके आणि निर्लज्जता सोपे काम नाही. चित्रपट उद्योगाच्या पूर्ण समाजातच मोकळेपणाची लाट आली आहे. त्यावर टीका करणे सोपी आहे, पण त्याला समजून घेणे आणि प्रशंसा करणे अवघड आहे.
jpchoukse@bhaskarnet.com