आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीमध्ये सुरु असलेल्या विल्स इंडिया फॅशन वीकमध्ये रॅम्पवर अवतरले 'जोडी ब्रेकर्स'. डिझायनर रॉकी एसचं वेडिंग कलेक्शन सादर करण्यासाठी हॉट बिपाशा बासू आणि आर. माध वन रॅम्पवर अवतरले होते. खास वेडिंग कॉश्चुममध्ये या दोघांचं दर्शन घडलं.
बिपाशा आणि माधवनचा 'जोडी ब्रेकर्स' हा सिनेमा या शुक्रवारी रिलीज होत आहे. त्यामुळे सध्या हे दोघे आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. वेडिंग कॉश्च्युममध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.
यावेळी बिपाशाला तिच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल विचारल तेव्हा तिने सांगितलं, मी सध्या आपल्या कामात खूपच बिझी आहे, त्यामुळे मला वरसंशोधन करायला मुळीच वेळ नाही. मी ही जबाबदारी माधवनवर सोपवली आहे, आता माधवनला जोडी ब्रेकर नाही तर जोडी मेकर व्हावं लागणार आहे.
वेगळा विषय घेऊन येत आहे 'जोडी ब्रेकर्स'
'जोडी ब्रेकर्स'चे म्युझिक लॉंचिंग दणक्यात (फोटो फिचर)
'जोडी ब्रेकर्स'चे पहिले पोस्टर झाले प्रदर्शित
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.